03 जानेवारी 2022-03 January
03 जानेवारी 2022 - 03 January स्त्रीशिक्षणाच्या प्रणेत्या व समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांचा जन्म. 03 जानेवारी 1831 अल्पपरिचय सावित्रीबाई फुले या स्त्रीशिक्षणाच्या प्रणेत्या व पहिल्या महिला शिक्षिका होत्या. महात्मा जोतिबा फुले यांच्या त्या पत्नी होत्या. पुणे येथे भारतातील मुलींसाठी असलेली पहिली शाळा सावित्रीबाईंनी सुरू केली, या शाळेत त्या पहिल्या महिला शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. स्त्रीशिक्षणासाठी त्यांनी भरीव योगदान दिले. भारतीय स्त्रीयांच्या चाकोरीबध्द आयुष्याला शिक्षणाव्दारे नवा आयाम देण्याचे कार्य त्यांनी केले. भारतातील आजच्या स्त्रीशिक्षणाचे व भारतीय स्त्रीयांच्या प्रगतीचे सारे श्रेय सावित्रीबाई व महात्मा फुले यांच्या शिक्षणाप्रती असलेल्या समर्पणाला जाते. सावित्रीबाईंविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे भेट द्या. प्रसिध्द निर्माते चेतन आनंद यांचा जन्म. 03 जानेवारी 1915 अल्पपरिचय चेतन आनंद हे प्रसिध्द हिंदी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक होते. दिग्दर्शन व निर्माते सोबतच पटकथालेखक म्हणूनही ते कार्यरत होते. प्रसिध्द अभिनेते ...