25 जून -भारताचा पहिला क्रिकेट विश्वचषक विजय-1983 विशेष

25 जून -भारताचा पहिला क्रिकेट विश्वचषक विजय-1983 विशेष 

लॉर्ड माउंटबॅटन यांचा जन्म. 25 जून 1900

अल्पपरिचय

    लॉर्ड लुई माउंटबॅटन तथा लुई फ्रान्सिस अॅल्बर्ट व्हिक्टर निकोलस ऑफ बॅटनबर्ग  हे भारताचे शेवटचे व्हाइसरॉय व स्वतंत्र भारताचे पहिले गर्व्हनर जनरल होते.

जन्म

25 जून 1900 विंडसर, इंग्लंड, युनायटेड किंग्डम

मृत्यू

27 ऑगस्ट 1979 कौंटी स्लिगो, रिपब्लिक ऑफ आर्यलँड

शिक्षण

रॉयल नेव्ही कॉलेज ऑझबर्न

कार्य

ब्रिटीश नौदलात संदेशवहन व दूरसंदेश क्षेत्रात कार्य

पहिल्या महायुध्दात कॅडेट म्हणून नौदलात कार्य

दुसऱ्या महायुध्दात केली जहाजाचे कॅप्टन

चीफ ऑफ आर्मी स्टाफ म्हणून पंतप्रधान चर्चिल यांच्याव्दारे नेमणूक-1941

ब्रह्मदेश,सिंगापूर येथील दोस्त राष्ट्रांच्या दुसऱ्या महायुध्दातील विजयात मुख्य कामगिरी

भारताचे शेवटचे व्हाईसरॉय कार्यकाळ- 21 फेब्रुवारी 1947 ते 15 ऑगस्ट 1947

भारताचे पहिले गर्व्हनर जनरल कार्यकाळ-15 ऑगस्ट 1947 ते 21 जून 1948

लॉर्ड माउंटबॅटन यांनी भारतीय स्वातंत्र्यसाठी लॉर्ड वेव्हेल व राजाजी योजना अयशस्वी ठरल्यानंतर भारतातील प्रत्येक प्रमुख राजकीय नेत्याशी चर्चा करून माउंटबॅटन योजना आणली. यानुसार तत्कालीन ब्रिटीश पंतप्रधान क्लेंमंट ॲटली यांनी जून 1948 पूर्वी भारतास स्वातंत्र्य दिले जाईल असे सांगितले. माउंटबॅटन यांची योजनेत तीन कलमे महत्वाची होती ती म्हणजे

  • भारत व पाकिस्तान अशी दोन राष्ट्रे निर्माण होतील.
  • स्वतंत्र भारत व पाकिस्तान यांच्या सीमा निर्धारण करण्यासाठी स्वतंत्र आयोग नेमण्यात येईल. 
  • स्वतंत्र संस्थानिकांना स्वयंनिर्णयाव्दारे भारत अथवा पाकिस्तानात सम्मिलीत होता येईल.

या प्रमाणे त्यांनी 03 जून 1947 ला भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य देण्यात येईल असे घोषीत केले तर पाकिस्तान हा 14 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र होईल असे जाहीर केले.

नाटोच्या नौदलाचे कमांडर इन चीफ- कार्यकाळ-1952 ते 1955

ब्रिटीश नौदलाचे प्रमुख-कार्यकाळ-1955 ते 1959

ब्रिटीश संरक्षण विभागाचे प्रमुख व चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ-1959 ते 1965 

पुरस्कार

फर्स्ट अर्ल मांउंटबॅटन ऑफ बर्मा

नाईट ऑफ गार्टर

नाईट ग्रँड क्रॉस ऑफ दि ऑर्डर ऑफ दि बाथ

मेम्बर ऑफ दि ऑर्डर ऑफ मेरीट

नाईट ग्रँड कमांडर ऑफ दि मोस्ट एक्सल्टेड ऑर्डर ऑफ दि स्टार ऑफ इंडिया

नाईट ग्रॅंड कमांडर ऑफ दि मोस्ट इमेनियंट ऑर्डर ऑफ दि इंडियन एम्पायर

माजी पंतप्रधान विश्चनाथ प्रताप सिंग यांचा जन्म. 25 जून 1931

अल्पपरिचय

विश्वनाथ प्रताप सिंग तथा व्ही. पी. सिंग हे भारताचे माजी पंतप्रधान होते. व्ही.पी. सिंग हे भारताचे आठवे पंतप्रधान तर उत्तरप्रदेशचे 12 वे मुख्यमंत्री होते. व्ही. पी. सिंग यांच्याविषयी अधिक माहितीसाठी येथे भेट द्या.

