26 नोव्हेंबर 2021- 26 November

 26 ोव्हेंबर 2021- 26 November

नोबेल विजेते जर्मन शास्त्रज्ञ कार्ल झीगलर यांचा जन्म. 26 नोव्हेंबर 1898

अल्पपरिचय

कार्ल वाल्डेमर झीगलर हे पॉलिमर वरील संशोधनासाठी ग्लिओ नट्टा यांच्यासोबतीने 1963 साली नोबेल पारितोषिक मिळवणारे जर्मन रसायनशास्त्रज्ञ होते.

जन्म

26 नोव्हेंबर 1898 हेल्सा, जर्मन राज्य

मृत्यू

12 ऑगस्ट 1973 मुल्हेम, पश्चिम जर्मनी

शिक्षण

मारबर्ग विद्यापीठातून पीएचडी

कार्य

प्रसिध्द जर्मन रसायनशास्त्रज्ञ

पहिल्या महायुध्दात सैनिक म्हणून झीगलर यांनी आपला सहभाग विद्यापीठात शिकत असताना नोंदविला. पीएचडीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर थोड्या कालावधीसाठी त्यांनी मारबर्ग विद्यापीठात व फ्रँकफर्ट विद्यापीठात अध्यापन केले.

हिंडेलबर्ग विद्यापीठात रसायनशास्त्राचे प्राध्यापक म्हणून त्यांनी कार्य केले. कार्यकाळ-1926 ते 1936

एमएलयू विद्यापीठात प्राध्यापक व संचालक म्हणून तेथील रसायनशास्त्र विभागात त्यांनी काम केले. 1936 ते 1940 यादरम्यान ते शिकागो विद्यापीठातही प्राध्यापक म्हणून कार्य करीत होते.

नाझी जर्मनीच्या एसएस या संघटनेचे सक्रीय सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले.

प्रमुख शोध

  • झिगलर-नट्टा उत्प्रेरक
  • झिगलर प्रक्रिया
  • वोहल-झिगलर ब्रोमिनेशन
  • थॉर्प-झिगलर प्रतिक्रिया
  • ऑर्गेनोअल्युमिनियम रसायनशास्त्र
  • ऑर्गनोलिथियम अभिकर्मक

पुरस्कार

  • लिबिग मेडल
  • वॉर मेरीट क्रॉस सेकंड क्लास
  • वर्नर वॉन सिमेन्स रिंग
  • नोबेल पारितोषिक-1983

धवलक्रांतीचे जनक वर्गीस कुरियन यांचा जन्म. 26 नोव्हेंबर 1921

अल्पपरिचय

डॉ. वर्गीस कुरियन हे भारताला दूधउत्पादनात स्वयंपूर्ण बनविणारे व्यक्तीमत्व होते. डॉ. वर्गीस कुरियन यांनी ऑपरेशन फ्लड या संकल्पनेव्दारे दूध उत्पादन वाढविण्यास चालना दिली ज्यामुळे भारत दूध उत्पादनात स्वयंपूर्णतेकडे वाटचाल करू शकला. भारत सरकारव्दारे गुजरात मधील आनंद येथे प्रकल्पात सहभागी होऊन त्यांनी आनंद दूध सहकारी संघ अर्थात अमूल दूध याव्दारे दूध निर्मिती, वितरण यांमध्ये गुजरात तसेच भारतभरात मोठे कार्य केले, अमूल दूध हा दूधाचा ब्रँड विकसित करण्यात महत्वपूर्ण योगदान दिले. डॉ. वर्गीस कुरियन यांच्याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे भेट द्या.

भारतीय संविधान दिन. 26 नोव्हेंबर 1949

भारतीय संविधान दिन

डॉ. बाबासाहेब अंबेडकरांव्दारे मान्यतेसाठी संविधान समितीकडे आजच्याच दिवशी  26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय संविधान मांडण्यात आले जे एकमताने मंजूर करण्यात आले, तेव्हापासून 26 नोव्हेंबर हा दिवस भारतीय संविधान दिन म्हणून साजरा करण्यात येतो. भारताची संघीय, घटनात्मक, संसदीय प्रजासत्ताक शासनप्रणाली योग्य पध्दतीने राबविण्यात भारतीय संविधानाचा महत्वाचा वाटा आहे. भारताच्या सार्वभौम प्रजासत्ताकास संपूर्ण जगात मान्यता देण्यातही संविधानाचे महत्वाचे योगदान आहे. संपूर्ण हस्तलिखित राज्यघटना असणारा भारत जगातील पहिलाच खंडप्राय प्रजासत्ताक देश आहे. भारतीय संविधान दिनाविषयी अधिक माहितीसाठी येथे भेट द्या.

कवी यशवंत यांचे निधन. 26 नोव्हेंबर 1985

ल्पपरिचय

कवी यशवंत तथा यशवंत दिनकर पेंढारकर हे बडोदा संस्थानचे राजकवी, रविकिरण या कवींच्या मंडळातील एक कवी व महाराष्ट्रकवी होते. पाणपोई, यशोनिधी, यशोधन अशा अनेक कवितासंग्रहातून त्यांनी आपली कविता रसिकांपुढे सादर केली. कवी यशवंत यांच्याविषयी अधिक माहितीसाठी येथे भेट द्या.

ंदर्भ व आभार

https://www.google.com/

https://www.wikipedia.org/

 

 

संकल्पना,संकलन व संपादन

भालचंद्र माधव इनामदार

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

13 ऑक्टोबर दिनविशेष-13 october dinvishesh-13-10-2020

ऑक्टोबर 14 2020-आजचा दिनविशेष- october 14 2020-aajcha dinvishesh

ऑक्टोबर 18 2020-October 18 2020