पोस्ट्स

सप्टेंबर, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

30 सप्टेंबर 2021-September 30-जागतिक सागरी दिन विशेष

  30 स प्टेंबर 2021 -September 30- जागतिक सागरी दिन विशेष जागतिक सागरी दिवस -World Maritime Day. 30 सप्टेंबर 2021 जागतिक सागरी दिन      जागतिक सागरी दिन 30 सप्टेंबर रोजी जगभर साजरा केला जातो . लाखो नाविकांच्या त्याग , समर्पण व व्यवसायिकतेबद्दल कृतज्ञता म्हणून हा दिवस साजरा करण्यात येतो . जगातील नाविकांनी केलेल्या कार्यामुळे आज जगाच्या प्रत्येक भागात आपल्याला गरजेची औषधे , खाद्यपदार्थ , गरजेच्या वस्तू मिळतात . सागरी मालवाहतूक सुव्यवस्थीत व कोणत्याही अडथळ्याविना होण्यासाठी मर्चंट नेव्हीतील लोक रात्रंदिवस कार्यरत असतात . नाविक लोक आपल्या देशापासून , शहरापासून , कुटुंबापासून कित्येक महिने दूर राहत आपली सेवा निळ्याशार समुद्राच्या विविध जहाजांवर बजावत असतात . याच त्यांच्या त्यागामुळे आज जागतिक व्यापार सुनियोजित राहिलेला आहे . कोवीड -19 महामारीमध्येसुध्दा त्यात खंड न पडता अनेक महत्वाची उत्पादने जगातील कानाकोपऱ्यात पोहचविण्याचे महत्वाचे कार्य या लोकांनी केले आहे . सन 2021 साठी या दिवसाचा विषय हा ''seafarers at the core of shipping’s future. "   म्हणजेच जहाज म...

29 सप्टेंबर 2021- September 29

  29 स प्टेंबर 2021 - September 29 पदार्थविज्ञान शास्त्रज्ञ एनरिको फर्मी यांचा जन्म . 29 सप्टेंबर 1901 अल्पपरिचय      एनरिको फर्मी हे इटालियन अमेरिकन पदार्थविज्ञान शास्त्रज्ञ होते . रेडिओलॉजीवर संशोधन करताना न्यूट्रॉन कणांवरील संशोधनाकरीता त्यांना 1938 साली पदार्थविज्ञानातील नोबेल पारितोषिक देऊन गौरविण्यात आले . एनरिको फर्मी यांच्याविषयी अधिक माहितीकरता येथे भेट द्या . प्रसिध्द शास्त्रज्ञ रूडाल्फ डिझेल यांचे निधन . 29 सप्टेंबर 1913 अल्पपरिचय      रूडाल्फ डिझेल हे प्रसिध्द फ्रेंच शास्त्रज्ञ होते . सध्या उद्योग व वाहनात मोठ्या प्रमाणावर वापरल्या जात असलेल्या डिझेल इंजिनच्या शोधाचे श्रेय त्यांना जाते . रूडाल्फ डिझेल यांच्याविषयी अधिक माहितीकरता येथे भेट द्या . इंडियन एज्युकेशन सोसायटीची पहिली शाळा किंग जॉर्ज इंग्लीश स्कूल दादर , मुंबई येथे सुरू .  29 सप्टेंबर 1917 किंग जॉर्ज हायस्कूल      ब्रिटनचे किंग जॉर्ज पाचवे यांच्या 1911 च्या भारत दौऱ्यात त्यांनी शिक्षण महत्वाचे असून त्यासाठी अधिकाधिक शाळा स्थापन कराव्यात ...

28 सप्टेंबर 2021- September 28-जागतिक हरित ग्राहक दिवस

इमेज
  28 स प्टेंबर 2021- September 28- जागतिक हरित ग्राहक दिवस 28  स प्टेंबर  2021- September 28- जागतिक हरित ग्राहक दिवस जागतिक हरित ग्राहक दिवस 28 सप्टेंबर 2021      जागतिक हरित ग्राहक दिवस तथा वर्ल्ड ग्रीन कंझ्युमर डे हा दरवर्षी 28 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो . ग्रीन कझ्युमर अर्थात हरित ग्राहक म्हणजेच असा व्यक्ती जो पर्यावरणाची काळजी घेत पर्यावरणस्नेही वस्तूंची व सेवांची खरेदी करतो . हा दिवस या सर्व गोष्टींच्या जनजागृतीकरता साजरा करण्यात येतो ज्यामध्ये पर्यावरणस्नेही वस्तू किंवा सेवा लोकांनी खरेदी कराव्यात किंवा आशा वस्तू आणि सेवा विकत घ्याव्यात जेणेकरून त्याचा पुर्नवापर करता येईल किंवा त्यापासून नवीन वस्तू निर्मिती करता येईल . पर्यावरणस्नेही वस्तूंमध्ये सोलर वॉटर हिटर , ग्रीन रेटिंग असणारी उत्पादने , हायब्रिड वाहने , पुर्नवापर करता येणाऱ्या वस्तू आशांचा समावेश होतो . पर्यावरणाचा ऱ्हास थांबविणे ही कोणा एकट्याची जबाबदारी नसून ती सामूहिक जबाबदारी व कर्तव्य असल्याने आपल्या परीने प्रत्येकाने यासाठी काही न काही योगदान देणे गरजेचे आहे . आजच्या जागतिक हरि...

