पोस्ट्स

जुलै, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

31 जुलै -July 31 2021

  31 जुलै -July 31 2021 शिक्षणतज्ञ नाना शंकरशेठ यांचे निधन . 31 जुलै 1865 अल्पपरिचय नाना शंकरशेठ तथा जगन्नाथ शंकरशेठ मुरकुटे हे प्रसिध्द शिक्षणतज्ञ व दानशूर होते . मुंबई व परिसरात त्यांनी दूरदृष्टीने उभारलेल्या अनेक संस्था आज अनेकांना शिक्षणासाठी प्रेरित करतात . मुंबई विद्यापीठातर्फे संस्कृत विषयात देण्यात येणारी त्यांच्या नावची जगन्नाथ शंकरशेठ शिषुवृत्ती प्रसिध्द आहे . जगन्नाथ शंकरशेठ यांच्याविषयी अधिक माहितीकरता येथे भेट द्या . संतसाहित्याचे अभ्यासक लक्ष्मण रामचंद्र पांगारकर यांचा जन्म . 31 जुलै 1872 अल्पपरिचय लक्ष्मण रामचंद्र पांगारकर हे संतसाहित्याचे अभ्यासक , चरित्रकार होते . जन्म 31 जुलै 1872 चिपळूण , रत्नागिरी , ब्रिटीश भारत मृत्यू 10 नोव्हेंबर 1941 वर्धा , ब्रिटीश भारत शिक्षण - बीए शालेय शिक्षण : न्यू इंग्लीश स्कूल , पुणे महाविद्यालयीन शिक्षण : फर्ग्युसन महाविद्यालय , पुणे कार्य प्रसिध्द संतसाहित्य अभ्यासक , चरित्रकार सुरूवातीस पंढरपूर , पुणे , अमरावती या ठिकाणी शिक्षक म्हणून कार्य मुमुक्षु साप्ताहिकाची धुळे येथे स्थापना व नंतर पुण्या...

30 जुलै 2021-July 30

  30 जुलै 2021 -July 30 जर्मन उद्योगपती जॉर्ज विल्हेम फॉन सिमेन्स यांचा जन्म . 30 जुलै 1855 अल्पपरिचय जॉर्ज विल्हेम फॅान सिमेन्स हे जर्मन उद्योगपती व सिमेन्स या जगप्रसिध्द कंपनीचे प्रमुख होते . जर्मन टेलिकम्युनिकेशन क्षेत्रातील प्रमुख उद्योगपती म्हणून त्यांना पाहिले जाते . जॉर्ज विल्हेम फॉन सिमेन्स यांच्याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी येथे भेट द्या . फोर्ड मोटर कंपनीचे संस्थापक प्रसिध्द अमेरिकन उद्योगपती हेन्री फोर्ड यांचा जन्म . 30 जुलै 1863 अल्पपरिचय हेन्री फोर्ड हे जगप्रसिध्द अमेरिकन मोटर कंपनी फोर्ड मोटर्स चे संस्थापक अध्यक्ष होते , टी - मॉडेल या सर्वसामान्यांना परवडणाऱ्या फोर्ड कंपनीच्या गाड्यांमुळे ऑटोमोबाईल्स क्षेत्र अमेरिकेला व पर्यायाने जगाला खुले झाले . हेन्री फोर्ड यांनी अनेक नवनवीन कल्पना फोर्ड कंपनीत राबवून फोर्ड कंपनीला यशाच्या शिखरावर पोचविले .  फोर्ड यांच्याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी येथे भेट द्या . शास्त्रीय , नाट्यसंगीत व पार्श्व गायक वसंतराव देशपांडे यांचे निधन . 30 जुलै 1983 अ ल्पपरिचय डॉ . वसंतराव देशपांडे हे प्रसिध्द हिंदुस्तानी शास्...

29 जुलै 2021-July 29

  29 ज ुलै 2021-July 29 प्रसिध्द डच चित्रकार व्हिन्सेंट व्हॉन गॉग यांचे निधन . 29 जुलै 1890 अल्पपरिचय      व्हिन्सेंट व्हॉन गॉग हे जगप्रसिध्द डच चित्रकार होते . दि पोटॅटो इटर्स , दि स्टारी नाइट अशी त्यांची अनेक चित्रे जगप्रसिध्द आहेत . व्हिन्सेंट व्हॉन गॉग यांच्याबद्दल अधिक वाचण्यासाठी येथे भेट द्या . बंगाली समाजसुधारक व विधवा पुर्नविवाहाच्या कायद्याचे प्रणेते इश्चरचंद विद्यासागर यांचे निधन .  29 जुलै 1891 अल्पपरिचय      इश्वरचंद्र विद्यासागर हे प्रसिध्द बंगाली समाजसुधारक होते . लेखक , शिक्षणतज्ञ म्हणूनही त्यांनी कार्य केले . इंग्रज सरकारने संमत केलेल्या विधवा विवाह कायद्याचे प्रणेते म्हणून ते संपूर्ण भारतात ओळखले जातात . हिंदू धर्मातील अनेक अनिष्ट रूढी परंपरा यांना त्यांनी विरोध केला . इश्चरचंद्र विद्यासागर यांच्याविषयी अधिक वाचण्यासाठी येथे भेट द्या . प्रसिध्द उद्योगपती जे . आर . डी . टाटा यांचा जन्म . 29 जुलै 1904 अल्पपरिचय      भारताच्या औद्योगिक क्षेत्रातील आघाडीच्या   टाटा उद्योगसमूहाचे संस्थापक , अध...

