18 एप्रिल 2021-जागतिक वारसा दिन विशेष
18 एप्रिल 2021-जागतिक वारसा दिन विशेष
जागतिक वारसा दिन-World Heritage Day
जागतिक वारसा दिन दरवर्षी 18 एप्रिलला साजरा केला जातो. युनेस्को ने या दिवसाची सुरवात केली. जागतिक वारसास्थळांची वर्गवारी करणारी संस्था म्हणून युनेस्को सर्वांना परिचित आहे. लिखित इतिहास, स्थळांचा इतिहास, राष्ट्रांचा इतिहास यांची जपणूक करण्याची जबाबदारी प्रत्येक जबाबदार नागरिकावर आहे व तिचेच महत्व अबाधित ठेऊन याची जाणीव अधिक दृढ करण्यासाठी युनेस्कोने हा दिवस साजरा करण्यास सुरवात केली.
महर्षी अण्णासाहेब तथा धोंडो केशव कर्वे यांचा जन्म. 18 एप्रिल 1858
अल्पपरिचय
महर्षी अण्णासाहेब तथा धोंडो केशव कर्वे हे प्रसिध्द समाजसुधारक, स्त्रीशिक्षण, विधवाविाह यांसाठी त्यांनी प्रयत्न केले. महर्षी कर्वे यांच्याद्दल आधिक जाणून घेण्यासाठी येथे भेट द्या.
रँडचा वध केल्याबद्दल चाफेकर बंधूंना फाशीची शिक्षा मिळाली. 18 एप्रिल 1898
रँडचा वध व चाफेकर बंधू
वासुदेव,दामोदर व बाळकृष्ण चाफेकर हे बंधू प्रसिध्द क्रांतीकारक होते. रँड या जुलमी इंग्रज अधिकाऱ्याची त्यांनी हत्या केली. चाफेकर बंधू पुण्यामध्ये अनेक क्रांतीकारी आंदोलनात व कांरवायांत सक्रीय होते. 1897 साली आलेल्या प्लेगच्या साथीत पुणे होरपळत होते त्याचवेळेस ब्रिटीश सरकारने हा रोग नियंत्रणात आणण्यासाठी वॉल्टर चार्ल्स रँडला पुण्यात पाचारण केले, पण रँडने सगळे सामाजिक नियम पायदळी तुडवून रोगप्रसार रोखण्यास सुरवात केली त्यामुळे लोक क्रोधीत झाले याचाच राग येऊन चाफेकर बंधूनी रँडचा वध करण्याची योजना बनविली. व्हिक्टोरिया राणीच्या हीरकमोहत्सवानिमित्त सगळीकडे पुण्यात रोषणाई करून मेजवानीचे आयोजन करण्यात आले होते या मेजवानीस रँड बाहेर पडणार ही खबर चाफेकर बंधूंना कळताच दामोदर चाफेकरांनी रँड निवासस्थानाबाहेर पडताच त्याच्यावर 22 जून 1897 रोजी गोळ्या झाडल्या त्यामुळे रँड काही दिवसांनी 03 जुलै 1897 ला मरण पावला. फंदफितुरीमुळे चाफेकर बंधू पकडले गेले व दामोदर चाफेकर यांना 18 एप्रिल 1898 ला वासुदेव चाफेकरांना 08 मे 1899 ला तर बाळकृष्ण चाफेकरांना 16 मे 1899 ला फाशी दिले गेले.
प्रसिध्द भौतिकशास्त्रज्ञ अल्बर्ट आइनस्टाइन यांचे निधन. 18 एप्रिल 1955
अल्पपरिचय
अल्बर्ट आइनस्टाइन हे प्रसिध्द जर्मन भौतिकशास्त्रज्ञ होते. सापेक्षतावादाचा सिध्दांत साऱ्या जगाला समजावून देऊन त्यांनी विज्ञानाचे महत्व पटवून दिले. अल्बर्ट आइनस्टाइन यांच्याविषयी अधिक माहितीसाठी येथे भेट द्या.
संदर्भ व आभार
संकल्पना,संकलन व संपादन
भालचंद्र माधव इनामदार
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
Please do not enter any spam link in comment.