2020 ऑक्टोबर 21-2020 october 21
2020 ऑक्टोबर
21-2020 october 21
1833/10/21 नोबेल पुरस्काराचे संस्थापक जगप्रसिध्द वैज्ञानिक अल्फ्रेड नोबेल यांचा जन्म.
अल्फ्रेड बर्नार्ड
नोबेल -आपल्या शोधाने स्फोटकांच्या विश्वात खळबळ उडवणारा व नोबेल पुरस्कारासारखे अचाट
काम करणारा अवलिया अशी दुहेरी ओळख असणारा एक जगप्रसिध्द स्वीडीश वैज्ञानिक अशी अल्फ्रेड नोबेल यांची ओळख सांगता
येईल. आपल्या डायनामाईट या स्फोटकाच्या शोधामुळे कमी वयात अफाट संपत्ती
त्यांनी मिळवली व यामुळे धरणे, बोगदे,नागरी तसेच लष्करी बांधकामे करणे सुलभ झाले पण
याचा उपयोग मानवजातीच्या कल्याणासाठी न होता. युध्दात व लष्करी सैन्यकारवाईमध्ये जास्त
होऊ लागला असे निदर्शनास आल्यावर त्यांनी आपली सर्व 10 लाख स्वीडीश क्रोनरची देणगी
अर्पण करून एक विश्वस्त मंडळ नेमले व त्यातून जगातील तमाम उत्तमोत्तम संशोधकांना तसेच शांतीदूतांना गौरविण्यास सुरवात
केली, अशा पध्दतीने नोबेल पुरस्काराचा जन्म झाला व आता तो संशोधनाबरोबरच, साहित्य,
अर्थशास्त्र ,शांतता यासारख्या अनेक क्षेत्रातील महनीय व्यक्तींना दरवर्षी दिला जातो.
1833 ऑक्टोबर 21
स्टॉकहोम स्वीडन
1896 डिसेंबर 10
सेनेरिमो इटली
- डायनामाईट या स्फोटकाचा निर्माता
- जगप्रसिध्द नोबेल पारितोषिकाचा संस्थापक
102 क्रमांकाच्या
कृत्रीम मूलद्रव्यास नोबेल यांचे नाव नोबेलियम असे देऊन अल्फ्रेड नोबेल यांच्या कार्याचा 1958 साली
सन्मान करण्यात आला.
1931/10/21 हिंदी
चित्रपट अभिनेता शम्मी कपूर यांचा जन्म.
शम्मी कपूर
उर्फ शमशेर राज कपूर हे पृथ्वीराज कपूर यांचे
व्दितीय सुपुत्र व राज व शशी कपूर यांचे बंधू होते. आपल्या वडिलांप्रमाणेच ह्या तीन
भावंडांनी हिंदी चित्रपटसृष्टीत आपला आगळा वेगळा ठसा उमटविला. शम्मी कपूर आपल्या विशेष
नृत्याशैली तसेच हावभावामुळे खूप प्रसिध्द झाले. लहान असताना एल्विस प्रिस्ले या हॉलिवूडच्या
अभिनेता, गायकाची नृत्यशैली बघून त्यांनी आपली वेगळी अशी शैली बनविली, त्यामुळे त्यांना
भारताचा एल्विस प्रिस्ले असे बरेच जण म्हणतात. आपल्या जंगली तसेच दिल देके देखो अशा
अनेक चित्रपटामुळे शम्मीजी ओळखले जातात. अभिनयाव्यतरिक्त शम्मीजी सुरवातीला भारतातील
इंटरनेट वापरणाऱ्या मोजक्या लोकांमध्ये गणले जातात. त्यांनी इंटरनेट यूझर्स कम्युनिटी ऑफ इंडिया ही संस्था स्थापन
केली होती.
1931 ऑक्टोबर 21
मुंबई
2011 ऑगस्ट 14 मुंबई
हिंदी चित्रपटसृष्टीत
अभिनेता तसेच निर्माता म्हणून कार्य
प्रसिध्द चित्रपट
- तुमसा नही देखा
- दिल देके देखो
- जंगली- या चित्रपटातील याहूsss.............. हे मो. रफी साहेबांनी गायलेले गीत प्रसिध्द झाले.
- ब्लफ मास्टर
- कश्मीर की कली
- जानवर
- तीसरी मंजिल
- ॲन इव्हिनिंग इन पॅरिस
- ब्रह्मचारी
- तुमसे अच्छा कौन है
- अंदाज
- फिल्मफेअर पुरस्कार-सर्वोत्तम अभिनेता- ब्रह्मचारी
- लाईफटाईम अचिव्हमेंट ॲवॉर्ड-फिल्मफेअर, झी सिने,स्टार स्क्रिन,बॉलिवूड मुव्ही ,पुणे अंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव इ.
यासरख्या
इतर अनेक पुरस्काराने शम्मीजी यांना सन्मानीत केले गेले आहे.
1983/10/21 प्रकाशाने निर्वातात १/२९९७९२४५८ सेकंदात कापलेले अंतर अशी १ मीटरची व्याख्या ठरवण्यात आली.
मीटर हे एक परिमाण
आहे. मीटर मेट्रीक युनीटचे मानक परिमाण आहे. लांबी मोजण्यासाठी मुख्यत्वे मीटर हे परिमाण
वापरतात. अमेरिका वगळता मीटर म्हणजे लांबी असे सगळीकडे संबोधतात. मीटरला प्रत्येक यंत्रात
स्थान दिलेले आहे जसे की स्पीडोमीटर,एमीमीटर इ.
21 ऑक्टोबर 1983
ला मीटरची सध्याची व्याख्या स्वीकारण्यात आली त्यामध्ये अनिश्चितता कमी करण्यासाठी,
17 व्या सीजीपीएमने मीटरची व्याख्या त्याच्या सद्य परिभाषासह बदलली, अशा प्रकारे मीटरची
लांबी दुसर्या आणि प्रकाशच्या गतीनुसार निश्चित केली :
मीटरच्या अंतराच्या दरम्यान व्हॅक्यूममध्ये प्रकाशने प्रवास केलेल्या मार्गाची लांबी असते. ती
1/299 792 458 अशी ठरविण्यात आली.
2012/10/21 निर्माते दिग्दर्शक यश चोप्रा यांचे निधन.
यश चोप्रा हे हिंदी
चित्रपटसृष्टीतील प्रसिध्द निर्माते,दिग्दर्शक होते, त्यांचे वक्त,मशाल,दिलवाले दुल्हनिया
ले जायेंगे असे अनेक चित्रपट प्रसिध्द आहेत.
1932 सप्टेंबर
27 लाहोर पाकिस्तान
2012 ऑक्टोबर 21
मुंबई महाराष्ट्र भारत
कार्य
हिंदी चित्रपटसृष्टीतील
एक प्रसिध्द निर्माते, दिग्दर्शक म्हणून बहुमोल कार्य
- वक्त
- मशाल
- चांदनी
- लम्हे
- कभी कभी
- दीवार
- डर
- दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे
- दिल तो पागल है
- वीर-झारा
- चक दे इंडिया
- धुम 1 व 2
यासारखे इतर अनेक
चित्रपट प्रसिध्द आहेत.
- पद्मभूषण पुरस्कार
- राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
- फिल्मफेअर पुरस्कार-सर्वोत्तम निर्माता, दिग्दर्शक
- दादासाहेब फाळके पुरस्कार
संदर्भ व आभार
Image by Mary
Pahlke from Pixabay
संकल्पना,संपादन व संकलन
भालचंद्र
माधव इनामदार
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
Please do not enter any spam link in comment.