28 नोव्हेंबर 2021- November 28
28 नोव्हेंबर 2021- November 28
पनामाला स्पेनपासून स्वातंत्र्य. 28 नोव्हेंबर 1821
पनामा
पनामा अधिकृतरित्या रिपब्लिक ऑफ पनामा हा मध्य व दक्षिण अमेरिकेतील
एक देश असून स्पेनपासून पनामाला 28 नोव्हेंबर 1821 रोजी स्वातंत्र्य मिळाले. जगप्रसिध्द पनामा कालवा या
देशातून वाहतो.
देश: रिपब्लिक ऑफ पनामा
राजधानी: पनामा सिटी
राष्ट्रभाषा: स्पॅनिश
चलन: बाल्बोवा व अमेरिकन डॉलर
सीमा: पश्चिमेस कोस्टारिका, दक्षिणपूर्वेस कोलंबिया, उत्तरेस कॅरेबियन समुद्र तर
दक्षिणेस पॅसिफिक महासागर
अर्थव्यवस्था: सेवा, पर्यटन तसेच व्यापारावर आधारीत पनामा कालव्यामुळे पनामाला अंतरराष्ट्रीय महत्व
असून जागतिक दर्जाचे व्यापरकेंद्र म्हणून पनामा सिटी ओळखली जाते.
अमेरिकेतील पहिल्या डॉक्टरेट हेलन व्हाइट यांचा जन्म. 28 नोव्हेंबर 1853
अल्पपरिचय
हेलन मॅकगिल
व्हाइट या अमेरिकन प्राध्यापक तसेच अमेरिकेतील पहिल्या डॉक्टरेट होत्या.
जन्म
28 नोव्हेंबर 1853 प्रोव्हिडन्स,
ऱ्होड आयलँड, युएस
मृत्यू
28 ऑक्टोबर 1944 किटरी पॉइंट,
मेन, युएस
शिक्षण
स्वॉर्थमोअर कॉलेज, बीए
बोस्टन विद्यापीठ, एमए, पीएचडी
न्यूहॅम कॉलेज, केंब्रीज, ट्रायपॉस
कार्य
प्रसिध्द अमेरिकन प्राध्यापक व स्कॉलर
हेलन व्हाइट या अमेरिकेतील पहिल्या पीएचडीधारक
महिला होत्या. त्यांनी ग्रीकमध्ये पीएचडी केली. दि ग्रीक ड्रामा हा त्यांच्या पीएचडीचा विषय होता. आपल्या
शिक्षणानंतर हेलन व्हाइट यांनी काहीकाळा एका शाळेत प्राचार्य म्हणून काम पाहिले,
त्यानंतर त्यांची निवड हॉवर्ड कॉलेजिएट इन्स्टिट्यूट येथे झाली.
तेथे त्यांनी 1887 पर्यंत काम पाहिले. एव्हलिन वुमन कॉलेज तसेच ब्रुकलिन हायस्कूल येथेही त्यांनी काम केले.
विचारवंत व सत्यशोधक समाजचे संस्थापक महात्मा जोतिबा फुले
यांचे निधन. 28 नोव्हेंबर 1890
अल्पपरिचय
महात्मा जोतिबा फुले तथा जोतिराव गोविंदराव फुले हे महाराष्ट्रातील
थोर समाजुधारक, समाजसेवक व सत्यशोधक समाजाचे संस्थापक होते. बालविवाह तसेच अनेक अनिष्ट रूढी परंपरांना कठोर विरोध करून महात्मा फुले यांनी
स्त्रीशिक्षणास प्रोत्साहन देताना आपल्या पत्नी सावित्रीबाईंना शिक्षण देऊन मुलींची
प्रथम शाळा सुरू करण्यास प्रोत्साहन दिले. अनाथआश्रम,
महिलाश्रमाच्या माध्यमातून सामाजिक कार्य करताना फुले दांपत्याने स्त्री-पुरूष समानतेचा पुरस्कार केला. सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून
महात्मा फुले यांनी सामाजिक निर्बंध, धर्मिक परंपरा व अनिष्ट
रूढींना तिलांजली देताना स्त्री-पुरूषांना सामाजिक जबाबदारी व
कर्तव्याची जाणीव करून
दिली. महात्मा जोतिबा फुले यांच्याविषयी अधिक जाणून घेण्याकरता
येथे भेट द्या.
स्वातंत्र्यसेनानी सेनापती बापट यांचे निधन. 28 नोव्हेंबर 1967
अल्पपरिचय
पांडुरंग महादेव तथा सेनापती बापट हे प्रसिध्द भारतीय स्वातंत्र्यसेनानी
व मुळशी सत्याग्रहाचे प्रणेते होते. इंग्रजांविरूध्द विविध
अंदोलनात ते सक्रीय होते. मुळशी सत्याग्रहात शेतकऱ्यांसहीत समाजातील
विविध घटकांना घेऊन त्यांनी सत्याग्रह यशस्वी केला व धरणग्रस्त शेतकऱ्यांना इंग्रज
शासनाविरूध्द लढण्याचे बळ दिले. स्वातंत्र्योत्तर काळातही ते
अनेक अंदोलनात व सामाजिक कार्यात व्यस्त होते. सेनापती बापट यांच्याविषयी
अधिक माहितीसाठी येथे भेट द्या.
संदर्भ व आभार
संकल्पना, संकलन व संपादन
भालचंद्र माधव इनामदार
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
Please do not enter any spam link in comment.