30 डिसेंबर 2021-30 December
30 डिसेंबर 2021-30 December
प्रसिध्द ब्रिटीश लेखक रूडयार्ड किपलिंग यांचा जन्म. 30 डिसेंबर 1865
अल्पपरिचय
रूडयार्ड किपलिंग तथा जोसेफ रूडयार्ड किपलिंग हे प्रसिध्द
ब्रिटीश लेखक होते. दि जंगल बुक, कॅप्टन
केरजियस, जस्ट सो स्टोरिज
अशी त्यांची अनेक पुस्तके प्रचंड गाजली. 1907 साली साहित्यातील
नोबेल पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले. रूडयार्ड किपलिंग
यांच्याविषयी अधिक माहितीसाठी येथे भेट द्या.
मुंबईचे पहिले गृहमंत्री, साहित्यिक कन्हैयालाल
मुन्शी यांचा जन्म. 30 डिसेंबर 1887
अल्पपरिचय
कन्हैयालाल मुन्शी हे मुंबईचे पहिले गृहमंत्री, भारत सरकारचे हैदराबाद संस्थानसाठी एजंट जनरल व प्रसिध्द साहित्यिक होते.
भारतीय स्वातंत्र्यलढ्यातही मुन्शी यांनी सहभाग घेतला होता. गुजराती व इंग्लीश मध्ये त्यांनी साहित्यलेखन केले. भारत
स्वतंत्र झाल्यानंतरही ते अनेक महत्वाच्या घटनात्मक पदांवर कार्यरत होते. कन्हैयालाल मुन्शी यांच्याविषयी अधिक माहितीकरता येथे भेट द्या.
भारतीय अवकाश कार्यक्रमाचे जनक डॉ. विक्रम साराभाई यांचे निधन. 30 डिसेंबर 1971
अल्पपरिचय
डॉ. विक्रम साराभाई हे प्रसिध्द भारतीय
भौतिकशास्त्रज्ञ, भारतीय अवकाश कार्यक्रमाचे जनक व प्रमुख शास्त्रज्ञ
होते. भारताच्या पहिल्या आर्यभट्ट या उपग्रहाची निर्मिती डॉ.
विक्रम साराभाई यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्याच अहमदाबाद येथील रिसर्च
सेंटरमध्ये करण्यात आली आहे. डॉ. विक्रम
सराभाई यांच्याविषयी अधिक माहितीसाठी येथे भेट द्या.
संगीतकार दत्ता नाईक यांचे निधन. 30 डिसेंबर 1987
अल्पपरिचय
दत्ताराम बाबूराव
नाईक तथा एन. दत्ता हे प्रसिध्द हिंदी चित्रपट
संगीतकार होते.
जन्म
12 डिसेंबर 1927 गोवा, पोर्तुगीज गोवा, पोर्तुगीज भारत सध्या गोवा, भारत
मृत्यू
30 डिसेंबर 1987 मुंबई, भारत
कार्य
प्रसिध्द संगीतकार
दत्ताराम
नाईक यांनी आपल्या कारर्किदीची सुरूवात गुलाम हैदर यांचे सहाय्यक
म्हणून केली. त्यानंतर सचिन देव बर्मन यांच्याबरोबर त्यांनी सहाय्यक
संगीतकार म्हणून कार्य सुरू केले. स्वतंत्र रीतीने कार्य करताना
त्यांनी गीतकार साहिर लुधियानवी, मजरूह सुलतानपुरी, जान निसार अख्तर यांच्यासोबत अनेक गीतांना संगीतबध्द केले.
प्रसिध्द चित्रपट-संगीत
- मिलाप
- मि. एक्स
- धूल का फुल
- नया रास्ता
- अकेला
- राजू
- अपना घर आपनी कहानी
- साधना
- जाल
- जीवन ज्योती
- अंगारे
- बाळा गाऊ कशी अंगाई-मराठी
संदर्भ व आभार
संकल्पना, संकलन व संपादन
भालचंद्र माधव इनामदार
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
Please do not enter any spam link in comment.