25 - नाेव्हेंबर - 2020 आजचे - दिनविशेष

 

25 - नाेव्हेंबर - 2020 आजचे - दिनविशेष

इंटरनॅशनल डे फॉर इलिमिनेशन ऑफ व्हायोलन्स अगेन्स्ट वुमन 25-11-2020

इंटरनॅशनल डे फॉर इलिमिनेशन ऑफ व्हायोलन्स अगेन्स्ट वुमन म्हणजेच जागतिक महिला अत्याचार निर्मुलन दिन हा दरवर्षी 25 नोव्हेंबरला साजरा केला जातो. महिलांवरील होणारे अत्याचार त्यांचे होणारे शोषण,पिळवणूक व हिंसा यामुळे जागतिक समाजाची होणारी अधोगतीकडे वाटचाल थांबवण्यासाठी व महिलांना सर्वतऱ्हेची सुरक्षा मिळावी या उद्देशाने या दिवसाची सुरवात करण्यात आली. 2020 ची या दिवसाची थीम आहे ऑरेंज दि वर्ल्ड: फंड,रिस्पाँड,प्रिव्हेन्ट,कलेक्ट अर्थात महिलांवरील अत्याचार थांबवण्यासाठी लागणाऱ्या निधीची कमतरता भरून काढणे,महिला अत्याचारांसंबंधी काही तक्रार आल्यास त्यावर तत्काळ कार्यवाही करणे, अत्याचाराची तीव्रता कमी करण्याचा प्रयत्न करणे,केंद्रीभूत माहिती मिळवणे व ती योग्य त्या यंत्रणांपर्यंत पोचवणे असा या वर्षीचा उद्देश आहे.

ख्यातनाम पत्रकार,केसरीचे संपादक,नाटककार कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांचा जन्म.25-11-1872

अल्पपरिचय

कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर हे प्रसिध्द पत्रकार तसेच नाटककार होते. केसरी या लोकमान्य टिळकांनी चालू केलेल्या वृत्तपत्राचे ते संपादक होते. दैनिक नवाकाळचे ते संस्थापक होते.

जन्म

25 नाेव्हेंबर 1872 सांगली,सांगली संस्थान,ब्रिटीश भारत

मृत्यू

26 ऑगस्ट 1948 

शिक्षण

बी.ए. तत्वज्ञान डेक्कन महाविद्यालय, एल.एल.बी.

कार्य

  • सांगली हायस्कूल येथे  शिक्षक
  • विविधज्ञान विस्तार,केसरी  अशा पत्रिकांमध्ये लेखन प्रसिध्द
  • विविध नाटकांचे लेखन
  • केसरी दैनिकाचे संपादक
  • दैनिक लोकमान्यचे संपादक
  • दैनिक नवाकाळचे संस्थापक

प्रसिध्‍द नाटके-लेखन

  • कांचनगडची मोहना
  • संगीत कीचकवध
  • संगीत त्रिदंडी संन्यास
  • संगीत द्रौपदी
  • संगीत प्रेमध्वज
  • संगीत बायकांचे बंड
  • संगीत भाऊबंदकी
  • संगीत मानापमान
  • संगीत मेनका
  • संगीत विद्याहरण
  • संगीत सत्त्वपरीक्षा
  • संगीत सवतीमत्सर
  • सवाई माधवराव यांचा मृत्यू
  • संगीत सावित्री
  • संगीत स्वयंवर 

अध्यात्मपर लेखन

  • ऐतरेय आणि ईशावास्योपनिषद
  • ॐकाराची उपासना
  • तैत्तिरीयोपनिषद
  • त्रिसूपर्णाची शिकवणूक
  • याज्ञवल्क्यमैत्रेयीसंवाद
  • रुद्र, संध्यावंदन व पुरुषसूक्त

इतर साहित्य

  • ब्राह्मण आणि त्यांची विद्या या महादेव गोळे यांच्या ग्रंथाचे परिक्षण
  • राष्ट्रीय महोत्सव हा लेख
  • गनिमी काव्याचे युध्द ही लेखमाला
  • बाल्कन युध्दावरील लेखमाला
  • चित्रमयजगतमध्ये पहिल्या महायुध्दावरील लेखमाला

सन्मान

  • नागपूर येथील 18 व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष
  • गंधर्व महाविद्यालयाच्या संगीत परिषदेचे अध्यक्ष

अध्यात्मिक गुरू तसेच शिक्षणतज्ञ साधू वासवानी यांचा जन्म. 25-11-1879

अल्पपरिचय

साधू वासवानी तथा थांवरदास लीलाराम वासवानी हे अध्यात्मिक गुरू व शिक्षणतज्ञ होते. साधू वासवानी मिशनची त्यांनी स्थापना केली.

