26- नाेव्हेंबर - 2020 - संविधानदिन - दिनविशेष

 

26- नाेव्हेंबर - 2020 - संविधानदिन - दिनविशेष

26 नोव्हेंबर 1921 धवलक्रांतीचे जनक वर्गीस कुरीयन यंचा जन्म.


अल्पपरिचय

वर्गीस कुरीयन हे भारतीय दूध‍ क्रांतीचे पिता म्हणून ओळखले जातात. त्यांची ऑपरेशन फ्लड अर्थात दूधाचा महापूर ही संकल्पना भारताच्या दूध प्रकल्पासाठी क्रांतीकारी ठरली व भारताला दूध उत्पादनात स्वयंपूर्णतेकडे नेणारी ठरली. आज भारताला दूध उत्पादनात जगातील अग्र देशांच्या यादीत स्थान मिळवून देण्याचे कार्य वर्गीस कुरीयन यांनी केले. त्यांना मिल्कमॅन म्हणूनही ओळखले जाते.

जन्म

26 नोव्हेंबर 1921 कालीकत,मद्रास प्रांत ब्रिटीश भारत, आता कोझीको,केरळ,भारत

मृ‍त्यू

09 सप्टेंबर 2012 नाडीयाद,गुजरात,भारत

शिक्षण

  • शालेय शिक्षण- डायमंड ज्युबिली हायर सेकंडरी स्कूल, कोइमतूर,आताचे इरोड तमीळनाडू
  • महाविद्यालयीन शिक्षण-लॉयला कॉलेज,मद्रास आताचे चेन्नई मधून बी.एस्सी. फिजिक्स
  • कॉलेज ऑफ इंजिनियरिंग मद्रास विद्यापीठातून मेकॅनिकल इंजिनियर
  • नॅशनल डेअरी रिसर्च इन्स्टिट्यूट बेंगलोर येथे संशोधन कार्य
  • मिशिगन स्टेट विद्यापीठामधून मेकॅनिकल इंजिनियरिंग मध्ये मास्टर्स
कार्य

  • सुरवातीला टाटा स्टील मध्ये काम
  • गुजरातच्या आनंद मध्ये भारतीय सरकारव्दारे प्रकल्पात सहभागी
  • खेडा जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची स्थापना त्याव्दारे दूध संकलन व वितरणाचे कार्य
  • आनंद दूध सहकारी संघ अर्थात अमूलची स्थापना व त्याव्दारे पूर्ण गुजरात तसेच नंतर देशभर दूध वितरणाचे कार्य
  • अमूल डेअरीची स्थापना करून कुरीयन यांनी दूधक्रांती करत इतिहास घडविला व सहकारी तत्वावर दूधसंघाचा प्रयोग यशस्वी करून भारताला दूध उत्पादन व वितरण तसेच निर्यातीत स्वयंपूर्ण केले.
  • चेअरमन अमूल डेअरी गुजरात
  • चेअरमन नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड
  • इन्स्टिट्यूट ऑफ रूरल मॅनेजमेंट आनंद गुजरात

पुरस्कार

  • रेमन मॅगसेसे ॲवॉर्ड 1964
  • पद्मश्री 1965
  • पद्मभूषण 1966
  • वर्ल्ड फूड प्राइझ 1989
  • ऑर्डर ऑफ ॲग्रीकल्चरल मेरिट1997
  • पद्मविभूषण 1999

26 नोव्हेंबर 1949 डॉ. अंबेडकरांनी सादर केलेल्या भारतीय संविधानास मान्यता.

भारतीय संविधान

    भारतीय संविधान आजच्याच दिवशी 26 नोव्हेंबर 1949 रोजी डॉ. बाबासाहेब अंबेडकर यांच्याव्दारे मान्यतेसाठी सादर करण्यात आले व भारतीय संविधानास मान्यता दे‌ण्यात आली. दिनांक 26 जानेवारी 1950 पासून भारतीय संविधानाची अंमलबजावणी संपूर्ण देशात करण्यात आली. भारताची शासनप्रणली संघीय,संसदीय,घटनात्मक प्रजासत्ताक अशी आहे. भारतीय शासनप्रणालीच्या शाखा तीन असून अनुक्रमे कार्यकारी,विधिमंडळ व न्यायपालिका अशा आहेत. कायद्याच्या वैधानिक संस्था दोन असून राज्यसभा व लोकसभा अशा आहेत. कार्यकारी मध्ये पंतप्रधान त्यांचे मंत्रीमंडळ असे आहे.भारतीय न्यायपालिका ही स्वतंत्र असून जिल्हा,उच्च न्यायालय राज्याच्या पातळीवर व सर्वोच्च न्यायालय हे सर्वोच्च पातळी अशी आहे.  भारतीय संविधानाच्या घटनादुरूस्त्या या 104 झालेल्या असून शेवटची 25 जानेवारी 2020 रोजी करण्यात आली. भारतीय संविधानावर संविधानसभेच्या 284 सदस्यांच्या स्वाक्ष्ररी आहेत. भारत सरकारचा कायदा 1935 व भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 1947 नुसार याला मान्यता देण्यात आली आहे.

