01 जानेवारी 2022-01 January 2022
01 जानेवारी 2022-01 January 2022
इंडियन पीनल कोड अस्तित्वात आले. 01 जानेवारी 1862
इंडियन पीनल कोड
इंडियन पीनल कोड-आयपीसी हा भारताचा अधिकृत क्रिमिनल कोड आहे.
क्रिमिनल अर्थात सर्व
गुन्ह्यांचा गुन्हेगारी कायद्यान्वये यामध्ये समावेश असून हा
कोड 1834 च्या पहिल्या लॉ कमिशनच्या शिफारशीनुसार याचा मूळ मसुदा
चार्टर ॲक्ट 1833 नुसार लॉर्ड थॉमस मॅककॅल्युरी यांच्या अध्यक्षतेखाली तयार करण्यात आला. तत्कालीन
ब्रिटीश भारतात हा कोड याच्या तत्काळ प्रभावाने अस्तित्वात आला परंतू स्वायत्त संस्थानांमध्ये
त्यांच्या वैयक्तीक न्यायसंस्था असल्याने तेथे ह्याचा प्रभाव नव्हता. यामध्ये अनेकवेळा बदल करण्यात आला असून आता विविध इतर कायदे व कलमांव्दारे
याचा वापर केला जातो. भारताच्या स्वातंत्र्यानंतर व नंतर स्वायत्त
संस्थाने भारतात विलीन झाल्यानंतर भारतात याचा उपयोग करण्यात येऊ लागला. भारत पाकिस्तान फाळणीमुळे पाकिस्तानात हा कोड पाकिस्तान पीनल कोड म्हणून वापरला
गेला तसेच बंग्लादेश निर्मितीनंतर तेथेही हा कोड वापरला जातो. हा कोड ब्रिटीशांनी नंतर ब्रह्मदेश, सिलोन अर्थात श्रीलंका
तसेच सिंगापूर, ब्रुनेई, मलेशियाचा काही
भाग यामध्येही वेगवेगळ्या नावांनी वापरला जातो.
जेष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांचा जन्म.
01 जानेवारी 1943
अल्पपरिचय
डॉ. रघुनाथ माशेलकर हे प्रसिध्द भारतीय
शास्त्रज्ञ व सीएआयआरचे माजी अध्यक्ष आहेत. हळद, बासमती तांदूळ व कडुलिंब या भारतीय पदार्थांच्या स्वामित्व हक्काविषयी झालेल्या
वादात डॉ. माशेलकरांनी हस्तक्षेप करून हे पदार्थ भारतीय असल्याचे
संपूर्ण जगाला पटवून देत भारताला या पदार्थांचे स्वामित्व हक्क प्रदान करण्यास जागतिक
संस्थांना भाग पाडले. डॉ. माशेलकर यांच्याविषयी
अधिक माहितीकरता येथे भेट द्या.
प्रसिध्द अभिनेते नाना पाटेकर यांचा जन्म. 01 जानेवारी 1951
अल्पपरिचय
नाना पाटेकर तथा विश्वनाथ पाटेकर हे प्रसिध्द मराठी, हिंदी चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक, लेखक व सामाजिक कार्यकर्ते आहेत. दमदार अभिनय,
सामाजिक बांधिलकी, स्पष्टवक्तेपणा या त्यांच्या
अंगभूत गुणांमुळे नाना चित्रपटसृष्टी तसेच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करताना
आपल्याला दिसतात. नाम या त्यांच्या स्वयंसेवी संस्थेव्दारा त्यांनी
सामाजिक प्रश्न तसेच नैसर्गिक आपत्तीमध्ये लोकांना भरीव अशी मदत केली आहे. नाना पाटेकर यांच्याविषयी अधिक माहितीकरता येथे भेट द्या.
सीएसआयआरचे संस्थापक डॉ. शांतीस्वरूप भटनागर
यांचे निधन. 01 जानेवारी 1955
अल्पपरिचय
डॉ. शांतीस्वरूप भटनागर हे प्रसिध्द भारतीय
रसायनशास्त्रज्ञ होते. सीएआयआर म्हणजेच कौन्सिल ऑफ सायंटिफिक
ॲन्ड इंडस्ट्रियल रिसर्च या संस्थेचे शिल्पकार म्हणून त्यांना भारतभरात ओळखले जाते.
डॉ. शांतीस्वरूप भटनागर यांच्याविषयी अधिक माहितीकरता
येथे भेट द्या.
ग्रीनवीच इलेक्ट्रॉनिक टाइम-GET या अंतरराष्ट्रीय प्रमाणवेळेची सुरूवात. 01 जानेवारी
2000
ग्रीनवीच इलेक्ट्रॉनिक टाइम-GET
ग्रीनवीच इलेक्ट्रॉनिक टाइम-Greenwich
Electronic Time-GET ही ई-कॉमर्स, ई-मेल, इंटरनेट अशा इलेक्ट्रॉनिक
सेवांमध्ये वापरण्यासाठी ग्रीनवीच इलेक्ट्रॉनिक टाइम ही अंतरराष्ट्रीय प्रमाणवेळ ब्रिटनने
01 जानेवारी 2000 रोजी निश्चित केली. युरोपियन ऑनलाइन रिटेल संस्था
इंटरॲक्टीव्ह मिडिया इन रिटेल ग्रुप-आयएमआरजी
या संस्थेने ही अंतरराष्ट्रीय प्रमाणवेळ निश्चित केली असून या संस्थेचे आयबीएम व मायक्रोसॉफ्ट
या प्रसिध्द कंपन्या सदस्य आहेत. या प्रमाणवेळेने ऑनलाइन ई कॉमर्स
कंपन्या आपले संगणकीय बदल आयएमआरजी ने दिलेल्या प्रणालीव्दारा करतील ज्यामुळे सर्व
संगणकीय प्रमाणवेळेमध्ये सुसुत्रता आणता येईल असे आयएमआरजीने या संदर्भात म्हटले आहे.
या प्रमाणवेळेने सर्व ऑनलाईन व्यवहारात सुसुत्रता आली.
संदर्भ व आभार
https://en.wikipedia.org/wiki/Code_of_Criminal_Procedure,_1973
संकल्पना, संकलन व संपादन
भालचंद्र माधव इनामदार
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
Please do not enter any spam link in comment.