29-11 - दिनविशेष

29-11 - दिनविशेष

29-11-2020 इंटरनॅशनल डे ऑफ सॉलिडॅरिटी विथ पॅलेस्टाइन पीपल अर्थात पॅलेस्टाइन लोकांबरोबर अंतराष्ट्रीय एकता दिवस

 इंटरनॅशनल डे ऑफ सॉलिडॅरिटी  विथ पॅलेस्टाइन पीपल

    इंटरनॅशनल डे ऑफ सॉलिडॅरिटी विथ पॅलेस्टाइन पीपल हा दिवस 29 नोव्हेंबर रोजी जगभर साजरा केला जातो.पॅलेस्टाइनचे विभाजन व पॅलेस्टाइन लोकांचे हक्क संरक्षण अबाधित ठेवण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेव्दारा पारीत प्रस्ताव क्र 32/40ब अन्वये 29 नोव्हेंबर 1947 रोजी हा दिवस इंटरनॅशनल डे ऑफ सॉलिडॅरिटी विथ पॅलेस्टाइन पीपल हा दिवस साजरा करण्यास मान्यता देण्यात आली. यावर्षी या  दिवसाचे कार्यक्रम  1 डिसेंबर रोजी साजरे करण्यात येणार आहेत.

29-11-1926 लेखक व पत्रकार भाऊ पाध्ये यांचा जन्म.

अल्पपरिचय

भाऊ पाध्ये तथा प्रभाकर नारायण पाध्ये हे लेखक,पत्रकार तसेच कामगार चळवळीतील कार्यकर्ते होते.

जन्म

29-11-1926 मुंबई,ब्रिटीश भारत

मृत्यू

30-10-1996

शिक्षण

मुंबई विद्यापीठातून अर्थशास्त्रात पदवीधर

कार्य

मराठी साहित्यात कादंबरीकार म्हणून योगदान तसेच कामगार चळवळीत कार्यकर्ते

साहित्य

  • अग्रेसर
  • ऑपरेशन छक्का
  • एक सुन्हेर ख्वाब
  • करंटा
  • गुरुदत्त
  • डोंबार्याचा खेळ
  • दावेदार
  • पिचकारी
  • बॅरिस्टर अनिरुद्ध धोपेश्वरकर
  • भाऊ पाध्ये यांची कथा
  • भाऊ पाध्ये यांच्या श्रेष्ठ कथा
  • मुरगी
  • राडा
  • वॉर्ड नंबर ७-सर्जिकल
  • वासूनाका
  • वैतागवाडी
  • वैतागवाडी (५वी आवृत्ती)
  • होमसिक ब्रिगेड
  • वणवा
  • थालीपीठ
  • जेल बर्ड्स
  • थोडीसी जो पी ली

पुरस्कार

  • वैतागवाडी कादंबरीसाठी महाराष्ट्र शासनाचा पुररकार 1965
  • बॅरिस्टर अनिरूध्द धोपेश्वरकर कादंबरीसाठी ललित पुरस्कार 1968
  • महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ गौरववृत्ती 1993

29-11-1939 कवी माधव ज्युलियन यांचे निधन.

अल्पपरिचय

माधव त्र्यंबक पटवर्धन तथा माधव ज्युलियन  हे मराठी भाषेतील अग्रणी कवी,कोशकार तसेच व्यासंगी होते. ते रविकिरण मंडळाचे एक संस्थापक कवी होते.

जन्म

21-01-1894 बडोदा संस्थान,ब्रिटीश भारत

मृत्यू

29-11-1939

शिक्षण

बी.ए. फारसी भाषा

एम.ए. इंग्रजी साहित्य

कार्य

फर्ग्युसन महाविद्यालय पुणे येथे फारसीचे अध्यापन

राजराम महाविद्यालय कोल्हापूर येथे फारसीचे अध्यापन

साहित्यसंपदा

  • उमरखय्यामच्या रुबाया (इ.स. १९२९, मूळ पर्शियन रुबायांचा पहिला अनुवाद)
  • काव्यचिकित्सा (निधनोत्तर इ.स. १९६४, लेखसंग्रह)
  • काव्यविहार (निधनोत्तर इ.स. १९४७, लेखसंग्रह)
  • गज्जलांजली(१९३३, स्फुट गझला)
  • छंदोरचना (१९३७, संशोधनात्मक)
  • तुटलेले दिवे (१९३८, एक 'सुनितांची माला'नामक दीर्घकाव्य आणि बाकीच्या स्फुट कविता)
  • द्राक्षकन्या (इ.स. १९३१, रुबायांचे दुसरे मराठी भाषांतर)
  • नकुलालङ्कार (इ.स. १९२९, दीर्घकाव्य)
  • फारसी - मराठी शब्दकोष (इ.स. १९२५)
  • भाषाशुद्धि-विवेक (१९३८, लेख आणि भाषणे)
  • मधुलहरी (मृत्यूनंतर इ.स. १९४०, रुबायांचे सुधारित तिसरे भाषांतर)
  • विरहतरङ्ग (इ.स. १९२६, खंडकाव्य)
  • सुधारक (१९२८, दीर्घकाव्य)
  • स्वप्नरंजन (१९३४, काव्यसंग्रह)
  • प्रसिद्ध कविता
  • कशासाठी पोटासाठी
  • जीव तुला लोभला माझ्यावरी
  • प्रेम कोणीही करीना
  • प्रेमस्वरूप आई
  • मराठी असे आमुची मायबोली