    भारताचे संविधान हे अनेक देशांच्या उदारमतवादी राज्यघटनांचा व ब्रिटीश वसाहतवादी संविधानाच्या पायाभूत तत्वांशी मेळ घालून तयार करण्यात आले आहे. ब्रिटीश कालीन भारतीय राज्यव्यवस्थेत असलेले व्हाइसरॉय हे पद स्वतंत्र भारताच्या संविधानाप्रमाणे राष्ट्रपतींडे सोपवण्यात आले आहे. व्हाइसरॉयचे प्रशासकीय अधिकार पंतप्रधानांकडे देण्यात आले आहेत. घटनेच्या 74 व्या कलमानुसार राष्ट्रपतींचे अधिकार मर्यादित आहेत व मंत्रीमंडळास सल्ला देण्याचे काम ते करू शकतात. राष्ट्रपती ते तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख असून भारताचे ते सर्वोच्च पद आहे. हा दिवस भारतात संविधान दिन म्हणून साजरा करण्यात येतो.

 26 नोव्हेंबर 1985 महाराष्ट् कवी यशवंत‍ दिनकर पेंढारकर यांचे निधन.

अल्पपरिचय

यशवंत दिनकर पेंढारकर तथा कवी यशवंत  हे रविकिरण मंडळातील एक कवी, बडोदा संस्थानाचे राजकवी होते. महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर त्यांना महाराष्ट्र कवी म्हणून गौरविण्यात आले.

जन्म

09 मार्च 1899 चाफळ,सातारा

मृत्यू

26 नोव्हेंबर 1985 पुणे

शिक्षण

सिटी हायस्कूल,सांगली

कार्य

मराठी कवितेत अपूर्व असे कार्य

रविकिरण मंडळातील सप्तकवींव्दारे मराठी कवितेत मोलाची भर

साहित्य

  • घायाळ-अनुवादीत कादंबरी
  • छत्रपती शिवराय - खंडकाव्य
  • जयमंगला-कवितासंग्रह
  • मित्रप्रेम रहस्य-कवितासंग्रह
  • तुटलेला तारा-कवितासंग्रह
  • पाणपोई-कवितासंग्रह
  • प्रापंचिक पत्रे
  • बंदिशाळा-कवितासंग्रह
  • यशवंती-कवितासंग्रह
  • यशोगंध-कवितासंग्रह
  • यशोनिधी-कविातासंग्रह
  • यशोधन-कवितासंग्रह
  • वाकळ-कवितासंग्रह

सन्मान

  • मुंबईतील 1950 च्या  33 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष

26 नोव्हेंबर 2008 मुंबईवर दहशतवादी हल्ला.

मुंबई दहशतवादी हल्ला

मुंबईवर दहा दहशतवाद्यांनी हल्ला केला या दहशतवादी हल्ल्यात सुमारे 197 बळी गेले तसेच 800 पेक्षा जास्त लोक जखमी झाले. छत्रपती शिवाजी टर्मिनस,लियोपोल्ड कॅफे,हॉटेल ताजमहाल,हॉटेल ओबेरॉय ट्रायडंट,मादाम कामा हॉस्पीटल,नरीमन हाऊस,मेट्रो सिनेमा,माझ्रगाव डॉक,विलेपार्ले या ठिकाणी गोळीबार तसेच बॉम्बस्फोट करण्यात आले. या हल्ल्यातील नऊ दहशतवाद्यांना सुरक्षा  दले व पोलिसांकरवी ठार करण्यात आले तर  तुकाराम औंबाळे यांच्या शौर्यामुळे अजमल कसाब या दहशतवाद्याला जिवंत पकडण्यात सुरक्षा यंत्रणांना यश आले. दि.26 नोव्हेंबर ते 28 नोव्हेंबर या तीन दिवसांत मुंबईवर महाभयंकर असा हा हल्ला झाला, यामुळे मुंबई तसेच देशाचे खूप मोठे नुकसान झाले. यातीलच एका चकमकीत विजय साळसकर,हेमंत करकरे व अशोक कामटे या मुंबई पोलिस दलातील तीन वरिष्ट अधिकाऱ्यांना वीरमरण आले तर अजमल कसाबला पकडताना तुकाराम औंबाळे यांना हौतात्म्य आले. आज या घटनेला बारा वर्ष झाली. हा भारताच्या सार्वभौमत्वावर घातलेला हल्ला होता.

शहीद झालेले अधिकारी

  • हेमंत करकरे- मुंबई एटीएस अर्थात एन्टी टेरिरिस्ट स्कॉडचे प्रमुख
  • अशोक कामटे-अतरिक्त पोलीस आयुक्त
  • विजय साळसकर - पोलिस नि‍रिक्षक
  • तुकाराम ओंबाळे-सहाय्यक उपनिरिक्षक

आजचे पुरस्कार

  • 26-नोव्हेंबर-1997 ’भारतरत्‍न’ हा सर्वोच्‍च नागरी सन्मान अवकाश आणि संरक्षण क्षेत्रात भारताला आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळवून देणारे शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ आणि पंतप्रधानांचे विज्ञानविषयक सल्लागार डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना जाहीर
  • 26-नोव्हेंबर-1999 इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) तर्फे जैववैद्यकीय संशोधनासाठी देण्यात येणार्या पुरस्कारासाठी विकीरण जीवशास्त्र (Radiation Biology) या विषयात महत्त्वपूर्ण संशोधन केल्याबद्दल डॉ. रावसाहेब काळे यांची निवड करण्यात आली.

संदर्भ व आभार

https://www.google.com/

https://www.wikipedia.org/

 

संकल्पना,संकलन व संपादन

भालचंद्र माधव इनामदार

 

 

 

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

13 ऑक्टोबर दिनविशेष-13 october dinvishesh-13-10-2020

ऑक्टोबर 14 2020-आजचा दिनविशेष- october 14 2020-aajcha dinvishesh

ऑक्टोबर 18 2020-October 18 2020