31 डिसेंबर 2021-31 December

 31 डिसेंबर 2021-31 December

ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना. 31 डिसेंबर 1600

ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनी.

    ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनी ही खाजगी व्यापार कंपनी होती, ज्या कंपनीने सुरूवातीला भारतात आपला  व्यापार विविध ठिकाणी विस्तारून आपले अस्तित्व तयार केले व नंतर भारतावर आपले एकहाती वर्चस्व स्थापन करून भारतात आपले शासन निर्माण केले. ब्रिटीश इस्ट इंडिया कंपनीची सुरूवात 31 डिसेंबर 1600 रोजी ब्रिटनची राणी एलिझाबेथ प्रथमने आपल्या एका घोषणापत्राव्दारे केली. ही कंपनी लंडनच्या व्यापाऱ्यांनी स्थापलेली व्यापार कंपनी होती व तिला शाही अधिकार पत्राव्दारे जगात पूर्व भागात व्यापार करण्याची परवानगी मिळाली होती. ईस्ट इंडिया कंपनीने 1608 साली भारतात सुरत येथे व्यापारासाठी आपले केंद्र स्थापन केले त्याआधी कंपनीला पोर्तुगीजांकडून प्रचंड विरोधाचा सामना करावा लागला परंतू डच इस्ट इंडिया कंपनीशी ब्रिटीश इस्ट इंडिया कंपनीने संधान साधून पोर्तुगीजांचा पराभव करत अनेक शाही अधिकार प्राप्त केले ज्यानुसार बंगाल, मद्रास, मुंबई इत्यादी ठिकाणी आपले अस्तित्व तयार केले सुरूवातीला व्यापरासाठी व नंतर मराठे व इतर सत्तांना पराभूत करत पूर्ण भारतावर आपले शासन व वर्चस्व प्रस्थापित केले जे  त्यांचे शासन  पुढे सुमारे 150 पेक्षा जास्त वर्ष टिकले व अखेरिस 1947 साली भारत स्वतंत्र झाला.

प्रसिध्द हिंदुस्थानी शास्त्रीय गायक पंडित मल्लिकार्जुन मन्सूर यांचा जन्म. 31 डिसेंबर 1910

अल्पपरिचय

    पंडित मल्लिकार्जुन मन्सूर हे प्रसिध्द हिंदुस्थानी शास्त्रीय गायक होते. जयपूर-अत्रौली घराण्याचे जेष्ठ गायक असणाऱ्या मल्लिकार्जुन मन्सूर यांनी आपले गुरू नीळकंठबुवा अलुरमठ यांच्या मार्गदर्शनात ग्वाल्हेर घराण्याचेही संगीतशिक्षण घेतले. पंडित मल्लिकार्जुन मन्सूर यांच्या विषयी अधिक माहिती जाणून घेण्याकरता येथे भेट द्या.

प्रसिध्द इतिहासकार वि. का. राजवाडे यांचे निधन. 31 डिसेंबर 1926

अल्पपरिचय

    विश्चनाथ काशिनाथ राजवाडे तथा वि. का. राजवाडे हे प्रसिध्द मराठी इतिहासकार होते. राजवाडे यांनी संपादित केलेला मराठ्यांच्या इतिहासाची साधने हा 22 खंडीय प्रचंड ग्रंथ मराठा साम्राज्याच्या इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी प्रमाण ग्रंथ समजला जातो. याशिवाय राजवाडे यांचे अनेक ग्रंथ मराठे व तत्कालीन समाजजीवनाचे समग्र चित्रण करतात. वि. का. राजवाडे यांच्याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी  येथे भेट द्या.

प्रसिध्द गायक छोटा गंधर्व यांचे निधन. 31 डिसेंबर 1997

ल्पपरिचय

    छोटा गंधर्व तथा  सौदागर नागनाथ गोरे हे मराठी रंगभूमीवरील प्रसिध्द गायक तसेच नाट्याभिनेते होते. बालमोहन, कला विकास अशा अनेक नाटक मंडळींच्या माध्यमातून त्यांनी रंगभूमीवर कार्य केले. गंधर्वतुल्य गायकीमुळे त्यांना छोटा गंधर्व असे संबोधले जाऊ लागले. छोटा गंधर्व यांच्याविषयी अधिक माहितीकरता येथे भेट द्या.

ंदर्भ व आभार

https://www.google.com/

https://www.wikipedia.org/

https://marathivishwakosh.org/

https://m.bharatdiscovery.org/

संकल्पना, संकलन व संपादन

भालचंद्र माधव इनामदार

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

13 ऑक्टोबर दिनविशेष-13 october dinvishesh-13-10-2020

ऑक्टोबर 14 2020-आजचा दिनविशेष- october 14 2020-aajcha dinvishesh

ऑक्टोबर 18 2020-October 18 2020