02 January 2022- 02 जानेवारी
02 January 2022- 02 जानेवारी
मराठा हे वृत्तपत्र लोकमान्य टिळकांनी सुरू केले.
02 जानेवरी 1881
मराठा वृत्तपत्र
मराठा हे इंग्रजी तर केसरी हे मराठी वृत्तपत्र लोकमान्य टिळक आणि आगरकर यांनी 1881 च्या 02जानेवारीला सुरू केली. सुरवातीला मराठा ह्या वृत्तपत्राचे संपादकपद टिळकांनी स्वतः घेतले होते व केसरीचे संपादकपद आगरकरांकडे होते. पुढे टिळक व आगरकर यांच्यमध्ये मतभेद झल्यामुळे टिळकांनी केसरीचे संपादकपद स्वीकारले व सुमारे 500 हून अधिक अग्रलेखातून इंगरजांविरुध्द जनतेचे स्वातंत्र्यासाठी जनजागृतीचे कार्य केले. ही दोन्ही वृत्तपत्रे पुढील एका वर्षातच प्रचंड लोकप्रिय ठरली. भारताच्या स्वातंत्र्यासाठी लोकांना एकजूट करण्याचे कार्य ह्या दोन्ही वृत्तपत्रांनी केले.
प्रसिद्ध समाजसुधारक व लेखक महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे निधन. 02 जानेवारी 1944
अल्पपरिचय
महर्षी विठ्ठल रामजी शिंदे हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध समाजसुधारकांपैकीं एक समाजसुधारक व लेखक होते. धर्मसंस्था, समाजकारण यामध्ये त्यांनी कार्य केले. समाजातील अनिष्ट रूढी परंपरांना त्यांनी कडाडून विरोध केला. अस्पृश्य समाजाच्या उन्नतीसाठी कार्य करताना त्यांनी डिप्रेस्ड क्लास मिशन या संस्थेची स्थापना करून या संस्थेद्वारे अस्पृश्य समाजाला समाजाच्या मुख्य प्रवहात आणण्यासाठी प्रयत्न केले. महर्षी शिंदे यांच्याविषयी अधिक माहिती घेण्यासाठी येथे भेट द्या.
क्रिकेटपटू रमण लांबा यांचा जन्म 02 जानेवारी 1960
अल्पपरिचय
रमण लांबा हे प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटू होते. भारतीय संघाचे त्यांनी 1987 ते 1989 असे दोन वर्ष प्रतिनिधित्व करताना प्रथमश्रेणी, एकदिवसीय व कसोटी सामन्यात प्रतिनिधित्व केले. ढाका प्रीमियर लीग स्पर्धेचा अंतिम सामना खेळत असताना प्रतिस्पर्धी संघातील फलंदाजाचा फटका वर्मी लागल्याने लांबा यांचा सामन्यानंतर तीनच दिवसात दुर्देवी मृत्यू झाला. लांबा यांच्याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे भेट द्या.
.संदर्भ व आभार
संकल्पना,संकलन व संपादन
भालचंद्र माधव इनामदार
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
Please do not enter any spam link in comment.