दिनविशेष 06-11-2020

 दिनविशेष  06-11-2020

06-11-2020 चा दिनविशेष जाणून घ्यायचा असेल तर आपण आजचा दिनविशेष दाखवा असे गुगलवर सर्च करतो याप्रमाणेच येथे या ब्लॉगपोस्ट व्दारे आम्ही आजचे दिनविशेष आपल्यासाठी घेऊन आलो आहोत पूर्ण दिनविशेष जाणून घेण्यासाठी ही पोस्ट पूर्ण वाचा. 

सॅक्सोफोन  वाद्याचे जनक ॲडोल्फी  सॅक्स यांचा जन्म. 06-11-1814

अल्पपरिचय

ॲडोल्फी  सॅक्स उर्फ एंटेइन - जोसेफ सॅक्स  हे बेल्जीयन शोधक व संगीतकार होते. 1840 च्या दशकात त्यांनी सॅक्सोफोन हे वाद्य शोधले व 1846 साली त्याचे पेटंट घेतले. सॅक्सट्रोम्बा,सॅक्सहॉर्न व सॅक्सट्युबा या वाद्यांचा देखील त्यांनी शोध लावला. ते सतार व बासरी वाजवत असत.

जन्म

06-11-1814‍ डिअँट साउथ नेदरलॅंड्स, सध्याचे बेल्जियम

मृत्यू

07-02-1894 पॅरिस ,फ्रान्स

शिक्षण
ॲडोल्फी सॅक्स यांचे आईवडील चार्ल्स - जोसेफ सॅक्स व मेरी जोसेफ  दोघेही वाद्यनिर्मिती करायचे ज्यांनी फ्रेंच हॉर्न या वाद्यात बरीच सुधारणा केली होती.  यांच्यापासूनच प्रेरणा घेऊन ॲडॉल्फीने आपली स्वत:ची वाद्यनिर्मिती करायला लहानपणापासूनच सुरवात केली. एका स्पर्धेसाठी सतार व बासरी त्यांनी वयाच्या 15 व्या वर्षी तयार केली होती. या वाद्यांचे पारंपारिक शिक्षणही त्यांनी घेतले.

कार्य

  • रॉयल कॉन्झर्वेटरी ब्रुसेल्स साठी आवाज देण्याचे काम केले.
  • बासच्या सनई मध्ये सुधारणा करून वयाच्या 24 व्या वर्षी त्याचे पेटंट ॲडॉल्फी यांनी घेतले.
  • 1840 साली सॅक्सोफोनची निर्मिती, तसेच त्याचे 1846 साली पेटंट घेतले.
  • 1842 साली पॅरिसला स्थलांतरीत झाल्यानंतर त्यांनी अनेक वाद्यांची निर्मिती तसेच सुधारणा केल्या.
  • सॅक्सोफोन व्यतरिक्त ॲडोल्फी यांनी सॅक्सट्रॉम्बा,सॅक्सहॉर्न,सॅक्सट्युबा,6-पिस्टन ट्रॉम्बोन,बासचा सॅक्सहॉर्न या इतर वाद्यांची देखील निर्मिती केली.
  • सॅक्सोफोन निर्मिती मुळे त्यांना खूप प्रसिध्दी मिळाली व याच वाद्यामुळे पॅरिस कॉन्झर्वेटरी मध्ये शिक्षकाची नोकरीही मिळाली.

पुरस्कार व सन्मान

  • फ्रान्सचा  सर्वोच्च मिलिटरी ऑर्डरचा   लिजीयन ऑनर मधील चेव्हॅलियर रँक प्रदान 1849
  • पॅरिस अंतरराष्ट्रीय प्रदर्शनात पहिला ग्रॅड प्रिक्स डी ला फॅक्टर इंस्टुमेंटल पुरस्कार 1867
  • बेल्जीयन फ्रँक नोटेवर प्रतिमा देण्यात आली 1995
  • गूगलने ॲडॉल्फी यांच्या 201 व्या जन्मदिनी गूगल डूडल समर्पित केले. 2015

अभिनेते संजीवकुमार यांचे निधन. 06-11-1985

अल्पपरिचय

हरी जरीवाला उर्फ संजीवकुमार आपल्या कसदार अभिनयाने भूमिकेत प्राण ओतणारा अभिनेता असे संजीवकुमार यांचे वर्णन करता येईल. संजीवकुमार यांनी अनेक प्रसिध्द चित्रपटांतून आपल्या सशक्त अभिनयाचे दर्शन‍ रसिकांना घडविले उदा. शोले चित्रपटातील ठाकूर ची भूमिका लोक विसरूच शकत नाहीत. अशा या अभिनेत्याचे अवघ्या 47 व्या वर्षी ह्मद्यविकाराने निधन झाले.