27 सप्टेंबर 2021-September 27-राष्ट्रीय ग्रंथालय दिन विशेष

  27 स प्टेंबर 2021 -September 27- राष्ट्रीय ग्रंथालय दिन विशेष राष्ट्रीय ग्रंथालय दिन . 27 सप्टेंबर 2021 राष्ट्रीय ग्रंथालय दिन      गणिततज्ञ व ग्रंथालयशास्त्राचे प्रणेते एस . आर . रंगनाथन यांच्या सन्मानार्थ त्यांनी ग्रंथालयशास्त्रात केलेल्या अभूतपूर्व कार्याचा सन्मान म्हणून राष्ट्रीय ग्रंथालय दिन दरवर्षी 27 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो . ग्रंथालयांचे मानवी जीवनात महत्वपूर्ण स्थान आहे . मानवाच्या वैचारिक , बौध्दिक जडणघडणीत ग्रंथालयांचा वाटा महत्वाचा आहे हाच विचार घेऊन रंगनाथन यांनी ग्रंथालयांबाबत विचार मांडले जे भारताच्या ग्रंथालय वाढीच्या   दृष्टीने मार्गदर्शक आहेत . ग्रंथालयशास्त्रात केलेल्या याच कार्याचा सन्मान म्हणून आजचा हा दिवस पुस्तके समजून घेऊन करूया . फ ्रान्सचा सम्राट तेरावा लुई याच जन्म . 27 सप्टेंबर 1601 अल्पपरिचय      तेरावा लुई हा फ्रान्सचा सम्राट होता . सम्राट चौथ्या हेन्री नंतर तो फ्रान्सचा सम्राट बनला . तेराव्या लुईची कारर्किर्द इ . स . 1610 ते इ . स . 1643 अशी होती . तेराव्या लुई विषयी अधिक माहितीकरता येथे ...

26 सप्टेंबर 2021-September 26

  26 स प्टेंबर 2021 -September 26 समाजसुधारक ईश्वरचंद्र विद्यासागर यांचा जन्म . 26 सप्टेंबर 1820 अल्पपरिचय      ईश्चरचंद्र विद्यासागर हे प्रसिध्द भारतीय   समासुधारक , शिक्षणतज्ञ व बंगाली साहित्यिक   होते . विधवा पुर्नविवाहासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळेच तत्कालीन इंग्रज सरकारला कायदा करून या प्रश्नात लक्ष घालावे लागले . बंगालच्या गद्य साहित्याचे प्रणेते असणाऱ्या इश्वरचंद्र विद्यासागर यांचे बंगालच्या साहित्यविषयक जडणघडणीत महत्वपूर्ण योगदान आहे . विधवा पुर्नविवाह , अन्यायी प्रथा व परंपरा यांवर आपल्या साहित्यातून त्यांनी प्रहार केला . इश्वरचंद्र विद्यासागर यांच्याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे भेट द्या . प्रसिध् ‍ द संशोधक इव्हान पाव्हलॉव्ह यांचा जन्म . 26 सप्टेंबर 1849 अल्पपरिचय      इव्हान पाव्हलॉव्ह हे नोबेलविजेते रशियन संशोधक होते . पाचन तंत्रातील महत्वपूर्ण संशोधनासाठी त्यांना 1904 साली वैद्यकशास्त्रातील   नोबेल पुरस्कार देऊन गौरविण्यात आले . पाव्हलॉव्ह यांच्याविषयी अधिक माहितीसाठी येथे भेट द्या . प्रसि...

25 सप्टेंबर 2021-September 25

  25  स प्टेंबर 2021 -September 25 म राठी साहित्यिक कॅप्टन गो . ग . लिमये यांचा जन्म . 25 सप्टेंबर 1881 अल्पपरिचय कॅप्टन गो . ग . लिमये तथा कॅप्टन गोपाळ गंगाधर लिमये हे प्रसिध्द मराठी साहित्यिक कथाकार व विनोदी लेखक होते . जुना बाजार , तिच्याकरिता असे त्यांचे अनेक कथासंग्रह व विनोदी कथा लोकप्रिय ठरल्या . कॅप्टन गो . ग . लिमये यांच्याविषयी अधिक माहितीकरता येथे भेट द्या . इतिहास संशोधक व लेखक डॉ . र . वि . हेरवाडकर यांचा जन्म . 25 स्पप्टेंबर 1915 अल्पपरिचय ड ॉ . रघुनाथ विनायक हेरवाडकर तथा डॉ . र . वि . हेरवाडकर हे प्रसिध्द मराठी बखर वाङमयकार , इतिहास संशोधक , संकलक व लेखक होते . डॉ . र . वि . हेरवाडककर यांच्या विषयी अधिक माहितीकरता येथे भेट द्या . भारतीय जनसंघाचे एक संस्थापक व प्रसिध्द राजकारणी पंडित दिनदयाळ उपाध्याय यांचा जन्म .  25 सप्टेंबर 1916 अल्पपरिचय      पंडित दिनदयाळ उपाध्याय हे तत्वज्ञ , समाजशास्त्रज्ञ , पत्रकार , अर्थतज्ञ व   भारतीय जनसंघाचे एक   संस्थापक व प्रसिध्द राजकारणी होते . आताच्या भारतीय जनता पक्षाची स्थापना पू...