24 जून 2021-24 June
24 जून 2021-24 June
रँडचा वध करणारे क्रांतीकारी दामोदर हरी चाफेकर यांचा जन्म. 24 जून 1869
अल्पपरिचय
दामोदर हरी चाफेकर हे प्रसिध्द क्रांतीकारी होते. पुण्याजवळील पिंपरी
चिंचवड येथे हरीपंत चाफेकर यांच्या जेष्ठ पुत्राच्या रूपात त्यांचा जन्म झाला. बालपणापासूनच
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक व महर्षी अण्णासाहेब पटवर्धन यांना आदर्श मानणाऱ्या चाफेकर
बंधूंना क्रांतीकार्याची आवड होती. रँड या
प्लेग निर्मुलनासाठी नेमण्यात आलेल्या जुलमी अधिकाऱ्याच्या वधाबद्दल त्यांना तसेच त्यांचे
बंधू वासुदेव,बाळकृष्ण यांना इंग्रज सरकारने 18 एप्रिल 1898 रोजी फाशीची शिक्षा सुनावली.
दामोदर चाफेकर व चाफेकर बंधूंनी केलेल्या कार्याबद्दल अधिक जाणून घेण्यसाठी येथे भेट द्या.
गायक पंडित ओंकारनाथ ठाकूर यांचा जन्म. 24 जून 1897
अल्पपरिचय
पंडित ओंकारनाथ ठाकूर हे संगीत गुरू व हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत गायक
होते.
जन्म
24 जून 1897 जहाज, बडोदा, ब्रिटीश भारत सध्या जि. आनंद, गुजरात, भारत
मृत्यू
29 डिसेंबर 1967 बॉम्बे, महाराष्ट्र, भारत
शिक्षण
पंडित विष्णू दिगंबर पलुसकर यांच्याकडून संगीतशिक्षण घेतले.
कार्य
प्रसिध्द संगीत गुरू, हिंदूस्थानी शास्त्रीय संगीत गायक
लाहोरच्या गंधर्व महाविद्यालयाचे प्राचार्य
भरूच येथे गंधर्व निकेतन या संगीत विद्यालयाची 1919 ला त्यांनी स्थापना
केली.
भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील असहकार अंदोलनात त्यांनी सहभाग घेतला व ते
भरूच काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बनले.
बनारस हिंदू विश्वविद्यालयाच्या संगीत विभागाचे प्रमुख म्हणूनही त्यांनी
काम पाहिले.
युरोप मध्ये संगीत कार्यक्रम करणाऱ्या पहिल्या काही मोजक्या संगीत गायकांपैकी
ते एक होते. 1933 पासून 1954 पर्यंत त्यांनी
युरोपमध्ये आपले संगीत कार्यक्रम केले.
पुस्तके
संगीतांजली खंड एक ते सहा
पुरस्कार
पद्मश्री पुरस्कार
संगीत नाटक अकादमी पुरस्कार
मानद डॉक्टरेट-बनारस हिंदू विश्वविद्यालय व रविंद्र भारती विद्यापीठ
माजी राष्ट्रपती व्ही. व्ही. गिरी
यांचे निधन. 24 जून 1980
अल्पपरिचय
वराहगिरी वेंकटगिरी तथा व्ही.व्ही. गिरी हे भाराताचे माजी राष्ट्रपती
होते.
जन्म
10 ऑगस्ट 1894 ब्रह्मपूर, मद्रास प्रेसिडन्सी, ब्रिटीश भारत सध्या ओडीसा
भारत
मृत्यू
24 जून 1980 मद्रास, तामीळनाडू, भारत
शिक्षण
डब्लीन विद्यापीठातून कायद्याचा अभ्यास
कार्य
मद्रास येथे वकीली
कामगार अंदोलनात ते सक्रीय होते. स्वातंत्र्यलढ्यात सक्रीय असतानाच मद्रास
व नागपूर येथे त्यांनी रेल्वे कामगारांचे संघटन केले व रेल्वे मजूर ट्रेड युनियनची
स्थापना करण्यात मुख्य भूमिका निभावली.
1927 मध्ये झालेल्या अंतरराष्ट्रीय मजूर काँग्रेसमध्येही त्यांनी प्रतिनिधित्व
केले.
मद्रास राज्याचे श्रम,उद्योग, सहकार व वाणिज्य मंत्रालयाचे मंत्री कार्यकाळ-1937
ते 1939,1946 ते 1947
सीलोन आताची श्रीलंका येथे भारतीय उच्चायुक्त कार्यकाळ-1947 ते 1951
भारताच्या पहिल्या लोकसभेत खासदार व पहिले श्रम मंत्री कार्यकाळ-1952
ते 1957
उत्तरप्रदेश,केरळ व म्हैसूरचे राज्यपाल म्हणून त्यांनी 1957 ते 1967 पर्यंत
कार्य केले.
राष्ट्रपती झाकीर हुसेन यांच्या कार्यकाळात देशाचे तिसरे उपराष्ट्रपती
म्हणून 1967 ते 1969 पर्यंत त्यांनी कार्य केले व अल्पकाळासाठी झाकीर हुसेन यांच्या
आकस्मिक निधनानंतर काळजीवाहू राष्ट्रपती म्हणूनही कार्य केले.
भारताचे चौथे राष्ट्रपती म्हणून व्ही. व्ही. गिरी यांनी 24 ऑगस्ट
1969 ला शपथ घेतली ते 24 ऑगस्ट 1974 पर्यंत भारताचे राष्ट्रपती होते.
पुरस्कार
भारतरत्न 1975
आजचे पुरस्कार
अलाहाबाद विद्यापीठाच्या (सध्याचे प्रयागराज विद्यापीठ)संस्कृतमधील डी.लीट.पदवीने
अलिगढ विद्यापीठातील प्राध्यापक डॉ. मोहंमद शेरीफ यांचा सन्मान. 24 जून 1996
अखिल भारतीय चित्रपट महामंडळाव्दारे दिला जाणारा 'चित्रभूषण पुरस्कार'
प्रसिध्द अभ्रिनेते चंद्रकांत मांडरे यांना जाहीर. 24 जून 1998
संदर्भ व आभार
https://m.bharatdiscovery.org/
संकल्पना,संकलन व संपादन
भालचंद्र माधव इनामदार
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
Please do not enter any spam link in comment.