नोव्हेंबर-28- 2020- शनिवार- आजचा- दिनविशेष

 

नोव्हेंबर-28- 2020- शनिवार- आजचा- दिनविशेष

नोव्हेंबर-28-1890 समाजसुधारक महात्मा जोतिबा फुले यांचे निधन. 

अल्पपरिचय

महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले तथा महात्मा जोतिबा फुले हे थोर समाजसुधारक होते. क्रांतीकारक विचारवंत असणाऱ्या महात्मा फुले यांनी समाजातील कष्टकरी वर्गावर होणाऱ्या शोषणाची तसेच सामाजिक दास्यत्वाची मीमांसा केली. समाजातील अनिष्ट रूढी,परंपरा,स्त्रीशिक्षण,स्त्री-पुरूष समानता,समान हक्क यासाठी कार्य केले.

जन्म

एप्रिल-11-1827 सातारा, ब्रिटीश भारत

मृत्यू

नोव्हेंबर-28-1890 पुणे,ब्रिटीश भारत

कार्य

  • महात्मा फुले हे समाजसुधारकाबरोबरच एक व्यापारी व सरकारी कंत्राटदार देखील होते. येरवडा कारागृह,कात्रज बोगदा याच्या बांधणीसाठी त्यांनी मजूर पुरविले होते.
  • महात्मा फुले हे तेव्हाच्या पुणे नगरपालिकेचे सदस्य देखील होते.
  • स्त्रीशिक्षण,स्त्रीयांचे हक्क,अधिकार तसेच स्त्रीयांचे दास्यत्व यासाठी कार्य
  • महात्मा फुले यांनी आपली पत्नी सावित्रीबाई फुले यांना शिक्षित करून स्त्रीयांसाठी प्रथम शाळा सुरू केली.
  • सत्यशोधक समाजाचे संस्थापक

साहित्य

  • तृतीय रत्न
  • ब्राह्मणांचे कसब
  • पोवाडा:छत्रपती शिवाजीराजे यांचा
  • पोवाडा: विद्याखात्यातील ब्राह्मण पंतोजी
  • मानव महामंडळ-अभंग
  • गुलामगिरी
  • शेतकऱ्याचा असूड
  • सत्सर अंक1 व अंक 2
  • इशारा
  • ग्रामजोश्या बद्दल जाहिर खबर
  • सत्यशोधक समाजोक्त मंगलाष्टक सर्व पूजा विधी
  • सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक
  • अखंडादी काव्यरचना
  • अस्पृश्यांची कैफियत

नोव्हेंबर-28-1967 मुळशी सत्याग्रहाचे नेते, स्वातंत्र्यसेनानी सेनापती बापट यांचे निधन.

अल्पपरिवय

पांडुरंग महादेव बापट तथा सेनापती बापट हे थोर भारतीय स्वातंत्र्यसेवक होते. ब्रिटीश शासनाविरूध्द लढण्यासाठी जनतेस प्रवृत्त करण्याचे काम  त्यांनी मुळशी सत्याग्रह करून केले.

जन्म

नोव्हेंबर-12-1880 पारनेर, ब्रिटीश भारत

मृत्यू

नोव्हेंबर-28-1967 मुंबई,महाराष्ट्र,भारत

शिक्षण

  • बी.ए. पुणे
  • मेकॅनिकल इंजिनियरिंगची पदवी एडिंबरो इंग्लंड येथून

कार्य

  • शिक्षक म्हणून पारनेर येथे कार्य करत असतानाच समाजकार्य
  • मुळशी पेटा पुणे येथील धरणग्रस्त शेतकऱ्यांसाठी सत्याग्रह केल्यामुळे तेथे त्यांना सेनापती बापट असे संबोधन मिळाले.
  • भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सहभाग व त्यासाठी तुरूंगवास
  • स्वातंत्र्योत्तर काळातही त्यांनी गोवा मुक्ती अंदोलन,संयुक्त महाराष्ट्र चळवळ अशा अंदोलन व चळवळींमध्ये सक्रीय सहभाग घेतला.
  • सेनापती बापट यांनी चित्रमयजगत,दैनिक मराठा,संदेश,लोकसंग्रह अशा मासिकांत व दैनिकांत लेखनाचे कार्य केले.

सन्मान

  • नागपूर येथील विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष

नोव्हेंबर-28-2000 सुखोई-30 विमाने देशाला अर्पण.

सुखोई30

सुखोई 30 ही रशियाच्या तांत्रिक सहकार्यातून ओझर येथील हिदूस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड मध्ये तयार करण्यात आलेली संपूर्ण स्वदेशी बनावटीची बहुउपायोगी लढाऊ विमाने आहेत. सुखोई30 चे वैशिष्ट्य म्हणजे ती अवाजापेक्षाही अधिक गतीने उडणारी 26 टन वजनाची व सर्व आण्विक व पारंपारिक शस्त्रास्त्रे वाहून नेणारी  अशी अत्याधुनिक विमाने आहेत. सध्या 272 विमाने भारतीय वायुसेनेकडे असून 12 अजून घेण्याचे योजीत आहे.2120 किलोमीटर दर तासाला वेग असणारे हे विमान जास्तीत जास्त 38800 किलो वजन वाहून नेऊ शकते. हवेतून हवेत तसेच हवेतून जमीनीवर मारा करण्याची क्षमता या विमानाची आहे.

आजचे पुरस्कार

जेष्ठ कवी नारायण सुर्वे यांना तेलगू महाकवी गुर्रम जोशुआ साहित्य पुरस्कार जाहीर. नोव्हेंबर-28-2000

 संदर्भ व आभार

https://www.google.com/

https://www.wikipedia.org/

http://epaper.sakal.com/

संकल्पना,संकलन व संपादन

भालचंद्र माधव इनामदार

 

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

13 ऑक्टोबर दिनविशेष-13 october dinvishesh-13-10-2020

ऑक्टोबर 14 2020-आजचा दिनविशेष- october 14 2020-aajcha dinvishesh

ऑक्टोबर 18 2020-October 18 2020