03 April- 03 एप्रिल-2021

 

03 April- 03 एप्रिल-2021

छत्रपती शिवाजी महाराज यांचे निधन. 03-04-1680

अल्पपरिचय

    श्री. छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, रयतेचे राजे, कुशल युध्दनीतीतज्ञ,गनिमी कावा या युध्दनीतीचे शिल्पकार, उत्तम प्रशासक व दुरदुष्टी असलेले नेतृत्व होते. अनेक वर्ष परकीय आक्रमकांच्या तावडीत भरडल्या जाणाऱ्या समाजाला त्यांनी स्वराज्याच्या माध्यमातून स्वाभिमानाने व स्वकर्तुत्वाच्या जोरावर जगायचे धडे दिले व अन्यायाविरूध्द पेटून उठण्याची प्रेरणा दिली जी त्यांच्या मृत्यूनंतरही आजतागायत कायम आहे व कायम राहील. कपटी अन्यायी मुघल व इतर परकीय शत्रूंना आपल्या समशेरीने पाणी पाजणारा असा हा जणतेचा राजा मराठी मातीत जन्मला हे आपले अहोभाग्यच असावे. आपल्या उण्यापुऱ्या पन्नास वर्षाच्या आयुष्यात (जन्म- 19 फेब्रुवारी 1630 तर मृत्यू- 03 एप्रिल 1680 ) रयतेसाठी झिजणाऱ्या  ह्या राजाने  आलेल्या प्रत्येक संकटावर, आव्हानांवर कधी धैर्याने तर कधी बुध्दीचार्तुर्याने मात केली व हिंदवी स्वराज्याचे निर्माण केले, ते नुसते करून थांबले नाहीत तर राज्याभिषेक-1674 साली करून त्याला नैतिक व सामाजिक अधिष्ठानही मिळवून दिले व शिवशकाच्या माध्यमातून ते चिरंतन केले. अशा या राजाने दक्षिण दिग्विजय मोहिमेनंतर 03 एप्रिल 1680 ला रायगडावर देह ठेवला. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अधिक माहितीसाठी येथे भेट द्या.

स्वातंत्र्यसैनिक व सामाजिक कार्यकर्त्या कमलादेवी चट्टोपाध्याय यांचा जन्म. 03-04-1903

अल्पपरिचय

    कमलादेवी हरेन्द्रनाथ चट्टोपाध्याय या भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील स्वातंत्र्यसेनानी, सामाजिक कार्यकर्त्या  होत्या.

जन्म

03 एप्रिल 1903 मेंगलोर, ब्रिटीश भारत

मृत्यू

29 ऑक्टोबर 1988

शिक्षण

बेडफर्ड कॉलेज,लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, लंडन, इंग्लंड

कार्य

भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सहभाग, असहकार आंदोलन व इतर अनेक आंदोलनात सहभाग घेतला व त्यासाठी कारावासही भोगला.

युवकवर्गात भारतीय स्वातंत्र्याचे बीजरोपण करण्यासाठी कमलादेवी यांनी विशेष प्रयत्न केले.

स्वातंत्र्यपूर्व काळात व स्वातंत्र्यानंतरही शेतकरी व कामगारवर्गाच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. शेतकऱ्यांसंबंधी काँग्रेसची भूमिका न पटल्याने त्यांनी क्राँग्रेस सोडून क्रॉग्रेस सोशलिस्ट पक्षाचे सदस्यत्व स्विकारले.

ऑल इंडिया विमेन्स कॉन्फरन्सच्या संस्थापिका

भारतीय नाट्यक्षेत्रातही कमलादेवींनी आपले  योगदान दिले आहे.

भारतातील हस्तकलेच्या वस्तूंना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. व त्यासाठी स्थापन केलेल्या ऑल इंडिया हॅन्डीक्राफ्टस बोर्डच्या त्या आध्यक्षा होत्या.

पुस्तके

  • हँन्डीक्राफ्टस ऑफ इंडिया
  • अवेकनिंग ऑफ इंडियन वुमनहूड
  • सोसायटी अँड सोशॅलिझम
  • इंडिया ॲट दि क्रॉसरोड्स

फिल्डमार्शल सॅम माणेकशॉ यांचा जन्म. 03-04-1914

अल्पपरिचय

फिल्ड मार्शल सॅम होर्मसजी फ्रामजी जमशेदजी माणेकशॉ हे भाराताचे आठवे सैन्यप्रमुख होते.

जन्म

03 एप्रिल 1914 अमृतसर,पंजाब,ब्रिटीश भारत

मृत्यू

27 जून 2008 वेलिंग्टन,तामीळनाडू,भारत

कार्य

ब्रिटीश भारातातील  सैन्यात सेकंड लेफ्टनंट

ब्रिटीश भारतातील  सैन्यात 12 फ्रंटियर रेजिमेंटचे कॅप्टन

ब्रिटीश भारतातील सैन्यात ग्रेड 1 जनरल स्टाफ ऑफिसर

भारताच्या स्वातंत्र्यानंतर माणेकशॉ यांची चौथी बटालियन 12 फ्रंटियर रेजिमेंट ही पाकिस्तानचा भाग झाली म्हणूनच मग नंतर 8 गोरखा रायफल या तुकडीचे मेजर म्हणून नेमणूक झाली.

