पोस्ट्स

ऑक्टोबर, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

31 ऑक्टोबर 2021- October 31

  31 ऑक्टोबर 2021 - October 31 भारताचे लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्म . 31 ऑक्टोबर 1875 अल्पपरिचय      सरदार वल्लभभाई पटेल हे भारताचे पहिले गृहमंत्री , उपपंतप्रधान व   काँग्रेसचे प्रसिध्द नेते होते . भारतीय स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी महत्वपूर्ण योगदान दिले . स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री म्हणून त्यांनी स्वातंत्र्यानंतरच्या दंगलींवर नियंत्रण मिळवले व तत्कालीन भारतात अस्तित्वात असणारी संस्थाने जसे की जुनागढ , हैदराबाद , जम्मू - काश्मीर या संस्थानांचे विलिनीकरण करण्यासाठी परिश्रम घेतले , प्रसंगी सैन्यकारवाई व पोलिसकारवाईही केली . भारताचे सार्वभौमत्व अखंडित ठेवून ही व अशी अनेक संस्थाने विलिनीकरण केल्यामुळे त्यांना भारताचे लोहपुरूष म्हणून संबोधण्यात आले . सरदार वल्लभभाई पटेल यांच्याविषयी   माहिती जाणून घेण्यासाठी येथे भेट द्या . भारतात आलेल्या महाविध्वंसकारी चक्रीवादळात दोन लाखांहून अधिक जीवितहानी . 31 ऑक्टोबर 1876 1876 बंगाल चक्रीवादळ      भारतात 29 ऑक्टोबर 1876 पासून सुरू झालेल्या बकरगंज , ब्रिटीश भारत सध्या बरीसल , ...

30 ऑक्टोबर 2021- October 30

इमेज
  30 ऑक्टोबर 2021 - October 30 बंगाली लेखक व कवी सुकुमार रॉय यांचा जन्म . 30 ऑक्टोबर 1887 अल्पपरिचय      सुकुमार रॉय तथा सुकुमार रे   हे बंगाली कवी व लेखक होते , व थोर बंगाली कवी लेखक रविंद्रनाथ टागोर यांचे शिष्य होते . बालकविता व बालकथा यामध्ये त्यांनी विपुल लेखन केले आहे . प्रसिध्द बंगाली चित्रपट निर्माते , दिग्दर्शक सत्यजित रे यांचे ते वडील होते . जन्म 30 ऑक्टोबर 1887 कलकत्ता , बंगाल , ब्रिटीश भारत मृत्यू 10 सप्टेंबर 1923 कलकत्ता , बंगाल , ब्रिटीश भारत शिक्षण प्रेसिडन्सी कॉलेज , कलकत्ता व लंडन कॉलेज ऑफ कम्युनिकेशन कार्य प्रसिध्द बंगाली कवी व लेखक प्रसिध्द साहित्य अबोल टबोल पगला दासू खाई - खाई हा जा बा रा ला हेशोराम हुशियार डायरी झालपाला ओ ओन्यान्यो - नाटक बोहुरूपी चालचित्तचांचरी अबक जलपान भासार अत्याचार देश - बिदेशेर गोलपो भारतीय अणूशास्त्रज्ञ डॉ . होमी जहाँगीर भाभा यांचा जन्म . 30 ऑक्टोबर 1909 अल्पपरिचय      डॉ . होमी जहाँगीर भाभा हे प्रसिध्द भारतीय अणू - भौतिकशास्त्रज्ञ , अभियंते व गणित...

29 ऑक्टोबर 2021- October 29

  29 ऑक्टोबर 2021 - October 29 महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्थेची स्थापना . 29 ऑक्टोबर 1894 महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक  संस्था   महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्था ही 29 ऑक्टोबर 1894 साली डेक्कन व्हर्नाक्युलर ट्रान्सलेशन सोसायटी नावाने स्थापन झालेली उत्कृष्ट मराठी साहित्य , ग्रंथांना पुरस्कार देऊन प्रोत्साहनाचे कार्य करते . या संस्थेच्या संस्थापकांमध्ये न्या . म . गो . रानडे , लोकमान्य बाळ गंगाधर टिळक , डॉ . रामकृष्ण भंडारकर आदी सहीत 25 साहित्यप्रेमी व्यक्तींचा   समावेश होतो . महाराष्ट्र शासन अनुदानप्राप्त ही संस्था असून महाराष्ट्रात साहित्य संस्कृती रूजविण्याचे कार्य ही संस्था करते . संस्थेच्या कार्याचा आढावा महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्था सर्वांत जुनी साहित्य संस्था म्हणून महाराष्ट्रात कार्यरत आहे , संस्थेतर्फे उत्कृष्ट पुस्तके व ग्रंथांना पारितोषिके दिली जातात . विविध जुन्या कागदपत्रांचे , साहित्याचे योग्य पध्दतीने जतन करण्याचे कार्य संस्था करते त्यामध्ये न्या . रानडे यांचा पत्रव्यवहार तसेच अन्य महत्वाच्या कागदपत्रांचा समावेश आहे . मराठी भाषा संवर्धनाचे व शि...

