25 नोव्हेंबर 2021- 25 November

 25 ोव्हेंबर 2021- 25 November

प्रसिध्द नाटककार कृष्णाजी खाडिलकर यांचा जन्म. 25 नोव्हेंबर 1872

अल्पपरिचय

    कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर हे प्रसिध्द नाटककार, पत्रकार व केसरी वृत्तपत्राचे संपादक तसेच दैनिक नवाकाळचे संस्थापक संपादक होते. संगीत मानापमान, संगीत स्वयंवर, संगीत विद्याहरण या सुप्रसिध्द संगीत नाटक लेखनासोबतच त्यांचे अध्यात्मिक व इतर लेखनही प्रसिध्द आहे. कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांच्याविषयी अधिक माहितीसाठी येथे भेट द्या.

अध्यात्मिक गुरू साधू वासवानी यांचा जन्म. 25 नोव्हेंबर 1879

अल्पपरिचय

    साधू वासवानी तथा थांवरचंद वासवानी हे साधू वासवानी मिशनचे प्रमुख व प्रसिध्द अध्यात्मिक गुरू व शिक्षणतज्ञ होते. साधू वासवानी मिशनच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक, शैक्षणिक व अध्यात्मिक क्षेत्रात मोलाचे कार्य केले आहे. साधू वासवानी यांच्याविषयी अधिक माहिती जाणून घेण्याकरता  येथे भेट द्या.

संत दासगणू महाराज यांचे निधन. 25 नोव्हेंबर 1966

अल्पपरिचय

    संत दासगणू महाराज तथा श्री. गणेश सहस्त्रबुध्दे हे महाराष्ट्रातील शिर्डींचे थोर संत साईबाबा यांचे परमभक्त व अनुयायी होते. श्री. साईबाबांचे चरित्रलेखन त्यांनी केले आहे. संतसाहित्यात लेखनकार्य केल्यामुळे त्यांना अधुनिक महाराष्ट्राचे महिपती असे संबोधले जाते. संत दासगणू महाराज यांच्याविषयी अधिक माहितीकरता येथे भेट द्या.

सुरिनामला नेदरलँड्सकडून स्वातंत्र्य. 25 नोव्हेंबर 1975

सुरिनाम

सुरिनाम हा दक्षिण अमेरिकेतील एक देश असून या देशाला नेदरलँड्सकडून 25 नोव्हेंबर 1975 रोजी स्वातंत्र्य मिळाले. रिपब्लिक ऑफ सुरिनाम या अधिकृत नावाने ओळखला जाणारा हा देश 16 व्या शतकापासून डच कॉलनी म्हणून ओळखला जात होता जरी सुरिनामला संविधानिक देश म्हणून 15 डिसेंबर 1954 ला नेदरलँडने मान्यता दिली होती तरी पूर्णपणे स्वातंत्र्य 25 नोव्हेंबर 1975 ला मिळाले.

देश: रिपब्लिक ऑफ सुरिनाम

राजधानी: पॅरामरिबो

राष्ट्रभाषा: डच तसेच बोलीभाषास्रानान टोंगो

चलन: सुरिनामीज डॉलर

सीमा: उत्तरेस अटलांटिक महासागर, पूर्वेस फ्रेंच गयाना, पश्चिमेस गुयाना, दक्षिणेस ब्राझील

अर्थव्यवस्था: बॉक्साइट खाण उद्योग, पर्यटन, कृषी, सोने व इतर नैसर्गिक खाणी तसेच मासेमारी वर आधारीत

माजी संरक्षणमंत्री व माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे निधन. 25 नोव्हेंबर 1984

अल्पपरिचय

    यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री, भारताचे संरक्षणमंत्री, गृहमंत्री, परराष्ट्रमंत्री व पाचवे उपपंतप्रधान होते. महाराष्ट्र राज्याच्या जडणघडणीत यशवंतराव चव्हाण यांचा मोलाचा वाटा आहे. कृष्णाकाठ हे त्यांचे पुस्तक खूपच प्रसिध्द आहे. यशवंतराव चव्हाण यांच्याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे भेट द्या.

संदर्भ व आभार

https://www.google.com/

https://www.wikipedia.org/

http://www.dattamaharaj.com/

https://www.sadhuvaswani.org/sadhu-vaswani

संकल्पना, संकलन व संपादन

भालचंद्र माधव इनामदार

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

13 ऑक्टोबर दिनविशेष-13 october dinvishesh-13-10-2020

ऑक्टोबर 14 2020-आजचा दिनविशेष- october 14 2020-aajcha dinvishesh

ऑक्टोबर 18 2020-October 18 2020