पोस्ट्स

03 जानेवारी 2022-03 January

 03 जानेवारी 2022 - 03 January स्त्रीशिक्षणाच्या प्रणेत्या व समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांचा जन्म. 03 जानेवारी 1831 अल्पपरिचय      सावित्रीबाई फुले या स्त्रीशिक्षणाच्या प्रणेत्या व पहिल्या महिला शिक्षिका होत्या. महात्मा जोतिबा फुले यांच्या त्या पत्नी होत्या. पुणे येथे  भारतातील मुलींसाठी असलेली पहिली शाळा सावित्रीबाईंनी सुरू केली, या शाळेत त्या पहिल्या महिला शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. स्त्रीशिक्षणासाठी त्यांनी भरीव योगदान दिले. भारतीय स्त्रीयांच्या चाकोरीबध्द आयुष्याला शिक्षणाव्दारे नवा आयाम देण्याचे कार्य त्यांनी केले. भारतातील आजच्या स्त्रीशिक्षणाचे व भारतीय स्त्रीयांच्या प्रगतीचे सारे श्रेय सावित्रीबाई व महात्मा फुले यांच्या शिक्षणाप्रती असलेल्या समर्पणाला जाते. सावित्रीबाईंविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे भेट द्या. प्रसिध्द निर्माते चेतन आनंद यांचा जन्म. 03 जानेवारी 1915 अल्पपरिचय      चेतन आनंद हे प्रसिध्द हिंदी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक होते. ‍दिग्दर्शन व निर्माते सोबतच पटकथालेखक म्हणूनही ते कार्यरत होते. प्रसिध्द अभिनेते ...

02 January 2022- 02 जानेवारी

  02 January 2022 - 02 जानेवारी मराठा हे वृत्तपत्र लोकमान्य टिळकांनी सुरू केले.  02 जानेवरी 1881 मराठा वृत्तपत्र मराठा हे इंग्रजी तर केसरी हे मराठी वृत्तपत्र लोकमान्य टिळक आणि आगरकर यांनी 1881 च्या 02जानेवारीला सुरू केली. सुरवातीला मराठा ह्या वृत्तपत्राचे संपादकपद टिळकांनी स्वतः घेतले होते व केसरीचे संपादकपद आगरकरांकडे होते. पुढे टिळक व आगरकर यांच्यमध्ये मतभेद झल्यामुळे टिळकांनी केसरीचे संपादकपद स्वीकारले व सुमारे 500 हून अधिक अग्रलेखातून इंगरजांविरुध्द जनतेचे स्वातंत्र्यासाठी जनजागृतीचे कार्य केले. ही दोन्ही वृत्तपत्रे पुढील एका वर्षातच प्रचंड लोकप्रिय ठरली. भारताच्या स्वातंत्र्यासाठी लोकांना एकजूट करण्याचे कार्य ह्या दोन्ही वृत्तपत्रांनी केले. प्रसिद्ध समाजसुधारक व लेखक महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे निधन. 02 जानेवारी 1944 अल्पपरिचय महर्षी विठ्ठल रामजी शिंदे हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध समाजसुधारकांपैकीं एक समाजसुधारक व लेखक होते.  धर्मसंस्था, समाजकारण यामध्ये त्यांनी कार्य केले. समाजातील अनिष्ट रूढी परंपरांना त्यांनी कडाडून विरोध केला. अस्पृश्य समाजाच्या उन्नतीसाठी कार्...

