26 जून 2021-जागतिक मादक पदार्थ सेवनविरोधी दिन विशेष
26 जून 2021-जागतिक
मादक पदार्थ सेवनविरोधी दिन विशेष
जागतिक मादक पदार्थ सेवनविरोधी दिन. 26 जून 2021
आजच्या जागतिक मादक पदार्थ सेवनविरोधी दिन 26 जून रोजी जगभर साजरा केला
जातो. ज्या पदार्थाच्या सेवनाने धुंदी,नशा येते अशा पदार्थांचा समावेश मादक पदार्थात
होतो त्यामध्ये अफू,गांजा,हेरॉईन,कोकेन अशा अनेक पदार्थांचा समावेश होतो. या पदार्थांचे
अधिक सेवन केल्यास त्याची सवय लागून आरोग्यावर प्रचंड गंभीर दुष्परिणाम होतात. हा विचार
व याची गंभीरता लक्षात घेऊन संयुक्त राष्ट्रांनी 07 डिसेंबर 1987 च्या आपल्या ठरावाव्दारे
26 जून हा दिवस मादक पदार्थ सेवनविरोधी दिन म्हणून घोषीत केला तेव्हापासून जागतिक पातळीवर
हा दिवस साजरा करण्यात येतो. भारतात या प्रकाराचा झालेला शिरकाव व त्याचे भयानक परिणाम
यांचा विचार करून भारत सरकारने संविधानाच्या कलम 47 नुसार 1985 सालीच यावर निर्बंध
घातले तरीही चोरट्या मार्गाने होणारी याची तस्करी व प्रसार पहाता प्रत्येकाने सजग राहून
या पदार्थाची विक्री व प्रसार व प्रचार थांबविला पाहिजे व जे याच्या विळख्यात आहेत
त्यांना यापासून परावृत्त करण्यासाठी व्यसनमुक्ती चळवळीव्दारे प्रयत्न केला पाहिजे.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जन्म. 26 जून 1874
अल्पपरिचय
राजर्षी छत्रपती शाहू हे सुधारणावादी पुरोगामी महाराष्ट्राचे प्रणेते
समजले जातात. आजच्या पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर संस्थानाचे राजे असणारे छत्रपती
शाहू सामाजिक,आर्थिक,राजकीय,धार्मिक सुधारणांचे उद्गाते व बहुजनांचे कैवारी होते.
कला,क्रिडा,शिक्षण या क्षेत्रातही त्यांचा मुक्तपणे वावर होता. आजच्या महाराष्ट्राला
शाहू-फुले-अंबेडकरांचा महाराष्ट्र असे संबोधले जाते त्यातील शाहू हे दृष्टे नेतृत्व
होते अशा शाहू महाराजांची आज जयंती आहे. राजर्षी छत्रपती शाहू यांच्याबद्दल अधिक जाणून
घेण्यासाठी येथे भेट द्या.
गायक व अभिनेते बालगंधर्व यांचा जन्म. 26 जून 1888
नारायण श्रीपाद राजहंस तथा बालगंधर्व हे प्रसिध्द गायक व नाट्यसृष्टीतील
प्रसिध्द अभिनेते होते.मराठी रंगभूमीवर जेव्हा स्त्रीया भूमिका करत नव्हत्या तेव्हा
स्त्रीभूमिकांमधून अधिककाळ प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेले अभिनेते म्हणून
बालगंधर्वांकडे पाहिले जाते.
जन्म
26 जून 1888 नागठाणे ता. पलूस जि. सांगली, महाराष्ट्र, भारत आधीचा ब्रिटीश
भारत
मृत्यू
15 जुलै 1967 पुणे, महाराष्ट्र, भारत
कार्य
मराठी रंगभूमीवरील सुप्रसिध्द अभिनेते, गायक
स्त्रीभूमिकांसाठी प्रसिध्द असणारे बालगंधर्व सुरूवातीला किर्लोस्कर नाटक
मंडळीतून मराठी संगीत रंगभूमीवर आले नंतर त्यांनी गणपतराव बोड्स व गोंविंदराव टेंबे
यांच्यासोबत मिळून गंधर्व संगीत नाटक मंडळीची स्थापना केली. बालगंधर्वांनी आपल्या कारर्किदीत
25 नाटकांत भूमिका करून संगीत नाटकांची व नाट्यसंगीताची लोकप्रियता वाढविली. भास्करबुवा
बखले या आपल्या गुरूंकडून घेतलेल्या संगीतशिक्षणाने त्यांनी संगीत रंगभूमी गाजविली.
भास्करबुवा बखले, गोविंदराव टेंबे,मास्टर कृष्णराव यांनी त्यांना संगीतसंयोजनात मदत
केली.
प्रसिध्द नाटके
- संगीत मानापमान
- संगीत स्वयंवर
- एकच प्याला
- संगीत शारदा
- मृच्छाकटिक
पुरस्कार
संगीत नाटक अकादमी पुरस्कार
पद्मभूषण पुरस्कार
पी. बंदोपाध्याय या पहिल्या महिला एअर कामोडोर बनल्या. 26 जून 2000
एअर मार्शल पद्मा बंदोपाध्याय आधीच्या पद्मावती स्वामीनाथन या पहिल्या महिला एअर कामोडोर होत्या. आजच्याच दिवशी
2000 साली त्यांना हा मान मिळाला. 1968 साली
त्यांनी भारतीय वायुदलात सेवा देण्यास सुरूवात केली, 1971 च्या भारत-पाकिस्तान युध्दात
विशेष कामगिरी केल्याबद्दल त्यांना विशिष्ट सेवा पदकाने सन्मानित करण्यात आले. विंग
कमांडर सतीनाथ बंदोपाध्याय व पद्मा बंदोपाध्याय यांना याबद्दल प्रजासत्ताक दिनाच्या
संचलनात सहभागी होण्याची संधी मिळाली व तेथे त्यांना राष्ट्रपती पदकाने सन्मानित करण्यात
आले. एअरोस्पेस मेडिकल सोसायटीच्या त्या पहिल्या महिला अभिभावक होत्या तसेच उत्तर ध्रवावर
संशोधनकार्य करणाऱ्याही त्या पहिल्या महिला होत्या.
लेखक व कथाकथनकार व. पु. काळे यांचे निधन. 26 जून 2001
अल्पपरिचय
वसंत पुरूषोत्तम काळे तथा व.पु. काळे हे मराठीतील प्रसिध्द कथाकथनकार,लेखक
व कादंबरीकार होते. वपुर्झा,गुलमोहर असे अनेक ललित व कथासंग्रह त्यांचे प्रसिध्द आहेत.
व.पु. काळे यांच्याबद्दल अधिक माहितीसाठी येथे भेट द्या.
संदर्भ व आभार
संकल्पना,संकलन व संपादन
भालचंद्र माधव इनामदार
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
Please do not enter any spam link in comment.