सन्मान व पुरस्कार

  • नाशिक कवीसंमेलनाचे अध्यक्ष 1933
  • बडोदा साहित्यसंमेलनात कवी शाखेचे अध्यक्ष 1934
  • जळगाव येथील साहित्य संमेलनाचे अध्यक्ष 1936
  • मराठी साहित्यातील योगदानाबद्दल डी.लीट मुंबई विद्यापीठ मिळालेले पहिले छंदोरचना या काव्यासाठी 1938

29-11-1993 उद्योगपती जे.आर.डी. टाटा यांचे निधन.

ल्पपरिचय

जे.आर.डी. टाटा अर्थात जहांगीर रतनजी दादाभॉय हे भारतातील टाटा उद्योगसमूहाचे अध्यक्ष, भारतीय नागरी विमान वाहतुकीचे जनक होते.

जन्म

29-07-1904 पॅरिस

मृत्यू

29-11-1993 जिनेव्हा

कार्य

  • टाटा सन्सचे अध्यक्ष 1928
  • टाटा यांना भारतात दिलेला पहिला भारतीय वैमानिक परवाना 1929 साली मिळाला.
  • टाटा एअरलाइन्स त्यांनी 1932 साली सुरू केली.
  • टाटा यांनी टाटा सामाजिक विज्ञान संस्था-टीआयएसएस सुरू केली. 1936
  • टाटा मेमोरियल सेंटर फॉर कॅन्सर रिसर्च अँन्ड ट्रिटमेंटची स्थापना. 1941
  • टाटा मूलभूत अनुसंधान संशोधन केंद्र टीआयएफआरची स्थापना केली.1945
  • टाटा यांनी टेल्कोची स्थापना केली. 1945
  • भारतीय स्वातंत्र्यानंतर टाटा एअरलाइन्स ही कंपनी भारत सरकारने सरकारी मालकीची कंपनी बनविली व तिचे एअर इंडिया असे नामकरण केले. टाटा यांच्याहस्ते एअर इंडिया इंटरनॅशनल सुरू करण्यात आली.1948
  • जे.आर.डी. टाटा यांना एअर इंडियाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती दिली गेली. व त्यांना इंडियन एअरलाईन्स च्या संचालक मंडळावर नेमण्यात आले. 1953
  • टाटा कन्स्लटन्सी सर्व्हिसेस अर्थात टीसीएसची स्थापना करण्यात आली. 1968

पुरस्कार व सन्मान

  • भारतीय वायुदलाचे ते मानद व्हाइस मार्शल होते.
  • टोनी जेन्स ॲवॉर्ड
  • फेडरेशन एरोनॉटिक इंटरनॅशनल व्दारा गोल्ड एअर पदक
  • एडवर्ड वॉर्नर पुरस्कार
  • डॅनिएल गुग्नेइनिम ॲवॉर्ड
  • पद्मविभूषण 1955
  • भारतरत्न 1992

आजचे पुरस्कार

  • 29-11-1996अल्बानियाचा सर्वोच्च  नागरी पुरस्कार ’गोल्डन ऑनर’ नोबेल पारितोषिकविजेत्या समाजसेविका मदर तेरेसा यांना जाहीर.
  • 29-11-2000 उस्ताद हफीज अली खाँ स्मृती पुरस्कार’  शास्त्रीय गायक गुलाम मुस्तफा खाँ आणि घटमवादक टी. एच. विक्कू विनायक राम यांना  जाहीर
  • 29-11-2000 ’गांधी शांतता पुरस्कार’ दक्षिण अफ्रिकेचे माजी अध्यक्ष डॉ. नेल्सन मंडेला व बांगलादेशच्या ग्रामीण बँकेस जाहीर.


 

संदर्भ व आभार

https://www.google.com/

https://www.wikipedia.org/

https://www.un.org/

 

संकल्पना,संकलन व संपादन

भालचंद्र माधव इनामदार

 

 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

13 ऑक्टोबर दिनविशेष-13 october dinvishesh-13-10-2020

ऑक्टोबर 14 2020-आजचा दिनविशेष- october 14 2020-aajcha dinvishesh

2020 ऑक्टोबर 21-2020 october 21