27 जून 2021- June 27

 

27 जून 2021- June 27

बंगाली कादंबरीकार,कवी बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांचा जन्म. 27 जून 1838

अल्पपरिचय

बंकिमचंद्र चट्टोपाध्याय हे बंगाली कादंबरीकार,कवी व पत्रकार होते. वंदे मातरम चे रचनाकार म्हणून त्यांना ओळखले जाते. त्यांच्या आनंदमठ कादंबरीतून हे गीत घेतलेले आहे.

जन्म

27 जून 1838 नैहाती,बंगाल प्रेसिडन्सी, ब्रिटीश भारत

मृत्यू

08 एप्रिल 1894 कलकत्ता,बंगाल प्रेसिडन्सी, ब्रिटीश भारत

शिक्षण

प्रेसिडन्सी कॉलेज कलकत्ता मधून कलाशाखेत पदवी

कायदा पदवी कलकत्ता विद्यापीठ 1869

कार्य

ब्रिटीश भारतीय प्रशासकीय सेवेत उपदंडाधिकारी म्हणून सुरूवातीला जेसुर येथे कार्य

ब्रिटीश भारतीय प्रशासकीय सेवेत सेवा समायोजन झाल्यानंतर उपदंडाधिकारी व उपजिल्हाधिकारी म्हणून कार्य

प्रसिध्द बंगाली लेखक,कवी,पत्रकार

वंदे मातरम चे रचनाकार

प्रसिध्द साहित्य

  • दुर्गेशनंदिनी
  • कपालकुंडला
  • देवी चौधुराणी
  • आनंदमठ
  • विशाभ्रिक्शा

स्वातंत्र्यसैनिक व पत्रकार शिवराम हरी परांजपे यांचा जन्म. 27 जून 1864

अल्पपरिचय

शिवराम हरी परांजपे हे स्वातंत्र्यसै‍निक,पत्रकार,लेखक होते. 'काळ' या नियतकालिकामुळे त्यांना काळकर्ते म्हणून संबोधले जाते. शिवराम हरी परांजपे यांच्याविषयी अधिक माहितीकरता येथे भेट द्या.

समाजसेविका,लेखिका व शिक्षिका हेलन केलर यांचा जन्म. 27 जून 18‍80

अल्पपरिचय

हेलन ॲडम्स केलर ही अमेरिकन लेखिका,दिव्यांग चळवळीतील समाजसेविका,व्याख्याता व राजकीय कार्यकर्ती होती.

जन्म

27 जून 1880 ट्युसकम्बीया,अलबामा,अमेरिका

मृत्यू

01 जून 1968 इस्टन, कनेक्टीकट,अमेरिका

शिक्षण

रॅडक्लिफ कॉलेजमधून बी.ए.

कार्य

प्रसिध्द दिव्यांग कार्यकर्ती,शिक्षिका,लेखिका

हेलन केलरने ती अवघ्या 19 महिन्यांची असतानाच दृष्टी व ऐकण्याची शक्ती गमावली. ॲने सुलीव्हन या तिच्या शिक्षिकेने तिला वाचन व लिखाण शिकविले. इतर व्यक्तींच्या बोलण्याच्या पध्दतीवरून बोलणे व समजून घेण्याची टॅडोमा पध्दत तिने नंतर शिकून घेतली. शालेय शिक्षणानंतर तिने आपला प्रवेश हॉवर्ड विद्यापीठाच्या रॅडक्लिफ कॉलेजमध्ये घेतला व तेथून बीए ही पदवी मिळवली ही पदवी मिळवणारी ती पहिली अंध व मूकबधीर व्यक्ती ठरली. अमेरिकन फौंडेशन फॉर ब्लाइंड या संस्थेसाठी तिने तहहयात कार्य केले. दि स्टोरी ऑफ माय लाईफ या केलरच्या आत्मचरित्राने ती व तिची शिक्षिका ॲने सुलीव्हनला जगभर ओळख मिळाली. हेलन केलरने महिलांच्या मतदानासाठी तसेच कामगार चळवळीसाठीही कार्य केले. अमेरिकन सोशलिस्ट पक्षाची सक्रीय सदस्य म्हणूनही तिने कार्य केले.

पुस्तके

  • दि फ्रॉस्ट किंग
  • दि स्टोरी ऑफ माय लाईफ
  • दि वर्ल्ड आय लिव्ह इन
  • आउट ऑफ दि डार्क, ए सिरिज ऑफ एसेज ऑन सोशलिझम
  • माय रिलिजन

संगीतकार राहुल देव बर्मन यांचा जन्म. 27 जून 1939

अल्पपरिचय

राहुल देव बर्मन तथा पंचमदा हे भारतीय संगीतकार व गायक होते. भारतीय चित्रपटसृष्टीतील महान संगीतकारांमध्ये गणना होणाऱ्या पंचमदांनी सुमारे 331 विविध चित्रपटांसाठी संगीतकार म्हणून कार्य केले.

जन्म

27 जून 1939 कॉमिला,बंगाल, ब्रिटीश भारत सध्या बंग्लादेश

मृत्यू

04 जानेवारी 1994 बॉम्बे, महाराष्ट्र, भारत

कार्य

प्रसिध्द भारतीय संगीतकार व गायक

पंचमदांनी संगीत दिलेले प्रसिध्द चित्रपट

  • तिसरी मंजील
  • सीता और गीता
  • मेरे जीवनसाथी
  • हम किसीसे कम नहीं
  • सनम तेरी कसम
  • शोले
  • कटी पतंग
  • आँधी
  • गोलमाल
  • मिली
  • रॉकी
  • सत्ते पे सत्ता
  • मासुम

प्रसिध्द गाणी

  • क्या हुआ तेरा वादा........
  • रातकली एक ख्वाब मैं........
  • रैना बीती जाय.......

पुरस्कार

फिल्मफेअर पुरस्कार तीनवेळा

फिल्ड मार्शल सॅम मणेकशॉ यांचे निधन. 27 जून 2008

अल्पपरिचय

    फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ हे भारताचे आठवे लष्करप्रमुख होते. 1971 च्या भारत-पाकिस्तान युध्दात भाराताच्या विजयाचे खरे शिल्पकार सॅम माणेकशॉ होते त्यामुळेच  बंग्लादेशची  निर्मिती झाली. अचूक युध्दतंत्र,शत्रूच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेऊन योग्य वेळी योग्य पावले उचलून त्यांनी देशाच्या इतिहासात मोलाची कामगिरी केली. सॅम माणेकशॉ यांच्याबद्दल आधिक माहितीकरता येथे भेट द्या. 


संदर्भ व आभार

https://www.google.com/

https://www.wikipedia.org/


संकल्पना,संकलन व संपादन

भालचंद्र माधव इनामदार

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

Please do not enter any spam link in comment.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

13 ऑक्टोबर दिनविशेष-13 october dinvishesh-13-10-2020

ऑक्टोबर 14 2020-आजचा दिनविशेष- october 14 2020-aajcha dinvishesh

2020 ऑक्टोबर 21-2020 october 21