‍06 मे 2021-06 May- राजर्षी छत्रपती शाहू महाराज‍ पुण्यदिन विशेष

 

‍06 मे 2021-06 May- राजर्षी छत्रपती  शाहू महाराज‍ पुण्यदिन विशेष

स्वातंत्र्यसेनानी मोतिलाल नेहरू यांचा जन्म. 06 मे 1861

अल्पपरिचय

मोतिलाल गंगाधर नेहरू हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक प्रमुख स्वातंत्र्यसेनानी, राष्ट्रीय काँग्रेसचे प्रमुख नेते, स्वराज्य पक्षाचे संस्थापक व भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे वडील होत. मोतिलाल नेहरू यांच्याबद्दल अधिक माहितीसाठी येथे भेट द्या.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे निधन. 06 मे 1922

अल्पपरिचय

राजर्षी छ.  शाहू महाराज हे कोल्हापूर संस्थानचे राजे,समाजसुधारक,धार्मिक,आर्थिक,सामाजिक,राजकीय,शैक्षणिक सुधारणांचे पुरस्कर्ते व कला-क्रिडा-संस्कृतीचे आश्रयदाते होते. महाराष्ट्राला ज्या तीन प्रमुख समाजसुधारकांचा वारसा लाभला त्यातील राजर्षी शाहू एक होते, आजचा महाराष्ट्र हा त्यामुळेच शाहू-फुले-अंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणून ओळखला जातो.

जन्म

26 जून 1874 कोल्हापूर, कोल्हापूर संस्थान,ब्रिटीश भारत

मृत्यू

06 मे 1922 मुंबई, ब्रिटीश भारत

शिक्षण

राजकुमार कॉलेज, राजकोट व धारवाड येथे झाले.

कार्य

कोल्हापूर संस्थानाचे राजे राज्याभिषेक 02 एप्रिल 1894 कार्यकाळ-1894 ते 1922

समाजसुधारणा,आर्थिक सुधारणा,सामाजिक सुधारणा,राजकीय सुधारणा,प्रशासकीय सुधारणा,शैक्षणिक सुधारणा यांमध्ये भरीव असे कार्य

बहुजनांच्या उन्नतीसाठी शाहूंनी अनेक निर्णय घेतले ज्यामध्ये प्राथमिक शिक्षण मोफत केले, अंतरजातीय व विधवाविवाहास परवानगी दिली, बहुजन समाजाला राजकीय निर्णयप्रक्रियेत स्थान दिले असे अनेक निर्णय घेऊन त्यांनी खऱ्या अर्थाने बहुजन समाजाला न्याय दिला.

डॉ. आंबेडकरांना मूकनायक वृत्तपत्र चालविण्यासाठी व शिक्षणासाठी आर्थिक मदत केली, तसेच हजारो गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी वसतीगृहे,शैक्षणिक संस्थांचे निर्माण केले.

कला-क्रीडा-संस्कृती यांमध्येही राजर्षी शाहूंनी अनेक कलाकारांना,क्रीडापटूंना राजाश्रय दिला त्यामध्ये कोल्हापूरच्या अनेक कलाकारांचा समावेश होता उदा.चित्रकार आबालाल रेहमान, कलाकारांसाठी  शाहूंनी कोल्हापूर सिनेटोन आताचा जयप्रभा स्टुडिओची उभारणीही केली.

राधानगरी धरण व यासारखे अनेक प्रकल्प राबवून त्यांनी लोकांच्या अनेक समस्या सोडविल्या.

कानपूरच्या कुर्मी समाजाने शाहूंना राजर्षी ही पदवी देऊन त्यांचा गौरव केला.

आपल्या संस्थानात मागासवर्गीयांना शिक्षणात व नोकरीत पन्नास टक्के आरक्षण देणारे ते पहिले राजे होते.

शिक्षणतज्ञ व डॉक्टर मारिया माँटेसरी यांचे निधन. 06 मे 1952

अल्पपरिचय

डॉ. मारिया टेक्ला अर्टमिसिया माँटेसरी या  प्रसिध्द इटालियन डॉक्टर व  शिक्षणतज्ञ होत्या. पूर्वप्राथमिक शिक्षणाची सुरूवात त्यांनी केली, त्यामुळे पूर्वप्राथमिक शिक्षण वर्गांना माँटेसरी असे  संबोधले जाते.

