28 जून 2021-28 June
28 जून 2021-28 June
व्हिक्टोरिया राणीचा राज्याभिषेक 28 जून 1838
राणी व्हिक्टोरियाचा राज्याभिषेक
राणी व्हिक्टोरिया तथा ॲलेक्झांड्रिना व्हिक्टोरिया ही इंग्लंड व आर्यर्लंडची
राणी होती. ब्रिटनचे राजे चौथे विल्यम यांचा 20 जून 1838 रोजी निधन झाले त्यांची मुले
अकाली निधन पावल्यामुळे व्हिक्टोरिया राणीकडे राज्यकारभार आला व तिचा 28 जून 1838 रोजी
विधिवत राज्याभिषेक करण्यात आला. व्हिक्टोरिया राणीचा राज्यकारभार सुमारे 63 वर्षे
चालला, या इतक्या दीर्घकालीन कार्यामुळे या काळाला आदराने व्हिक्टोरियन युग असे संबोधले
जाते. राणी व्हिक्टोरिया यांच्याबद्दल अधिक वाचण्यासाठी येथे भेट द्या.
ॲडॉल्फी सॅक्स याने सॅक्सोफोनचे पेटंट घेतले. 28 जून 1846
सॅक्सोफोन
सॅक्सोफोन हे एक प्रसिध्द वाद्य असून त्याची निर्मिती ॲडॉल्फी सॅक्स याने
1840 साली केली. 28 जून 1846 रोजी सॅक्सोफोनचे पेटंट पॅरिस, फ्रान्स येथे घेतले. ब्रासपासून
बनविलेले हे वाद्य अनेक प्रकारच्या बॅण्डमधील प्रमुख वाद्य असते. लष्करी बॅण्ड मध्येही
याचा समावेश असतो. सॅक्सोफोन व ॲडॉल्फी सॅक्स यांच्याबद्दल अधिक माहितीसाठी येथे भेट द्या.
भारताचे माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंह राव यांचा जन्म. 28 जून 1921
अल्पपरिचय
पी.व्ही. नरसिंह राव हे भारताचे नववे पंतप्रधान होते. भारतीय राष्ट्रीय
काँग्रेसचे अध्यक्ष, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणूनही त्यांनी काम पाहिले. पी.व्ही.
नरसिंह राव यांच्याबद्दल अधिक वाचण्यासाठी येथे भेट द्या.
वेस्ट इंडिजचे कसोटीपटू रॉय गिलख्रिस्ट यांचा जन्म. 28 जून 1934
अल्पपरिचय
रॉय गिलख्रिस्ट हे वेस्ट इंडिजचे कसोटीपटू व वेगवान गोलंदाज होते.
जन्म
28 जून 1934 सीफोर्थ,सेंट थॉमस,जमैका
मृत्यू
18 जुलै 2001 पोर्टमोर, सेंट कॅथरिन, जमैका
कार्य
प्रख्यात वेस्ट इंडिजचे कसोटीपटू
वेस्ट इंडिज साठी क्रिकेट-1957-1959
क्रिकेट कारर्किर्द
रॉय गिलख्रिस्ट हे उजव्या हाताने वेगवान गोलंदाजी करायचे. 13 कसोटींमध्ये
वेस्ट इंडिजचे प्रतिनिधित्व करताना त्यांनी 26.68 च्या सरासरीने 57 बळी घेतले ज्यामध्ये
55 धावांत सहा बळी ही त्यांची सर्वोत्तम कामगिरी ठरली. प्रथमश्रेणीत त्यांनी 26 च्या
सरासरीने 42 सामने खेळताना 167 बळी मिळविले, 16 धावात सहा बळी ही त्यांची प्रथमश्रेणीतील
सर्वोत्तम कामगिरी राहिली.
उद्योजक दादासाहेब जोग यांचे निधन. 28 जून 2000
अल्पपरिचय
विष्णू महेश्वर जोग तथा दादासाहेब जोग हे प्रसिध्द जोग इंजिनियरिंग कंपनीचे
संस्थापक अध्यक्ष होते. स्थापत्य क्षेत्रातील या कंपनीला प्रसिध्दीस आणण्याचे कार्य
केले.
जन्म
06 एप्रिल 1927 वाई, जि.सातारा, ब्रिटीश भारत
मृत्यू
28 जून 2000
शिक्षण
स्थापत्य अभियांत्रिकीचे पुणे येथील कॉलेज ऑफ इंजिनियरिंग पुणे येथून
शिक्षण
कार्य
सुरूवातीला मध्य प्रांत व मुंबई राज्यात नोकरी
प्रसिध्द जोग इंजिनियरिंग कंपनीचे संस्थापक
1952 साली त्यांनी जोग इंजिनिरिंग कंपनीची स्थापना केली.
हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडावर जाण्यासाठीचा रोपवे बांधण्याचे
महत्वाचे कार्य जोग यांच्या कंपनीने केले आहे. त्याचे उद्घाटन 03 एप्रिल 1996 रोजी
झाले.
संदर्भ व आभार
संकल्पना,संकलन व संपादन
भालचंद्र माधव इनामदार
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
Please do not enter any spam link in comment.