भारतात आणीबाणी घोषीत 25 जून 1975

भारतात आणीबाणी लागू 

    आलाहाबाद उच्च न्यायालयाने तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधीना निवडणूकीतील गैरव्यवहाराच्या अरोपात दोषी ठरविले व निवडणूक लढविण्यासाठी सहा वर्षांची बंदी घातली. सर्वोच्च न्यायालयाने या निर्णयास स्थगिती दिली परंतू संसदीय कामकाजात सहभागी होण्यास मज्जाव केला. 24 जून 1975 साली राष्ट्रपती फक्रद्दीन अली अहमद व इंदिरा गांधी यांनी चर्चा केली व 25 जून 1975 रोजी इंदिरा गांधी यांनी राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात आल्यामुळे  राष्ट्रपतींनी संविधानाच्या 352-1 कलमान्वये  राष्ट्रीय आणीबाणी घोषीत केल्याचे आकाशवाणीवरील आपल्या भाषणात सांगीतले, याचबरोबर प्रमुख विरोधी नेत्यांना कारावासात टाकण्यात आले, वृत्तपत्रे व प्रसरमाध्यमांच्या अधिकारांवर मर्यादा घातली गेली व अंतर्गत सुरक्षा कायदा लागू करण्यात आला. आर्थिक व सामाजिक सुधारणांसाठी 20 कलमी कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली, लोकसंख्या नियंत्रण ह्या महत्वपूर्ण विषयाचा त्यामध्ये अंतर्भाव होता. याविरूध्द समाजवादी पक्ष व इतर अनेक मातब्बर नेत्यांनी आवाज उठविला व अंदोलन उभारले, जयप्रकाश नारायण,मृणाल गोरे यांनी या अंदोलनाचे प्रभावी नेतृत्व केले व हे अंदोलन देशव्यापी करून आणीबाणीविरोधात भक्कम जनाधार मिळविला. तब्बल 2 वर्षानंतर लोकसभा विसर्जित करून निवडणूकांची घोषणा करण्यात आली व 21 मार्च 1977 रोजी ही आणीबाणी मागे घेण्यात आली. आणीबाणीमुळे जनाधार गमावलेला काँग्रेस पक्ष निवडणूकांमध्ये पराभूत झाला व जनता पक्षाचे मोरारजी देसाई पहिले काँग्रेसेतर पंतप्रधान बनले. 

भारताने वेस्ट इंडिजचा पराभव करत विश्वकरंडकावर अनपेक्षीतरित्या नाव कोरले. 

25 जून 1983 

भारताचा विश्चचषक विजय 1983 

कपिलदेवच्या नेतृत्वात भारताने 1983 च्या क्रिकेट विश्चचषक स्पर्धेची अंतिम फेरी गाठली व भारताला पहिल्यांदा विश्चचषकावर नाव कोरण्याची संधी मिळाली. 1975 व 1979 च्या स्पर्धांमध्ये भारतीय संघ प्राथमिक फेरीतच विश्चचषकाच्या बाहेर पडला होता त्यामुळे भारतीय संघाकडून कुणीही विजयाची अपेक्षा केली नव्हती परंतू कपिलदेव यांचे कल्पक नेतृत्व व त्याला रॉजर बिन्नी,मोहिंदर अमरनाथ,मदनलाल,सुनील गावस्कर अशा खेळाडूंची मोलाची साथ यांमुळे भारताने अश्चर्यकारकरित्या वेस्ट इंडिजला हरवून 1983 च्या विश्चचषकावर नाव कोरले ते ही सर्वबाद 183 इतकी कमी धावसंख्या असताना जी अजूनही कोणत्याही विश्वचषकाच्या सामन्यातील सर्वात कमी असलेली विजयी धावसंख्या आहे. या विजयाने भारतात क्रिकेट खेळ रूजण्यास व विकसित होण्यास मदत झाली व आजच्या भारतीय क्रिकेटच्या यशाचा पाया घातला गेला यात दुमत नाही.

प्रुडेन्शियल क्रिकेट वर्ल्ड कप 1983 अंतिम सामना निकाल: भारत 43 धावांनी विजयी

सामन्याचे ठिकाण: लॉर्ड्स, लंडन, युनायटेड किंग्डम

नाणेफेक: वेस्ट इंडिजची नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी

धावफलक:

भारत:54.4(60) षटकांत सर्वबाद 183 के श्रीकांत 38,मो. अमरनाथ 26,अँडी रॉबर्ट्स 10-3-32-3,मायकेल होल्डिंग 9.4-2-26-2

वेस्ट इंडिज:52(60) षटकांत सर्वबाद 140 व्हिव्ह रिचर्ड्स 33, मदनलाल 12-2-31-3,मो. अमरनाथ 7-0-12-3

संदर्भ व आभार

https://www.google.com/

https://www.wikipedia.org/

https://vishwakosh.marathi.gov.in/

https://www.espncricinfo.com/


संकल्पना,संकलन व संपादन

भालचंद्र माधव इनामदार 



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

13 ऑक्टोबर दिनविशेष-13 october dinvishesh-13-10-2020

ऑक्टोबर 14 2020-आजचा दिनविशेष- october 14 2020-aajcha dinvishesh

2020 ऑक्टोबर 21-2020 october 21