31 मे - जागतिक तंबाखूसेवन विरोधी दिन विशेष
31 मे - जागतिक तंबाखूसेवन विरोधी दिन विशेष WorldNoTobaccoDay-31|May जागतिक तंबाखूसेवन विरोधी दिन. 31 मे 2021 आज 31 मे रोजी दरवर्षी जागतिक तंबाखूसेवन विरोधी दिन साजरा करण्यात येतो. 1987 मध्ये जागतिक आरोग्य संघटनेच्या सदस्य राष्ट्रांनी तंबाखूसेवन विरोधी दिन साजरा केला. 1988 साली जागतिक आरोग्य संघटनेच्या एका ठरावानुसार 31 मे हा जागतिक तंबाखूसेवनविरोधी दिवस म्हणून साजरा करण्यास मान्यता देण्यात आली. तंबाखूसेवन विरोधी दिवसाचा उद्देश तंबाखू सेवनामुळे होणारे आजार व त्याचा प्रसार प्रचार कमी करणे हा आहे. सध्या जगात सुमारे 70 लाखाहून अधिक मृत्यूंचे कारण तंबाखूसेवन आहे. तंबाखू सेवनामुळे होणाऱ्या घातक आजारांमध्ये कर्करोग,यकृताचे विविध आजार,फफ्फुसाचे आजार, पक्षाघात आशा अनेक आजारांचा समावेश होतो. भारतात साधरणत: 10 लाख लाख लोकांचा तंबाखूसेवनामुळे मृत्यू होत असल्याचे निर्दशनास आलेले आहे. याच समस्येवर मात करण्यासाठी भारतात राष्ट्रीय तंबाखू निर्मुलन कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली असून केंद्र व राज्य सरकारच्या सहयोगाने याचे आयोजन करण्यात येते यामध्ये जनजागृती व्यसनमुक्ती शिबीरे...