1948 च्या पाकिस्तान बरोबरील युध्दात माणेकशॉ यांनी डायरेक्टर ऑफ मिलिटरी ऑपरेशन्स म्हणून जबाबदारी संभाळली जे पद आता डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्स म्हणून ओळखले जाते.

भारतीय लष्कराच्या वेस्टर्न कमांडचे नववे जनरल ऑफिसर कमांडिंग इन चिफ कार्यकाळ-04 डिसेंबर 1963-15 नोव्हेंबर 1964

भारतीय लष्कराच्या इस्टर्न  कमांडचे नववे जनरल ऑफिसर कमांडिंग इन चिफ कार्यकाळ 16 नोव्हेंबर 1964 ते 08 जून 1969

भारताचे सातवे चीफ ऑफ आर्मी स्टाफ(लष्करप्रमुख) कार्यकाळ 08 जून 1969 ते 15 जानेवारी 1973

फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्या ब्रिटीश व भारतीय सैन्यातील तब्बल 40 वर्षाच्या कारर्किदीत त्यांनी दुसरे महायुध्द,पाकिस्तानबरोबरील 1948 चे युध्द,चीन बरोबरील 1962 चे युध्द,1965 चे पाकिस्तानबरोबरील युध्द,1971 चे पाकिस्तानबरोबरील युध्द म्हणजेच बंग्लादेश स्वातंत्र्ययुध्द या सर्व युध्दात शौर्य गाजविले. तरीही त्यातील बंग्लादेश स्वातंत्र्ययुध्दातील ऐतिहासिक कामगिरीसाठी त्यांना ओळखले जाते, कारण या युध्दात पाकिस्तानने भारतासमोर शरणगती पत्करली होती ज्यामुळे बंग्लादेशची निर्मिती झाली, या पाकिस्तानच्या शरणागतीचे सारे श्रेय माणेकशॉ यांच्या धाडसी युध्दनीतीला जाते.

भारताच्या या 1971 च्या विजयामुळे माणेकशॉ यांच्या कारर्किदीचा सन्मान म्हणून माणेकशॉ यांना फिल्ड मार्शल म्हणून बढती देण्यात आली

पुरस्कार

  • पद्मभूषण
  • पद्मविभूषण
  • वॉर मेडल-1939-1945
  • इंडिया इनडिपेन्डन्स मेडल
  • जनरल सर्व्हिस मेडल
  • संग्राम मेडल
  • बर्मा स्टार
  • पश्चिमी स्टार
  • पूर्वी स्टार
  • रक्षा मेडल
  • मिलिट्री  क्रॉस
  • इंडिया सर्व्हिस मेडल
  • सैन्य सेवा मेडल या सारखे अनेक पुरस्कार माणेकशॉ यांना मिळाले.

इंग्लीश गणितज्ञ मेरी कार्टराइट यांचे निधन. 03-04-1998

ल्प‍परिचय

डेमी मेरी लुसी कार्टराइट या इंग्लीश गणिततज्ञ होत्या.

जन्म

17 डिसेंबर 1900 आयनहो,युनायटेड किंग्डम

मृत्यू

03 एप्रिल 1998 केंब्रीज, युनायटेड किंग्डम

शिक्षण

सेंट ह्युज कॉलेज, इंग्लंड

कार्य

प्रसिध्द इंग्लीश गणिततज्ञ

गणितातील चाउस थिअरी व बटरफ्लाय इफेक्टच्या शोधक

कार्टराइट प्रमेयाच्या प्रणेत्या

कार्टरइट प्रमेय: कार्टराइटचे प्रमेय मध्ये असे लिहिले आहे की n पेक्षा कमी घातांकीय प्रकाराचे संपूर्ण फंक्शन पूर्णांकांवर बांधले असल्यास संपूर्ण वास्तविक अक्षावर बांधले जाणे आवश्यक आहे. ... आणि R= R + 1 घेतल्यास हे लक्षात येते की f (z) चा यू (z) सारखा घातांकीय प्रकार आहे.


संदर्भ व आभार

https://www.google.com/

https://www.wikipedia.org/

https://epaper.esakal.com/


संकल्पना,संकलन व संपादन

भालचंद्र माधव इनामदार

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

13 ऑक्टोबर दिनविशेष-13 october dinvishesh-13-10-2020

ऑक्टोबर 14 2020-आजचा दिनविशेष- october 14 2020-aajcha dinvishesh

2020 ऑक्टोबर 21-2020 october 21