28 ऑक्टोबर 2021-28 October

  28 ऑक्टोबर 2021 -28 October जर्मन विचारवंत मॅक्सम्यूलर यांचे निधन . 28 ऑक्टोबर 1867 अल्पपरिचय      मॅक्सम्यूलर हे जर्मन विचारवंत होते . भारतीय संस्कृती , वेद , उपनिषदे , पुराणे या सर्वांचा त्यांचा गाढा अभ्यास होता . ऋग्वेदाचे त्यांनी देवनागरी लिपी मध्ये रूपांतर करून ऑक्सफर्ड विद्यापीठ प्रेसव्दारे प्रकाशित केले . आपल्या अनेक पुस्तकांत त्यांनी भारतीय तत्वज्ञान , संस्कृती तसेच जगातील इतर धर्मांचा तुलनात्मकदृष्ट्या उहापोह केलेला आहे . मॅक्सम्यूलर यांचे तत्वज्ञान अधुनिक भारतीय शिक्षणव्यवस्थेचा पाया आहे असे समजले जाते . मॅक्सम्यूलर यांच्याविषयी अधिक माहितीकरता येथे भेट द्या . इटलीचा ग्रीसवर हल्ला . 28 ऑक्टोबर 1940 इटली - ग्रीस युध्द 1940      दुसऱ्या महायुध्दादरम्यान 28 ऑक्टोबर 1940 ला इटलीने अल्बानिया मार्गे ग्रीसवर हल्ला केला व इटली व ग्रीस यांच्यात युध्द सुरू झाले . या युध्दाची पार्श्वभूमी अशी की , इटलीचा तत्कालीन पंतप्रधान बेनिटो मुसोलिनी याने ग्रीसला बाल्कन समुद्रात इटलीला तळ करण्यासाठी जागा द्यावी यासाठी निर्वाणीचा इशारा दिला तो ग्...

27 ऑक्टोबर-October 27-World Day Of Audio-Visual Heritage

 - 27 ऑक्टोबर -October 27- World Day Of Audio-Visual Heritage  World Day Of AudioVisual Heritage 27 ऑक्टोबर 2021      वर्ल्ड डे ऑफ ऑडिओ - व्हिज्युएल हेरिटेज दरवर्षी 27 ऑक्टोबरला साजरा केला जातो . युनेस्कोने या दिवसाची सुरूवात 2005 पासून केली . युनेस्कोच्या 33 व्या सर्वसाधारण बैठकीत 27 ऑक्टोबर हा दिवस World day of Audio Visual Heritage साठी निश्चित केला गेला . ऑडिओ - व्हिज्युएल वारसा म्हणजेच असा वारसा संग्रह ज्यामधून पुरातन मानवी जीवनाची संगीत , छायाप्रत किंवा चित्रे यामाध्यमातून सध्याच्या जगाला नव्याने ओळख होणे . यामध्ये चित्रफिती , आकाशवाणी - दूरचित्रवाणी कार्यक्रम , विविध जुन्या ध्वनीचित्रफिती , चित्रे आशांचा समावेश होतो . हा दिवस साजरा करण्यामागची कारणे : वारसा जतन करण्याबद्दल जनजागृती वाढविणे . स्थानिक , राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय वारसा जपणे व त्या वारश्याचा अभिमान बाळगत तो साजरा करण्यासाठी संधी निर्माण करणे . वारसा संग्रह सुनियोजित ठेवणे जेणेकरून तो सगळ्यांना विशेषत : दिव्यांगाना पाहण्यासाठी उपलब्ध असेल . वारसा स्थळ व इतर गोष्टींच्या प्रश्नाबद्...

