30 एप्रिल 2021- April 30
30 एप्रिल 2021 - April 30 जॉर्ज वॉशिंग्टन हे अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष बनले. 30 एप्रिल 1789 जॉर्ज वॉशिंग्टन हे अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष होते. आजच्याच दिवशी म्हणजेच 30 एप्रिल 1789 ला त्यांनी अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली. जॉर्ज वॉशिंग्टन यांच्याबद्दल अधिक माहितीकरता येथे भेट द्या. भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांचा जन्म. 30 एप्रिल 1870 अल्पपरिचय धुंडिराज गोविंद फाळके तथा दादासाहेब फाळके हे निर्माते,लेखक, दिग्दर्शक,छायाचित्रकार होते. भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक म्हणून त्यांना ओळखले जाते. दादासाहेब फाळके यांच्याविषयी अधिक माहितीसाठी येथे भेट द्या. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जन्म. 30 एप्रिल 1909 अल्पपरिचय माणिक बंडोजी इंगळे तथा तुकडोजी महाराज हे महाराष्ट्रातील एक महान संत व प्रवचनकार, किर्तनकार होते. अंधश्रध्दा निर्मुलन, जातीभेद निर्मुलन, राष्ट्रीय एकात्मता, सामाजसुधारणा यामध्ये तुकडोजी महाराजांनी भरीव असे कार्य केले, भारताच्या राष्ट्रीय एकात्मतेसाठी त्यांनी अथक प्रयत्न केले त्यांच्या याच प्रयत्...