28 July 2021- 28 जुलै

  28 July 2021- 28 जुलै वेस्ट इंडिजचे प्रसिध्द क्रिकेटपटू , कर्णधार सर गॅरी सोबर्स यांचा जन्म . 28 जुलै 1936 अल्पपरिचय सर गारफिल्ड सोबर्स तथा गॅरी सोबर्स हे वेस्ट इंडिजचे प्रसिध्द अष्टपैलू क्रिकेटपटू आहेत . सार्वकालिक सर्वोत्तम अष्टपैलू क्रिेकेट खेळाडू म्हणून त्यांना संबोधले जाते . जन्म 28 जुलै 1936 चेल्सी रोड , बे लँड , सेंट मायकेल , बार्बाडोस कार्य प्रसिध्द अष्टपैलू क्रिकेटपटू डाव्या हाताने फलंदाजी व डाव्या हाताने मध्यमगती गोलंदाजी करणारे सोबर्स हे क्रिकेटमधील सार्वकालिक सर्वोत्तम अष्टपैलू मध्ये समावेश असणारे प्रसिध्द क्रिकेटपटू आहेत . वेस्ट इंडिजचे त्यांनी कसोटी क्रिकेटमध्ये प्रभावीपणे नेतृत्वही केले आहे . क्रिकेट कारर्किर्द गॅरी सोबर्स यांनी वेस्ट इंडिजकडून 1954 ते 1974 असे क्रिकेट खेळताना कसोटी सामन्यामध्ये वेस्ट इंडिजचे प्रतिनिधित्व केले ज्यामध्ये 93 सामने खेळताना त्यांनी 30 अर्धशतके ,26 शतके व दोन व्दिशतकासहीत 57.78 च्या कारर्किदीतील सर्वोत्तम सरासरीने 8032 धावांचे योगदान दिले ज्यामध्ये त्यांची सर्वाधिक वैयक्तीक धावसंख्या होती 365 हा वैयक्तीक धा...

27 जुलै 2021-July 27

  27 ज ुलै 2021-July 27 संख्याशास्त्रज्ञ व आहारतज्ञ डॉ . पांडुरंग वासुदेव सुखात्मे यांचा जन्म . 27 जुलै 1911 अल्पपरिचय प्रसिध्द भारतीय संख्याशास्त्रज्ञ , आहारतज्ञ असणाऱ्या डॉ . पांडुरंग वासुदेव सुखात्मे यांची आज जयंती . स्टॅटिस्टिकल थिअरी ऑफ सँपलिंग यामध्ये त्यांनी केलेल्या कामाची विशेष दखल घेतली जाते . भारतीय कृषीसंशोधन व भारताच्या हरीतक्रांतीसंदर्भात त्यांनी केलेले सांख्यिकीय कार्य नावाजले गेले . जन्म 27 जुलै 1911 सध्या बुध , ता . खाटाव , जि . सातारा , महराष्ट्र , भारत आधीचे सातारा संस्थान , ब्रिटीश भारत मृत्यू 28 जानेवारी 1997 पुणे , महाराष्ट्र , भारत शिक्षण बीएस्सी - गणित फर्ग्युसन महाविद्यालय , पुणे पीएचडी - लंडन विद्यापीठ , लंडन , इंग्लंड प्रबंधाचा विषय : बायपार्टिशनल फंक्शन्स कार्य प्रसिध्द संख्याशास्त्रज्ञ व आहारतज्ञ बनारस हिंदू विद्यापीठात सांख्यिकी विभागाचे प्रमुख व प्राध्यापक ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ हायजीन , कलकत्ता येथे प्राध्यापक महाराष्ट्र असोसिएशन फॉर कल्टिव्हेशन ऑफ सायन्स   येथे जीवसांख्यिकी विभागाचे प्रमुख ग्रामीण नियोजन व...

26 जुलै 2021-July 26

  26 ज ुलै 2021 -July 26 लायबेरियाने स्वातंत्र्य घोषीत केले . 26 जुलै 1847 लायबेरिया लायबेरिया म्हणजेच दि रिपब्लिक ऑफ लायबेरिया हा पश्चिम अफ्रिकेतील एक देश असून 26 जुलै 1847 रोजी या देशाने आपले स्वातंत्र्य घोषीत केले . देश : दि रिपब्लिक ऑफ लायबेरिया राजधानी : मोनरोविया राष्ट्रभाषा : इंग्लीश चलन : लायबेरियन डॉलर सीमा : उत्तर - पश्चिमेस सिएरा लिओन , उत्तरेस गयाना , पूर्वेस आयव्हरी कोस्ट , दक्षिणेस अटलांटिक महासागर अर्थव्यवस्था : लायबेरियाची अर्थव्यवस्था लोखंड निर्यात , रबर व लाकूड निर्यातीवर अधिक अवलंबून आहे याचबरोबर परकीय मदत , परकीय थेट गुंतवणूकीवरही हा जगातील एक गरीब अर्थव्यवस्था असलेला देश अवलंबून आहे . प्रसिध्द आयरिश लेखक जॉर्ज बर्नार्ड शॉ यांचा जन्म . 26 जुलै 1856 अल्पपरिचय जॉर्ज बर्नार्ड शॉ हे प्रसिध्द आयरिश लेखक , नाटककार , राजकीय कार्यकर्ते   व नोबेल विजेते साहित्यिक होते . जन्म 26 जुलै 1856 पोर्टोबेलो , डब्लिन , आयर्लंड मृत्यू 02 नोव्हेंबर 1950 हर्टफोर्डशायर , इंग्लंड कार्य प्रसिध्द लेखक , नाटककार , राजकीय कार्यकर्ते व विचारवं...