01 जानेवारी 2022-01 January 2022

  01 ज ानेवारी 2022-01 January 2022 इंडियन पीनल कोड अस्तित्वात आले . 01 जानेवारी 1862 इंडियन पीनल कोड      इंडियन पीनल कोड - आयपीसी   हा भारताचा अधिकृत क्रिमिनल कोड आहे . क्रिमिनल अर्थात सर्व   गुन्ह्यांचा गुन्हेगारी कायद्यान्वये यामध्ये समावेश असून हा कोड 1834 च्या पहिल्या लॉ कमिशनच्या शिफारशीनुसार याचा मूळ मसुदा चार्टर ॲक्ट 1833 नुसार लॉर्ड थॉमस मॅक ‍ कॅल्युरी यांच्या अध्यक्षतेखाली तयार करण्यात आला . तत्कालीन ब्रिटीश भारतात हा कोड याच्या तत्काळ प्रभावाने अस्तित्वात आला परंतू स्वायत्त संस्थानांमध्ये त्यांच्या वैयक्तीक न्यायसंस्था असल्याने तेथे ह्याचा प्रभाव नव्हता . यामध्ये अनेकवेळा बदल करण्यात आला असून आता विविध इतर कायदे व कलमांव्दारे याचा वापर केला जातो . भारताच्या स्वातंत्र्यानंतर व नंतर स्वायत्त संस्थाने भारतात विलीन झाल्यानंतर भारतात याचा उपयोग करण्यात येऊ लागला . भारत पाकिस्तान फाळणीमुळे पाकिस्तानात हा कोड पाकिस्तान पीनल कोड म्हणून वापरला गेला तसेच बंग्लादेश निर्मितीनंतर तेथेही हा कोड वापरला जातो . हा कोड ब्रिटीशांनी नंतर ब्रह्मदेश , सिलोन...

31 डिसेंबर 2021-31 December

  31 डिसेंबर 2021-31 December ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना . 31 डिसेंबर 1600 ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनी .      ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनी ही खाजगी व्यापार कंपनी होती , ज्या कंपनीने सुरूवातीला भारतात आपला   व्यापार विविध ठिकाणी विस्तारून आपले अस्तित्व तयार केले व नंतर भारतावर आपले एकहाती वर्चस्व स्थापन करून भारतात आपले शासन निर्माण केले . ब्रिटीश इस्ट इंडिया कंपनीची सुरूवात 31 डिसेंबर 1600 रोजी ब्रिटनची राणी एलिझाबेथ प्रथमने आपल्या एका घोषणापत्राव्दारे केली . ही कंपनी लंडनच्या व्यापाऱ्यांनी स्थापलेली व्यापार कंपनी होती व तिला शाही अधिकार पत्राव्दारे जगात पूर्व भागात व्यापार करण्याची परवानगी मिळाली होती . ईस्ट इंडिया कंपनीने 1608 साली भारतात सुरत येथे व्यापारासाठी आपले केंद्र स्थापन केले त्याआधी कंपनीला पोर्तुगीजांकडून प्रचंड विरोधाचा सामना करावा लागला परंतू डच इस्ट इंडिया कंपनीशी ब्रिटीश इस्ट इंडिया कंपनीने संधान साधून पोर्तुगीजांचा पराभव करत अनेक शाही अधिकार प्राप्त केले ज्यानुसार बंगाल , मद्रास , मुंबई इत्यादी ठिकाणी आपले अस्तित्व तयार केले सुरू...

30 डिसेंबर 2021-30 December

  30 डिसेंबर 2021-30 December प्रसिध्द ब्रिटीश लेखक रूडयार्ड किपलिंग यांचा जन्म . 30 डिसेंबर 1865 अल्पपरिचय रूडयार्ड किपलिंग तथा जोसेफ रूडयार्ड किपलिंग हे प्रसिध्द ब्रिटीश लेखक होते . दि जंगल बुक , कॅप्टन केरजियस ,  जस्ट सो स्टोरिज अशी त्यांची अनेक पुस्तके प्रचंड गाजली . 1907 साली साहित्यातील नोबेल पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले . रूडयार्ड किपलिंग यांच्याविषयी अधिक माहितीसाठी येथे भेट द्या . मुंबईचे पहिले गृहमंत्री , साहित्यिक कन्हैयालाल मुन्शी यांचा जन्म . 30 डिसेंबर 1887 अल्पपरिचय      कन्हैयालाल मुन्शी हे मुंबईचे पहिले गृहमंत्री , भारत सरकारचे हैदराबाद संस्थानसाठी एजंट जनरल व प्रसिध्द साहित्यिक होते . भारतीय स्वातंत्र्यलढ्यातही मुन्शी यांनी सहभाग घेतला होता . गुजराती व इंग्लीश मध्ये त्यांनी साहित्यलेखन केले . भारत स्वतंत्र झाल्यानंतरही ते अनेक महत्वाच्या घटनात्मक पदांवर कार्यरत होते . कन्हैयालाल मुन्शी यांच्याविषयी अधिक माहितीकरता येथे भेट द्या . भारतीय अवकाश कार्यक्रमाचे जनक डॉ . विक्रम साराभाई यांचे निधन . 30 डिसेंबर 1971 अल्पपरिचय...