31 मार्च 2021-31 March
31 मार्च 2021-31 March किर्लोस्कर नाटक मंडळीचे संस्थापक अण्णासाहेब किर्लोस्कर यांचा जन्म. 31 मार्च 1843 अल्पपरिचय बळवंत पांडुरंग किर्लोस्कर तथा अण्णसाहेब किर्लोस्कर हे किर्लोस्कर नाटक मंडळीचे संस्थापक व मराठी संगीत रंगभूमीचे प्रणेते व जेष्ठ नाटककार होते. जन्म 31 मार्च 1843 गुर्लहोसूर,धारवाड,कर्नाटक, आधीचा ब्रिटीश भारत मृत्यू 02 नोव्हेंबर 1885 गुर्लहोसूर, धारवाड,कर्नाटक, आधीचा ब्रिटीश भारत कार्य प्रसिध्द नाटककार व संगीत रंगभूमीचे प्रणेते अण्णासाहेबांनी कालिदासाच्या अभिज्ञान शाकुंतलम नाटकाचे मराठी भाषांतर केले व शाकुंतल नाटक मराठी रंगभूमीवर सादर केले तो दिवस होता 31 ऑक्टोबर 1880. जरी त्यांनी गद्य नाटक शांकरदिग्विजय हे लिहिले असेल तरीही त्यांचा ओढा संगीत नाटकांकडेच होता त्यामुळे त्यांनी त्यांच्या किर्लोस्कर नाटक मंडळींव्दारे संगीत नाटकांची परंपरा चालू केली. अण्णासाहेबांनी लिहिलेली नाटके : शाांकरदिग्विजय अल्लाउद्दीनची चित्तोडगडवरील स्वारी संगीत शाकुंतल संगीत सौभद्र संगीत रामराज्यवियोग सन्मान महाराष्ट्र सरकारव्दारा अण्णासाहेबांच्या स्मृतीनिमित्त संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर...