29 नोव्हेंबर 2021-29 November
29 नोव्हेंबर 2021-29 November
लेखक , पत्रकार प्रभाकर नारायण तथा भाऊ पाध्ये
यांचा जन्म. 29 नोव्हेंबर 1926
अल्पपरिचय
प्रभाकर नारायण तथा
भाऊ पाध्ये हे प्रसिध्द पत्रकार, लेखक तसेच
सामाजिक कार्यकर्ते होते. करंटा, वणवा,
वासूनाका, अग्रेसर अशा त्यांच्या अनेक कादंबऱ्या
तसेच कथासंग्रह प्रसिध्द आहेत. महाराष्ट्रातील कामगार चळवळीत
त्यांचे मोलाचे योगदान होते. प्रभाकर नारायण तथा भाऊ पाध्ये यांच्याविषयी अधिक माहितीसाठी
येथे भेट द्या.
रविकिरण मंडळातील कवी माधव ज्युलियन यांचे निधन. 29 नोव्हेंबर 1939
अल्पपरिचय
माधव ज्युलियन तथा माधव त्र्यंबक पटवर्धन हे रविकिरण मंडळातील
संस्थापककांपैकी एक असलेले प्रसिध्द मराठी कवी होते. मराठी असे आमुची
मायबोली, कशासाठी पोटासाठी अशा त्यांच्या अनेक कविता तसेच स्वप्नरंजन,
सुधारक असे कवितासंग्रह व दीर्घकाव्य त्यांची प्रसिध्द आहेत.
माधव ज्युलियन यांच्या बऱ्याच कविता व काव्यसंग्रह महाराष्ट्र शासनाच्या
शालेय तसेच महाविद्यालयीन अभ्यासक्रमात सामाविष्ट आहेत. माधव
ज्युलियन यांच्याविषयी अधिक माहितीसाठी येथे भेट द्या.
युगोस्लविया प्रजासत्ताक बनले. 29 नोव्हेंबर 1945
युगोस्लाविया
युगोस्लाविया
हा दक्षिणपूर्व युरोप व मध्य युरोपातील 20 व्या शतकातील एक देश
होता. 29 नोव्हेंबर 1945 रोजी हा देश प्रजासत्ताक
बनला. 1945 पासून 1992 पर्यंत हा देश युगोस्लाविया
या नावाने अस्तित्वात होता व त्याची राजधानी बेलग्रेड होती. सध्या
हा देश बोस्निया व हर्जेगोविना, क्रोएशिया, कोसोवो, मौंटिनिग्रो, नॉर्थ मॅसेडोनिया,
सर्बिया, स्लोवेनिया या सात देशात विभाजित आहे.
सध्या या देशाचा मुख्य भाग सर्बियाने व्यापलेला असून बेलग्रेड ही सर्बियाची
राजधानी आहे.
प्रसिध्द उद्योगपती जे. आर. डी. टाटा यांचे निधन. 29 नोव्हेंबर
1993
अल्पपरिचय
जे.आर.डी.
टाटा तथा जहाँगीर रतनजी दादाभॉय टाटा हे टाटा या भारतातील प्रसिध्द उद्योगसमूहाचे
अध्यक्ष व भारतातील नागरी विमान वाहतुकीचे जनक अर्थात पूर्वीच्या टाटा एअरलाईन्सचे
प्रणेते व सध्याच्या एअर इंडियाचे अनेक वर्षे प्रमुख व मार्गदर्शक होते. जे. आर.डी. टाटा यांनी केलेल्या दूरदर्शी कार्यामुळे टाटा उद्योगसूह व भारतीय नागरी विमान
वाहतुकीचा प्रचंड विकास झाला. जे.आर.डी. टाटा यांच्याविषयी अधिक माहितीसाठी येथे भेट द्या.
आजचे पुरस्कार
- मायभूमी अल्बानियाचा सर्वोच्च पुरस्कार नोबेलविजेत्या समाजसेविका मदर तेरेसा यांना जाहीर. 29 नोव्हेंबर 1996
- प्रसिध्द गायक उस्ताद गुलाम मुस्तफा खाँ, घटमवादक टी.एच. विक्कू राम यांना
हाफिज अली स्मृती पुरस्कार जाहीर. 29 नोव्हेंबर 2000
- बंग्लादेशच्या ग्रामीण बँकेस व दक्षिण अफ्रिकेचे माजी अध्यक्ष
व वर्णव्देषी चळवळीतील प्रसिध्द जागतिक नेते नेल्सन मंडेला यांना गांधी शांतता पुरस्कार
जाहीर.
29 नोव्हेंबर 2000
- टेक्सासच्या ए अँड एम युनिर्व्हसिटीतील सहयोगी प्राध्यापक
व फळे व भाज्यांचे तज्ञ डॉ. भीमू पाटील यांना तरूण शास्त्रज्ञ हा सन्मान
प्रदान. 29 नोव्हेंबर 2004
संदर्भ व आभार
संकल्पना, संकलन व संपादन
भालचंद्र माधव इनामदार
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
Please do not enter any spam link in comment.