26 ऑक्टोबर 2021-26 October

  26 ऑक्टोबर 2021-26 October संत नामदेव यांचा जन्म . 26 ऑक्टोबर 1270 अल्पपरिचय      संत नामदेव तथा नामदेव दामाजी रेळेकर हे वारकरी पंथातील ज्ञानदेवांपासून सुरू झालेल्या संतपरंपरेतील आघाडीचे संत होते . संत नामदेवांनी महाराष्ट्र तसेच पंजाबात अध्यात्मिक कार्य केले , भागवतधर्माचा देशभर प्रचार व प्रसार केला . विविध अभंग , ओव्या व साहित्यातून ईश्वरभक्ती व मानवतेचे दर्शन त्यांनी घडविले . पंढरपुर येथे   विठ्ठलमंदिरात त्यांनी विठ्ठलमंदिराच्या पायरीवर समाधी घेतल्यामुळे त्या ठिकाणाला नामदेवाची पायरी असे संबोधले जाते . संत नामदेवांविषयी अधिक जाणून घेण्याकरता येथे भेट द्या . जपानचे पहिले पंतप्रधान इटो हिरोबुमी यांचे निधन . 26 ऑक्टोबर 1909 अल्पपरिचय इटो हिरोबुमी हे   राजकीय नेते , वरिष्ठ मुसद्दी होते . जपानचे तत्कालीन सम्राट मेजी यांच्या कार्यकाळात ते जपानचे पहिले पंतप्रधान होते . जपानची मेजी राज्यघटना तयार करण्यामध्येही त्यांचा महत्वाचा सहभाग होता . जन्म 16 ऑक्टोबर 1841 सुकारी , यमागुची , जपान मृत्यू 26 ऑक्टोबर 1909 हरबीन , हेलांगजियान , चीन शि...

25 ऑक्टोबर 2021- 25 October

  25 ऑक्टोबर 2021 - 25 October ह वादाबमापीचा संशोधक टॉरिसोली यांचे निधन . 25 ऑक्टोबर 1647 अल्पपरिचय      इव्हानजेलिस्टा टॉरिसोली हे इटालियन शास्त्रज्ञ होते . गणिततज्ञ व पदार्थ विज्ञान शास्त्रज्ञ असलेल्या टॉरिसोली यांनी अनेक महत्वाचे शोध लावले . टॉरिसोली यांनी लावलेल्या शोधांमध्ये हवादाबमापी अर्थात बॅरोमीटर , टॉरिसोली व्हॅक्युम , टॉरिसोली लॉ यांचा समावेश होतो . टॉरिसोली यांच्याविषयी अधिक जाणून घेण्याकरता येथे भेट द्या . टोरांटो स्टॉक एक्चेंज सुरू झाले . 25 ऑक्टोबर 1861 टोरांटो स्टॉक एक्चेंज टोरांटो स्टॉक एक्चेंज अर्थात टोरांटो शेअर बाजार हा कॅनडाची राजधानी टोरांटो मधील प्रमुख शेअरबाजार असून याची स्थापना 25 ऑक्टोबर 1861 रोजी करण्यात आली . टिएमएक्स ग्रुप कडे याची मालकी असून हा कॅनडाचा सर्वात मोठा , उत्तर अमेरिकेतील तिसरा तर जगातील आकरावा सर्वांत मोठा शेअरबाजार आहे . नाव : टोरांटो स्टॉक एक्चेंज ठिकाण : टोरांटो , ऑंटारिओ , कॅनडा सुची : टोरांटो शेअरबाजारात कोणत्याही शेअरबाजारापेक्षा जास्त तेल , वायू व खाण कंपन्या सूचीबध्द आहेत . सुमारे 2231 हून अधिक...

24 ऑक्टोबर 2021- जागतिक पोलिओ दिन-World Polio Day

  24 ऑक्टोबर 2021- जागतिक पोलिओ दिन विशेष October 24 - World Polio Day जागतिक पोलिओ दिन . 24 ऑक्टोबर 2021 जागतिक पोलिओ दिन जागतिक पोलिओ दिन तथा वर्ल्ड पोलिओ डे हा दरवर्षी 24 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो . रोटरी इंटरनॅशनलतर्फे हा दिवस साजरा केला जातो . जोनास साल्क यांनी पोलिओमायलिटिस अर्थात पोलिओ विरूध्द पहिल्या लस निर्मिती करणाऱ्या संघाचे नेतृत्व केले होते . जोनास साल्क यांच्या याच कामगिरीनिमित्त त्यांचा जन्मदिन हा जागतिक पोलिओ दिवस म्हणून साजरा केला जातो . जोनास साल्क यांची निष्क्रिय विषाणू असलेली लस व पुढे अल्बर्ट सबिन यांनी तयार केलेली सध्या मोठ्या प्रमाणावर दिली जाणारी तोंडावाटे दिली जाणारी लस यामुळे जगातील पोलिओचे संक्रमण संपविण्यासाठी पोलिओ निर्मुलन चळवळ मोठ्या प्रमणात सुरू झाली . सध्या जगातील 99.09%  पोलिओ संपुष्टात आला असून अफगाणिस्तान व पाकिस्तानमध्ये अजूनही पोलिओचा सक्रीय विषाणू आहे . भारताने सुनियोजित , व्यापक   लसीकरण व आरोग्य यंत्रणेव्दारे पोलिओवर मात केली असून जागतिक आरोग्य संघटनेने भारताला तसे प्रमाणपत्र 27 मार्च 2014 रोजी दिलेले आहे . पोलि...