03 जानेवारी 2022-03 January
03 जानेवारी 2022-03 January
स्त्रीशिक्षणाच्या प्रणेत्या व समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांचा जन्म. 03 जानेवारी 1831
अल्पपरिचय
सावित्रीबाई फुले या स्त्रीशिक्षणाच्या प्रणेत्या व पहिल्या महिला शिक्षिका होत्या. महात्मा जोतिबा फुले यांच्या त्या पत्नी होत्या. पुणे येथे भारतातील मुलींसाठी असलेली पहिली शाळा सावित्रीबाईंनी सुरू केली, या शाळेत त्या पहिल्या महिला शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. स्त्रीशिक्षणासाठी त्यांनी भरीव योगदान दिले. भारतीय स्त्रीयांच्या चाकोरीबध्द आयुष्याला शिक्षणाव्दारे नवा आयाम देण्याचे कार्य त्यांनी केले. भारतातील आजच्या स्त्रीशिक्षणाचे व भारतीय स्त्रीयांच्या प्रगतीचे सारे श्रेय सावित्रीबाई व महात्मा फुले यांच्या शिक्षणाप्रती असलेल्या समर्पणाला जाते. सावित्रीबाईंविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे भेट द्या.
प्रसिध्द निर्माते चेतन आनंद यांचा जन्म. 03 जानेवारी 1915
अल्पपरिचय
चेतन आनंद हे प्रसिध्द हिंदी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक होते. दिग्दर्शन व निर्माते सोबतच पटकथालेखक म्हणूनही ते कार्यरत होते. प्रसिध्द अभिनेते देव आनंद व विजय आनंद यांचे ते बंधू होते. देव आनंद यांच्या नवकेतन फिल्म्स या चित्रपटनिर्मिती संस्थेचे सहसंस्थापक म्हणूनही ते ओळखले जातात. हीर रांझा, हिंदुस्थान की कसम अशा अनेक चित्रपटांचे त्यांनी दिग्दर्शन केले. चेतन आनंद यांच्याविषयी अधिक वाचण्यासाठी येथे भेट द्या.
पुणे येथील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे-NCL उद्घाटन पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याहस्ते झाले. 03 जानेवारी 1950
महाराष्ट्रातील पुणे येथे स्थापन करण्यात आलेली राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा ही भारत सरकारची प्रयोगशाळा असून हिची स्थापना 06 एप्रिल 1947 रोजी करण्यात आली. या प्रयोगशाळेचे उद्घाटन पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 03 जानेवारी 1950 रोजी केले. ही प्रयोगशाळा सीएसआयआरच्या अधिपत्याखाली येते. या प्रयोगशाळेचे पहिले संचालक म्हणून डॉ. जे. डब्लू मैक्बेन हे होते.
अध्यात्म अभ्यासक, लेखक प्रा. के. व्ही. बेलसरे यांचे निधन. 03 जानेवारी 1998
अल्पपरिचय
प्रा. के. व्ही. तथा बाबा बेलसरे हे प्राध्यापक, अध्यात्म व तत्वज्ञानाचे अभ्यासक, लेखक व श्रीक्षेत्र गोंदवले येथील श्री. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे शिष्य होते. प्रा. बेलसरे यांच्याविषयी अधिक माहिती जाणून घेण्याकरता येथे भेट द्या.
इस्त्रोचे माजी अध्यक्ष सतीश धवन यांचे निधन. 03 जानेवारी 2002
अल्पपरिचय
सतीश धवन हे भारतीय अंतराळ संशोधन संस्था-इस्त्रो चे माजी अध्यक्ष व प्रसिध्द गणिततज्ञ व शास्त्रज्ञ होते. फ्लुईड डायनॅमिक्स-प्रायोगिक मधील भारतीय संशोधनाचे ते प्रणेते व पितामह समजले जातात. सतीश धवन यांच्याविषयी अधिक माहितीकरता येथे भेट द्या.
संदर्भ वआभार
संकल्पना, संकलन व संपादन
भालचंद्र माधव इनामदार
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
Please do not enter any spam link in comment.