जन्म

09-07-1938 सुरत,ब्रिटीश इंडिया सध्याचा  गुजरात

मृत्यू

06-11-1985 मुंबई,महाराष्ट्र

कार्य

हिंदी चित्रपटांतील प्रसिध्द अभिनेता

प्रसिध्द चित्रपट

  • हम हिंदूस्थानी
  • आँधी
  • खिलौना
  • मनचली
  • शोले
  • अंगूर
  • नमकीन
  • दस्तक
  • कोशीश
  • शिकार
  • मौसम
  • जिंदगी
  • ये है जिंदगी
  • देवता
  • पती पत्नी और वो
  • अर्जुन पंडित

पुरस्कार

  • सर्वोकृष्ट अभिनेता- फिल्मफेअर- आँधी, अर्जुन पंडित
  • सर्वोकृष्ट सहाय्यक अभिनेता-शिकार
  • सर्वोकृष्ट अभिनेता-राष्ट्रीय पुरस्कार-दस्तक व कोशीश

संजीवकुमार फाँडेशनव्दारे दरवर्षी संजीवकुमार यांच्या स्मृतीप्रत्यर्थ  सर्वोकृष्ट अभिनेता, दिग्दर्शक व बॅकस्टेज तंत्रज्ञ यांना पुरस्कार व रोख बक्षीसे दिली जातात. तसेच फाँडेशनव्दारे शिक्षण,आरोग्य,पर्यावरण,संस्कृती आणि पोषण या क्षेत्रांत काम केले जाते.

लेखक व अभिनेते भालबा केळकर यांचे निधन.06-11-1987

अल्पपरिचय

भालबा उर्फ भालचंद्र वामन केळकर हे रसायनशास्त्राचे प्राध्यापक, नाट्यअभिनेते तसेच लेखक होते.

जन्म

23-09-1920

मृत्यू

06-11-1987

कार्य

  • फर्ग्युसन महाविद्यालयात रसायनशास्त्राचे प्राध्यापक
  • प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशन या नाट्यसंस्थेचे संस्थापक
  • नाट्यअभिनेते,दिग्दर्शक व मराठी लेखक म्हणून कार्य

प्रसिध्द नाटके-दिग्दर्शन

  • प्रेमा तुझा रंग कसा
  • वेड्याचे घर उन्हात
  • तू वेडा कुंभार

प्रसिध्द नाटके-अभिनय

  • जोशी काय बोलतील?
  • दोन ध्रुवांवर दोघे आपण
  • तू वेडा कुंभार
  • बनगरवाडी
  • विझले सारे नंदादीप
  • वेड्याचं घर उन्हात
  • नामा सातपुते
  • राजमुकुट
  • मोदी ॲन्ड मोदी
  • प्रेमा तुझा रंग कसा?
  • सती
  • भ्रमाचा भोपळा
  • भावबंधन
  • लग्नाची बेडी
  • जगन्‍नाथाचा रथ
  • भावबंधन 

साहित्य

  • असा देव, असे भक्त
  • ओळखीच्या म्हणी - कथांच्या खाणी
  • क्रिकेटचा खेळ आणि इतर गोष्टी
  • गुरूवरचा माणूस
  • तलावातील रहस्य
  • तो तो नव्हताच
  • प्राचीन भारतीय शास्त्रज्ञ आणि संशोधक
  • रंजक विज्ञान - प्रयोग
  • लोखंडी राक्षसाचा पराभव
  • वाल्मिकी रामायण (सेट)
  • शेरलॉक होम्सच्या चातुर्यकथा (भाग १ ते ६)
  • संपूर्ण महाभारत (भाग १ ते ८)
  • हवा तसा रंग - हवा तसा आकार
  • ही रक्तरेषा कधी पुसली जाईल का?

आजचे 06-11-2020 पुरस्कार व सन्मान  दिनविशेष  06-11-2020

  • ’जमनालाल बजाज आंतरराष्ट्रीय पुरस्कार’ ’अर्जेंटिनाचे गांधी’ म्हणून ओळखले जाणारे प्रा. अडोल्फो डी. ओबिए्ता यांना पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या हस्ते प्रदान दि..06-11-1996
  • ’युनेस्को गांधी सुवर्णपदक’ विकसनशील देशांना जैवतंत्रज्ञानाचा लाभ उपलब्ध करुन दिल्याबद्दल   भारताचे वैज्ञानिक डॉ. एम. एस. स्वामीनाथन  यांना  जाहीर दि.06-11-1999
  • प्रतिष्ठेचा ‘वाय. नायडुम्मा स्मृती पुरस्कार‘  संरक्षण संशोधन व विकास संस्थेचे (DRDO) महासंचालक डॉ. वासुदेव अत्रे यांना  प्रदान करण्यात आला. संपूर्ण भारतीय बनावटीचे ’धनुष’ हे युद्धनौकेवरुन युद्धनौकेवर मारा करणारे क्षेपणास्त्र विकसित करण्यात  डॉ. अत्रे यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. दि.06-11-2001

संदर्भ व आभार दिनविशेष  06-11-2020

https://www.google.com/

https://www.wikipedia.org/

https://epaper.esakal.com/

Image by Clker-Free-Vector-Images from Pixabay 


संकल्पना,संकलन व संपादन

भालचंद्र माधव इनामदार

 

 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

13 ऑक्टोबर दिनविशेष-13 october dinvishesh-13-10-2020

ऑक्टोबर 14 2020-आजचा दिनविशेष- october 14 2020-aajcha dinvishesh

2020 ऑक्टोबर 21-2020 october 21