02 जानेवारी 2021 दिनविशेष

02 जानेवारी 2021 दिनविशेष

02 जानेवारी 1944 महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे निधन.

अल्पपरिचय

विठ्ठल रामजी शिंदे हे थोर समाजसुधारक तसेच लेखक होते. समाजकारण,धर्म,मानवता यासारख्या विविध क्षेत्रांत त्यांनी कार्य केले. हिंदू धर्मातील अनिष्ट रूढी,परंपरा यांचा त्यांनी विरोध केला. विद्वत्ता,संयम व सेवावृत्ती या आदर्शांचे त्यांनी आयुष्यभर पालन केले. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे या नावाने ते ओळखले जातात.

जन्म

23 एप्रिल 1873 जमखंडी,कर्नाटक आधीचा ब्रिटीश भारत

मृत्यू

02 जानेवारी 1944

शिक्षण

बी.ए. फर्ग्युसन महाविद्यालय,पुणे

इंग्लंडमध्ये तौलानिक धर्माचा अभ्यास

कार्य

महर्षी शिंदे यांनी हिंदू धर्मातील अनिष्ठ रूढी,परंपारांचा विरोध केला, जातीभेद नष्ट करण्यासाठी कार्य केले.

अस्पृश्यांच्या कल्याणासाठी त्यांनी डिप्रेस्ड क्लास मिशनची सुरवात केली. या संस्थेच्या माध्यमातून त्यानी स्पश्य-अस्पृश्यातील भेद मिटवण्यासाठी कार्य केले. या संस्थेची उद्दिष्टे अशी होती.

अस्पृश्य समाजामध्ये शिक्षणाचा प्रसार करणॆ.

अस्पृश्य बांधवांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देणे.

अस्पृश्य बांधवांच्या  अडचणींचे निवारण करणे.

अस्पृश्यांना  खऱ्या धर्माची शिकवण व उपदेश  देणे आणि त्यांना चारित्र्यसंपन्न बनविणे.

ब्राह्मो समाज व प्रार्थना समाजाच्या माध्यमातून त्यांनी समाजातील विविध जातीधर्माच्या लोकांना या संघटनांच्या तत्वांचा प्रसार व प्रचार केला.

प्रार्थना समाजाचे कार्य करीत असताना त्यांनी अनेक ठिकाणी एकेश्वरी धर्माचा प्रसार केला तेथे लोकांना आपल्या व्याख्यानातून प्रार्थना समाजाची तत्वे समजावून सांगितली.

भारतीय स्वातंत्र्यलढ्यात भाग घेऊन त्यांनी कायदेभंग चळवळीत सहभाग घेतला व त्यासाठी त्यांनी कारवास भोगला.

शेतकरी चळवळीच्या माध्यमातून त्यांनी 1920 ते 1926 या कालावधीत शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे ब्रिटीश सरकारचे लक्ष वेधले.

साहित्य

महर्षी शिंदे यांनी आपल्या रोजनिशीच्या माध्यमातून तत्कालीन समाजव्यवस्था,राजकीय व्यवस्था व लोकांचे प्रश्न मांडले. चार भागांत लिहिलेल्या या रोजनिशी विविध काळात लिहिल्या यामध्ये त्यांनी 1928 साली लिहिलेल्या  'ब्राह्मो समाज शतसांवत्सरी सफर' या चौथ्या  रोजनिशीचाही समावेश होतो. महर्षी शिंदे यांच्या पहिल्या तीन रोजनिशींचे संपादन गो.मा.पवार यांनी केले तर चौथ्या रोजनिशीचे संपादन रणधीर शिंदे यांनी केले आहे.

माझ्या आठवणी व अनुभव हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिध्द आहे.

02 जानेवारी 1960 भारतीय क्रिकेटपटू रमण लांबा यांचा जन्म.

अल्पपरिचय

रमण लांबा हे भारतीय क्रिकेटपटू होते. उजव्या हताने आक्रमक फलंदाजी करणारे रमण लांबा देशांतर्गत क्रिकेटमधील एक आघाडीचे क्रिकेटपटू म्हणून ओळखले जात होते.

जन्म

02 जानेवारी 1960 मेरठ,उत्तर प्रदेश,भारत

मृत्यू

23 फेब्रुवारी 1998 ढाका,बंग्लादेश

कार्य

भारतासाठी क्रिकेट 1987 ते 1989

क्रिकेट कारर्किर्द

    रमण लांबा यांनी भारताचे प्रथमश्रेणी,कसोटी तसेच एकदिवसीय सामन्यात प्रतिनिधित्व केले. कसोटी क्रिकेटमध्ये त्यांनी चार कसोटीत खेळताना एका अर्धशतकासहीत 102 धावांचे योगदान दिले तर एकदिवसीय मध्ये 32 सामने खेळताना 27 च्या सरासरीने 783 धावांचे योगदान दिले. ज्यामध्ये त्यांचे सर्वाधिक वैयक्तीक सर्वोच्च 102 धावांचे योगदान होते. तर प्रथमश्रेणीत त्यांनी 121 सामन्यात खेळताना 53.86 च्या सरासरीने 8776 धावांचे योगदान दिले ज्यामध्ये 31 शतके व 27 अर्धशतकांचा समावेश होता व वैयक्तीक सर्वोच्च 320 धावा होत्या.

    रमण लांबा हे बंग्लादेशमधील ढाका येथे ढाका प्रिमियर लीगचा प्रिमियर डिव्हिजन लीगचा अंतिम सामना अब्बानी क्रिरा चक्र या संघाकडून मोहमदेन स्पोर्टिग क्लब विरूध्‍द  खेळत असताना क्षेत्ररक्षणावेळी हेल्मेट न घातल्यामुळे  फलंदाज मेहराब हुसेन याचा जोरदार फटका त्यांच्या कपाळावर बसला व त्यामुळे झालेल्या  अंतर्गत रक्तस्त्रावामुळे ते कोमात गेले व तीन दिवसानंतर त्यांचा 23 फेबुवारी 1998 रोजी   ढाका येथील रूग्णालयामध्ये मृत्यू झाला.

 आजचे पुरस्कार

पुणे विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू डॉ.वसंत गोवारीकर यांच्याहस्ते डॉ. सरोजिनी बाबर यांना सन्माननीय डी.लीट. पदवी प्रदान करण्यात आली. 02 जानेवारी 1998


संदर्भ व आभार

https://www.google.com/

https://www.wikipedia.org/

https://www.cricbuzz.com/


संकल्पना,संकलन व संपादन

भालचंद्र माधव इनामदार


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

13 ऑक्टोबर दिनविशेष-13 october dinvishesh-13-10-2020

ऑक्टोबर 14 2020-आजचा दिनविशेष- october 14 2020-aajcha dinvishesh

ऑक्टोबर 18 2020-October 18 2020