29 जून 2021-June 29

 

29 जू2021-June 29

प्रसिध्द नाटककार श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांचा जन्म. 29 जून 1871

अल्पपरिचय

श्रीपाद कृष्ण कोल्हटकर हे मराठीतील प्रसिध्द नाटककार व विनोदकार,लेखक,कवी व ज्योतिषतज्ञ  होते. 'बहु असोत सुंदर संपन्न की महा' या महाराष्ट्रगीताचे रचनाकार म्हणून ते प्रसिध्द आहेत.

जन्म

29 जून 1871 अकोला, ब्रिटीश भारत

मृत्यू

01 जून 1934 जामोद,जळगाव, ब्रिटीश भारत

शिक्षण

एल.एल.बी.

कार्य

प्रसिध्द नाटककार,लेखक,कवी व समीक्षक तसेच ज्योतिषतज्ञ

साहित्य

नाटके

  • परिवर्तन
  • गुप्तमंजुषा
  • जन्मरहस्य
  • मतिविकार
  • मायाविवाह
  • मूकनायक
  • वीरतनय
  • श्रमसाफल्य
  • वधूपरीक्षा
  • सहचारिणी

इतर लेखन

  • श्यामसुंदर-कादंबरी
  • सुदाम्याचे पोहे-विनोदी लेख
  • अठरा धान्यांचे कडबोळे-विनोदी लेख संकलन
  • ज्योतिषगणित-कादंबरी

सन्मान

13 व्या मराठी साहित्य संमेलन-पुणे याचे अध्यक्ष -1927

पुणे येथील दुसऱ्या कविसंमेलनाचे अध्यक्ष

तिसऱ्या जोतिषपरिषदेचे अध्यक्ष

भारतीय संख्याशास्त्राचे जनक प्रसंत चन्द्र महालनोबिस यांचा जन्म. 29 जून 1893

अल्पपरिचय

प्रसंत चन्द्र महालनोबिस हे भारतीय संख्याशास्त्राचे जनक तसेच इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूटचे संस्थापक होते.

जन्म

29 जून 1893 कलकत्ता, ब्रिटीश भारत

मृत्यू

28 जून 1972 कोलकाता, पश्चिम बंगाल, भारत

शिक्षण

कलकत्ता विद्यापीठातून बीएस्सी

किंग्ज कॉलेज केंब्रीज, इंग्लंड येथून बीए

कार्य

भारतीय संख्याशास्त्राचे जनक

इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूटचे संस्थापक

महालनोबीस यांचे शोध

महालनोबिस डिस्टन्स

फेल्डमन-महालनोबिस मॉडेल

स्टॅटिस्टिक मधील सॅम्पल सर्व्हेची पध्दत त्यांनी विकसित केली. प्रायोगिक सर्वेक्षण व सर्वेक्षणाच्या विविध पध्दतीचा उपयोग त्यांनी करून दिला.

इंडियन सायन्स काँग्रेसचे ते 1950 साली अध्यक्ष होते.

पुरस्कार

पद्मविभूषण पुरस्कार

ऑफिसर ऑफ दि ऑर्डर ऑफ ब्रिटीश एम्पायर

फेलो ऑफ दि रॉयल सोसायटी

वेल्डन मेमोरियल प्राइझ

फेलो ऑफ दि इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमी

लेखक कमलाकर सारंग यांचा जन्म. 29 जून 1934

अल्पपरिचय

कमलाकर सारंग हे मराठीतील प्रसिध्द लेखक, दिग्दर्शक तसेच रंगभूमीवरील प्रसिध्द अभिनेते होते. सखाराम बाइंडर या त्यांच्या गाजलेल्या नाटकाने ते प्रसिध्द झाले. कमलाकर सारंग यांच्याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी येथे भेट द्या.

सेशेल्सचा स्वातंत्र्यदिन. 29 जून 1976

सेशेल्स

    सेशेल्स हा 115 बेटांनी बनलेला पूर्व अफ्रिकेतील हिंदी महासागरातील देश असून 29 जून 1976 रोजी युनायटेड किंग्डम कडून याला स्वातंत्र्यता मिळाली.

देश: सेशेल्स तथा रिपब्लिक ऑफ सेशेल्स

राजधानी: व्हिक्टोरिया

राष्ट्रभाषा: इंग्लीश,फ्रेंच,सेशेल्स क्रेयोल

चलन: सेशेल्‍सी रूपया

सीमा:  उत्तर पूर्वेस मादागास्कर,पश्चिमेस झांझीबार,‍दक्षिणेस मॉरिशस,दक्षिणपश्चिमेस कोमोरोस

अर्थव्यवस्था: पर्यटन व उद्योगअधारित

मराठी साहित्यिक दि.बा. मोकाशी यांचे निधन. 29 जून 1981

ल्पपरिचय

दिगंबर बाळकृष्ण मोकाशी तथा दि.बा. मोकाशी हे प्रसिध्द मराठी साहित्यिक होते. अर्नेस्ट होमिंग्वे यांच्या 'फॉर हुम दि बेल टोल्स' या प्रसिध्द कादंबरीचा दि.बा. यांनी केलेला 'घनघणतो घंटानाद' हा अनुवाद प्रचंड गाजला. दि.बां च्या विषयी अधिक जाणून घेण्यासाठी येथे भेट द्या.


आजचे पुरस्कार

पंडित ह्रद्यनाथ मंगेशकर यांना नटसम्राट बालगंधर्व पुरस्कार जाहीर. 29 जून 2001

एम. पी. बिर्ला पुरस्कार प्रसिध्द शास्त्रज्ञ कृष्ण दामोदर अभ्यंकर यांना जाहीर. 29 जून 2001


संदर्भ व आभार

https://www.google.com/

https://www.wikipedia.org/


संकल्पना, संकलन व संपादन

भालचंद्र माधव इनामदार

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

13 ऑक्टोबर दिनविशेष-13 october dinvishesh-13-10-2020

ऑक्टोबर 14 2020-आजचा दिनविशेष- october 14 2020-aajcha dinvishesh

2020 ऑक्टोबर 21-2020 october 21