23 डिसेंबर 2020 किसान दिवस विशेष

 

23 डिसेंबर 2020 किसान दिवस विशेष

23-12-2020 राष्ट्रीय किसान दिवस

    किसान दिवस दरवर्षी 23 डिसेंबरला साजरा करण्यात येतो. भारताचे पाचवे पंतप्रधान चौधरी चरण सिंग यांचा जन्मदिवस हा किसान दिवस म्हणून साजरा केला जातो ज्यांनी शेतकऱ्यांसाठी अनेक महत्वाच्या योजना तसेच भारतीय किसान युनियन या संस्थेची स्थापना केली. 2001 पासून भारत सरकारने 23 डिसेंबर हा दिवस किसान दिवस म्हणून साजरा करण्याचे ठरविले. शेतऱ्यांप्रती स्नेहभाव जागृत करणे व शेतकऱ्यांच्या हक्क व अधिकार  यासाठी किसान दिवसाची निर्मिती करण्यात आली आहे.

भारताचे माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंग यांचा जन्म. 23-12-1902

अल्पपरिचय

    चौधरी चरणसिंग हे भारताचे पाचवे पंतप्रधान होते. ते लोकदल या पक्षाचे संस्थापक होते. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी अनेकवेळा तुरूंगवास भोगला. चौधरी चरण सिंग हे शेतकरी अंदोलनातून पुढे आलेले नेतृत्व होते, त्यामुळे त्यांचा जन्मदिवस भारतात किसान दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.

जन्म

23-12-1902 मेरठ, उत्तरप्रदेश आधीचा ब्रिटीश भारत

मृत्यू

29-05-1987

शिक्षण

कलाशास्त्रात एम.ए

आग्रा विद्यापीठातून कायद्याचे पदवीधर

कार्य

  • सुरवातीला गाझियाबाद मध्ये दिवाणी वकील म्हणून कार्य
  • संयुक्त प्रांताच्या विधानसभेत प्रतिनिधित्व
  • भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महात्मा गांधी यांच्या नेतृत्वात  सहभाग, स्वातंत्र्यलढ्यातील मिठाचा सत्याग्रह,वैयक्तीक सत्याग्रह, चले जाव चळवळीत सहभाग व कारावास
  • भारतीय स्वातंत्र्यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री कार्यकाळ एप्रिल 1967 ते फेब्रुवारी 1968 व फेब्रुवारी 1970 ते ऑक्टोबर 1970
  • भारताचे  पाचवे पंतप्रधान म्हणून कार्य चौधरी चरणसिंग यांचा कार्यकाळ 28 जुलै 1979 ते 14 जानेवारी 1980
  • भारताचे अर्थमंत्री 28 जुलै 1979 ते 14 जानेवारी 1980
  • लोकदल पक्षाचे संस्थापक,अध्यक्ष
  • भारतीय किसान युनियचे संस्थापक

पुस्तके

  • जॉइंट फार्मिंग एक्सरे
  • इंडियाज इकॉनॉमिक पॉलिसी- दि गांधीयन ब्लुप्रिंट
  • इकॉनॉमिक नाइटमेअर ऑफ इंडिया-इट्स कॉज अँड क्युअर
  • अबॉलिशन ऑफ जमीनदारी
  • को ऑपरेटिव्ह फार्मिंग एक्स
  • प्रिव्हेंशन ऑफ डिव्हिजन ऑफ होल्डिंग्ज बीलो ए सर्टेन मिनिमम

गायिका नूरजहाँ यांचे निधन. 23-12-2000

अल्पपरिचय

    नूरजहाँ उर्फ अल्लाह वासी या सुप्रसिध्द गायिका,अभिनेत्री होत्या. भारत-पाकिस्तान फाळणीनंतर त्या पाकिस्तानात स्थायिक झाल्या. त्यांचे खानदान,नौकर,झीनत असे अनेक चित्रपट प्रसिध्द आहेत. मल्लिका ए तरन्नुम(क्वीन ऑफ मेलडी)म्हणून त्यांना ओळखले जाते. पंजाबी,हिंदी,उर्दु अशा अनेक भाषांत त्यांनी गाणी गायली आहेत.

जन्म

21-09-1926 कासूर,पंजाब,ब्रिटीश भारत सध्या पंजाब,पाकिस्तान

मृत्यू

23-12-2000 कराची,सिंध,पाकिस्तान

कार्य

भारतीय स्वातंत्र्याआधी अनेक भारतीय चित्रपटांत भूमिका व गायन

भारत-पाकिस्तान फाळणीनंतर पाकिस्तानातील एक प्रमुख गायिका

प्रसिध्द चित्रपट

  • खानदान-1942
  • नौकर-1943
  • झीनत-1945
  • बडी माँ-1945
  • जुगनु-1947
  • अनमोल घडी-1946

नूरजहाँ यांना 15 निगार पुरस्कार-पाकिस्तानचा सर्वोच्च कला पुरस्कार  मिळाले आहेत. झीनत चित्रपटासाठी कव्वाली गाणारी पहिली अशियाई  गायिका अशी त्यांची ओळख आहे.

नूरजहाँ यांची प्रसिध्द गाणी

  • आवाज दे कहॉं है...........
  • जवाँ है मोहब्बत........

भारताचे माजी पंतप्रधान नरसिंह राव यांचे निधन. 23-12-2004
अल्पपरिचय

    पामुलपर्ती वेंकट नरसिंहराव तथा पी.व्ही. नरसिंहराव हे भारताचे माजी पंतप्रधान,आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री तसेच भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्षही होते.

जन्म

28-06-1921 करीमनगर,आंध्र प्रदेश भारत

मृत्यू

23-12-2004 नवी दिल्ली,भारत

कार्य

  • भारताचे पंतप्रधान कार्यकाळ 21 जून 1991 ते 16 मे 1996
  • भारताचे परराष्ट्रमंत्री कार्यकाळ  25 जून 1988 ते 05 जून 1989 तसेच 31 मार्च 1992 ते 18 जानेवारी 1993
  • आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री कार्यकाळ 30 सप्टेंबर 1971 ते 10 जानेवारी 1973
  • भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष कार्यकाळ 30 मे 1991 ते 23 सप्टेंबर 1996
  • भारताच्या नवीन आर्थिक धोरणाची रूपरेषा तसेच त्याची अंमलबजावणी करण्याचे महत्वाचे कार्य पी.व्ही. नरासिंहराव यांच्या काळात डॉ. मनमोहनसिंग यांच्यासाथीने झाले. डॉ. मनमोहनसिंग हे त्यावेळी नरसिंहराव यांच्या सरकारमध्ये अर्थमंत्री होते.

पुस्तके

पी.व्ही. नरसिंहराव यांनी अनेक पुस्तकांचा तेलगु व हिंदी  भाषेत अनुवाद केला त्यातील वेयि पडगलु चा सहस्त्रफन व पण लक्षात कोण घेतो या मराठी कादंबरीचा अबला जीवितम हा अनुवाद विशेष प्रसिध्द आहे.


आजचे पुरस्कार

लोकनायक जयप्रकाश नारायण यांना मरणोत्तर भारतरत्न जाहीर. 23-12-1998


संदर्भ व आभार


https://www.google.com/

https://www.pmindia.gov.in/

https://www.wikipedia.org/


संकल्पना,संकलन व संपादन

भालचंद्र माधव इनामदार

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

13 ऑक्टोबर दिनविशेष-13 october dinvishesh-13-10-2020

ऑक्टोबर 14 2020-आजचा दिनविशेष- october 14 2020-aajcha dinvishesh

ऑक्टोबर 18 2020-October 18 2020