22 जानेवारी 2021
22 जानेवारी
2021
ब्रिटनची राणी व्हिक्टोरियाचे निधन. 22 जानेवारी 1901
अलेक्झंड्रिना व्हिक्टोरिया तथा राणी व्हिक्टोरिया ही ग्रेट ब्रिटन
व आर्यलंडची प्रदिर्घ काळ राज्यकर्ती होती.
तब्बल 63 वर्षे सात महिने सत्तेवर असलेली राणी व्हिक्टोरिया हिच्या कारर्किदीत ब्रिटनची
आर्थिक,सामाजिक,राजकीय,औद्योगिक अशा सर्वच क्षेत्रात भरभराट झाली. राणी व्हिक्टोरियाच्याच
कारर्किदीत ब्रिटीश सत्तेचा अंमल अधिकृतपणे
भारतात सुरू झाला. जो आधी पर्यंत ईस्ट इंडिया कंपनीकडे होता. राणी व्हिक्टोरियाला
ब्रिटीश संसदेने एंप्रेस ऑफ इंडिया अर्थात हिंदुस्थानची राणी असा किताब दिला.
24 मे 1819 केझिंग्टन पॅलेस,लंडन युनायटेड किंग्डम
मृत्यू
22 जानेवारी 1901 ऑस्बर्न,युनायटेड किंग्डम
ग्रेट ब्रिटन व आर्यलंडची राणी व प्रमुख राज्यकर्ती
हिंदुस्थानची सम्राज्ञी
राणी व्हिक्टोरियाचा भारतासाठीचा जाहीरनामा राणीचा जाहीरनामा म्हणून
प्रसिध्द आहे.
राणी व्हिक्टोरिया हीचा काळ व्हिक्टोरियन युग म्हणून ओळखला जातो. या
काळात इंग्लंडची अर्थात युनायटेड किंग्डमची राजकीय,सामाजिक,आर्थिक,सांस्कृतिक अशा सर्वच
गोष्टीत प्रगती झाली. याच काळात ब्रिटीश सत्ता भारतावर राज्यकर्ती झाली, त्यामुळेच
राणी व्हिक्टोरियाला हिंदुस्थानची सम्राज्ञी असा किताब मिळाला.
लॉर्ड मेलबर्न,रॉबर्ट पील,बेंजमिन डिझरेली,लॉर्ड पामस्टर्न,रॉबर्ट सेसिल
अशा अनेक पंतप्रधानांचे राणीला सहकार्य मिळाले.
राणी व्हिक्टोरियाच्या काळात तीन युध्दे झाली जी ब्रिटनची सत्ता जगभर
पसरायला सर्वार्थाने महत्वाची होती. चीनबरोबरचे अफूचे युध्द,रशियाविरूध्द क्रिमियन
युध्द,बोअर युध्द या सर्व युध्दात ब्रिटनला विजय मिळाला व ब्रिटीश सत्ता जागतिक नकाशावर
अधिकच दृढ झाली.
राणी व्हिक्टोरियाच्या काळात सार्वत्रिक मतदानाचा हक्क,गुप्त मतदानपध्दती,पराक्रमी
विरांना व्हिक्टोरिया क्रॉस देण्याची पध्दत,कॉन्झर्वेटिव्ह व लिबरल या पक्षांचा उदय
असे अनेक महत्वाचे निर्णय घेतले गेले.
पुस्तके
लीव्ह्ज फ्रॉम द जर्नल ऑफ अवर
लाइफ इन द हायलँड्स-दैनंदिनी 1
मोअर लीव्हज-दैनंदिनी 2
वरील दोन्ही राणी व्हिक्टोरियाने लिहिलेल्या दैनंदिनींतून राणीने तिचा
जीवनप्रवास मांडला आहे.
हिंदी व बंगाली चित्रपट दिग्दर्शक तसेच पटकथालेखक सत्येन बोस यांचा जन्म. 22 जानेवारी 1916
सत्येन बोस हे हिंदी व बंगाली चित्रपट दिग्दर्शक व पटकथालेखक होते.
चलती का नाम गाडी,दोस्ती असे त्यांचे अनेक
चित्रपट प्रचंड गाजले.
22 जानेवारी 1916 कलकत्ता, ब्रिटीश भारत
मृत्यू
09 जून 1993 मुंबई,महाराष्ट्र,भारत
हिंदी तसेच बंगाली भाषेतील प्रसिध्द चित्रपट दिग्दर्शक व पटकथालेखक
प्रसिध्द चित्रपट
- परिबर्तन-बंगाली
- जागृती
- चलती का नाम गाडी
- दोस्ती
- रात और दिन
- आंसू बन गये फूल
- जीवन मृत्यू
हिंदी चित्रपट निर्माते विजय आनंद यांचा जन्म. 22 जानेवारी 1934
विजय आनंद तथा गोल्डी आनंद हे प्रसिध्द हिंदी चित्रपट निर्माते,अभिनेते,पटकथालेखक
होते व अभिनेते देव आनंद यांचे बंधू होते.
22 जानेवारी 1934 गुरूदासपूर,ब्रिटीश भारत, आताचे गुरूदासपूर,पंजाब
मृत्यू
23 फेब्रुवारी 2004 मुंबई,महाराष्ट्र,भारत
प्रसिध्द हिंदी चित्रपट निर्माते
नवकेतन फिल्म्स या आनंद यांच्या चित्रपटनिर्मिती संस्थेसाठी त्यांनी
अनेक चित्रपटांची निर्मिती केली.
तेरे घर के सामने
कला बझार
नौ दो ग्यारह
गाइड
तिसरी मंझील
ज्वेल थीफ
कोरा कागज
तेरे मेरे सपने
जॉनी मेरा नाम
छुपा रूस्तम
फिल्मफेअर पुरस्कार गाइड,जॉनी मेरा नाम या चित्रपटांसाठी
समाजसुधारक,शिक्षणतज्ञ स्वामी रामानंद तिर्थ यांचे निधन. 22 जानेवारी 1972
स्वामी रामांनद तिर्थ तथा व्यंकटेश भगवान
खेडगीकर हे प्रसिध्द समाजसुधारक,शिक्षणतज्ञ व स्वांतंत्र्यसेनानी होते. त्यांनी केलेल्या
कार्यामुळे स्वामी रामानंद तिर्थ यांचे नाव मराठवाडा विद्यापीठाला देण्यात आले आहे.
स्वामी रामानंद तिर्थ यांच्याविषयी अधिक वाचण्यासाठी येथे भेट द्या.
संदर्भ व आभार
संकल्पना,संकलन व संपादन
भालचंद्र माधव इनामदार
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
Please do not enter any spam link in comment.