जन्म

31 ऑगस्ट 1870 चेराविले,मार्शे, इटली

मृत्यू

06 मे 1952 नॉर्डविक, साउथ हॉलंड

शिक्षण

युनिर्व्हर्सिटी ऑफ रोम ला सॅपियेन्झा मेडिकल स्कूल

कार्य

पूर्वप्राथमिक शिक्षणाच्या माँटेसरी पध्दतीच्या प्रणेत्या त्यांच्याच नाववरून या पध्दतीला माँटेसरी असे नाव दिले गेले.

माँटेसरी या रोम विद्यापीठातून डॉक्टर बनणाऱ्या पहिल्या महिला होत्या, त्यांनी सुरूवातीला दिव्यांग बालकांसाठी शिक्षक म्हणून कार्य करण्यास सुरूवात केली, ज्यावेळी त्यांना या बालकांसाठी वेगळा शिक्षण अभ्यासक्रमाची गरज वाटली तेव्हा त्यांनी स्वत: त्यांच्यावर उपचार चालू केले व अशा पध्दतीच्या शिक्षणपध्दतीचा उपयोग सर्वसामान्य मुलांवर केल्यास त्याचा फायदा त्यांना अधिक होईल असे त्यांना निदर्शनास आल्यावर त्यांनी सर्वसमावेशित अशा माँटेसरी शिक्षणपध्दतीचे आरेखन केले ज्यामुळे पूर्वप्राथमिक शिक्षणपध्दती विकसित झाली.

मॉंटेसरी यांच्या शिक्षणपध्दतीमध्ये साधारणत: एकमेकांशी ओळख करून घेणे, वैयक्तीक व  स्वच्छतेचे महत्व समजावून सांगणे, सभोवतालच्या परिसराचे अर्थात वर्गखोल्या व इतर परिसराची स्वच्छता करणे, सामुहिक प्रार्थना,कवायत करणे, दुपारच्या जेवणाच्या सुटीमध्ये जेवणाआधीची छोटी प्रार्थना, विविध खेळ, शिक्षक व विद्यार्थी मिळून असलेले विविध खेळ,विविध प्रकारची मातीची खेळणी बनविण्यास शिकविणे, कवायत व विविध गुणदर्शन कार्यक्रम अशा अनेक बाबींचा समावेश होतो.

आपल्या शिक्षणपध्दतीचा जगभर प्रसार प्रचार करण्यासाठी माँटेसरी यांनी अनेक देशांचे दौरे केले व तेथील शिक्षकांना याविषयी प्रशिक्षित केले.

1929 मध्ये अंतरराष्ट्रीय माँटेसरी संघाची स्थापना झाली व मॉंटेसरी या संघाच्या  तहहयात अध्यक्ष होत्या, याव्दारे अनेक देशांत माँटेसरी शिक्षणपध्दतीचा प्रसार व प्रचार करण्यात आला.

माँटेसरी यांनी आपल्या शिक्षणपध्दतीविषयी अनेक पुस्तके लिहून त्याव्दारे अनेक गोष्टी नजरेस आणल्या.

पुस्तके

  • द डिस्कवरी ऑव द चाइल्ड
  • द ऐबसॉरबेंट माइंड'
  • 'द सीक्रेट ऑव चाइल्डहुड
  • टु एजुकेट द ह्यूमन पोटेंशल
  • एजुकेशन फार अ न्यू वर्ल्ड
  • द चाइल्ड
  • रिकंस्ट्रक्शन इन एजुकेशन
  • पीस ऐंड एजुकेशन
  • ह्वाट यू शुड नो एबाउट योर चाइल्ड

रॅग्लर रघुनाथ पुरूषोत्तम परांजपे यांचे निधन. 06 मे 1966

अल्पपरिचय

रघुनाथ पुरूषोत्तम परांजपे हे भारतातील पहिले सिनियर रँग्लर, पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू व समाजकार्यातील एक आग्रणी व्यक्तीमत्व होते. रँग्लर परांजपे यांच्याविषयी अधिक माहितीसाठी येथे भेट द्या.

संदर्भ व आभार

https://www.google.com/

https://www.wikipedia.org/

 

संकल्पना,संकलन व संपादन

भालचंद्र माधव इनामदार

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

13 ऑक्टोबर दिनविशेष-13 october dinvishesh-13-10-2020

ऑक्टोबर 14 2020-आजचा दिनविशेष- october 14 2020-aajcha dinvishesh

2020 ऑक्टोबर 21-2020 october 21