जन्म

25-11-1879 हैदराबाद, हैदराबाद संस्थान, ब्रिटीश भारत

मृत्यू

16-01-1966 पुणे,महाराष्ट्र

शिक्षण

  • बी.ए. बॉम्बे विद्यापीठ
  • एम.ए. बॉम्बे विद्यापीठ
  • डी.जे. सिंध कॉलेज कराची येथे अभिभावक

कार्य

  • युनियन अकॅडमी येथे शिक्षक
  • भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात सहभाग
  • मेट्रोपॉलिटन कॉलेज कलकत्ता येथे इतिहास व तत्वज्ञान विषयांचे प्राध्यापक
  • श्री प्रमोथोलाल सेन तथा नलूदा या आपल्या गुरूंकडून दीक्षा व अध्यात्मिक शिक्षण
  • र्लिन जर्मनी येथे वर्ल्ड काँग्रेस ऑफ रिलिजन मध्ये आपल्या गुरूंसोबत सहभाग
  • साधू वासवानी मिशनची स्थापना

पुस्तके

  • इंडिया अरायजन अवेक
  • यंग इंडिया!
  • इंडियाज ॲडव्हेंचर
  • इंडिया इन चेन्स
  • दि सिक्रेट ऑफ एशिया
  • माय मदरलँड
  • बिल्डर्स ऑफ टुमारो
  • अपोस्टल्स ऑफ फ्रिडम
दासगणू महाराज यांचे निधन. 25-11-1966

अल्पपरिचय

गणेश दत्तात्रय सहस्त्रबुध्दे तथा दासगणू महाराज हे महाराष्ट्रातील संत तसेच साईबाबांचे परमभक्त होते. संतसाहित्यात चरित्र लेखन केल्यामुळे त्यांना अधुनिक महाराष्ट्राचे महिपती असे म्हणतात.

जन्म

06-01-1868 अकोळनेर, जि. अहमदनगर ब्रिटीश भारत

मृत्यू-महानिर्वाण

25-11-1962 पंढरपूर,महाराष्ट्र

कार्य

  • 1893 ते 1904 पर्यंत पोलिसखात्यात नोकरी
  • कीर्तन,प्रवचनाव्दारे लोकप्रबोधन
  • संतसाहित्यात चरित्रलेखन व अनेक ग्रंथ तसेच आरती,स्त्रोत्रे यांचे लेखन
  • साईबाबांचे कार्याचा प्रचार प्रसार केला.
  • साईबाबा संस्थानाचे ते पहिले अध्यक्ष होते. 1922 ते 1945

साहित्य

  • श्री आऊबाई चरित्र
  • ईशावास्य भावार्थ बोधिनी
  • श्री गजानन विजय.
  • गोदामाहात्म्य .
  • भक्त लीलामृत
  • भक्तिसारामृत,
  • शंकराचार्य चरित्र
  • शिर्डी माझे पंढरपुर (साईबाबांची आरती)
  • संत कथामृत
  • साई स्तवनमंजिरी
  • अमृतानुभव भावार्थमंजिरी
  • उपदेशपर पद्ये
  • उद्धवागमन
  • छात्रबोध
  • हितबोध
  • पासष्टीभावार्थदीपिका
  • पोवाडे
  • भक्तिरसायन
  • भजनावली
  • श्री गुरूचरित्र साराम्रूत
  • श्रीगौडपादकारिका
  • श्रीईशावास्य भावार्थ बोधिनी व मंत्रार्थ
  • श्रीनागझरी महात्म्य
  • श्रीनारद-भक्तिसूत्र-बोधिनी
  •  श्रीभक्तिलीलामृत (अर्वाचीन)
  • श्रीभक्तिसारामृत
  • श्रीसंतकथामृत
  • श्रीमांगीशमाहात्म्य
  • श्रीविष्णुसहस्रनामबोधिनी
  • श्रीमध्वविजय
  • श्रीशंडिल्य भक्तिसूत्र भावदीपिका
  • श्रीशनिप्रताप
  • सुबोध लघुकथा

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे निधन. 25-11-1984

अल्पपरिचय

नवमहाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव बळवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री,भारताचे पाचवे उपपंतप्रधान,भारताचे संरक्षणमंत्री होते. 

जन्म

12-03-1913 देवराष्ट्रे जि. सांगली

मृत्यू

25-11-1984 दिल्ली

कार्य

  • दैभाषिक मुंबई राज्याचे मुख्यमंत्री कार्यकाळ 1956 ते 1960
  • महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री 01-05-1960 ते 19-11-1962
  • भारताचे संरक्षणमंत्री 1962 ते 1966
  • भारताचे परराष्ट्रमंत्री 1974 ते 1977
  • भारताचे गृहमंत्री 1966 ते 1970 व 1979 ते 1980
  • भारताचे पाचवे उपपंतप्रधान 1979 ते 1980

साहित्य

  • आपले नवे मुंबई राज्य
  • ॠणानुबंध
  • कृष्णाकाठ
  • भूमिका
  • महाराष्ट्र राज्य निर्मिती विधेयक
  • विदेश दर्शन
  • सह्याद्रीचे वारे
  • युगांतर

आजचे पुरस्कार

  • कलकत्ता येथील ’इंडियन सायन्स काँग्रेस असोसिएशन’तर्फे देण्यात येणारा ’राज क्रिस्टो दत्त स्मृती पुरस्कार’ राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे संचालक डॉ. रघुनाथ माशेलकर यांना जाहीर. 25-11-1994
  • ’इंदिरा गांधी शांतता पुरस्कार’ ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आमटे यांना जाहीर.25-11-1999
  • मध्यप्रदेश सरकारचा ’तानसेन सन्मान’ सतारवादक उस्ताद अब्दुल हलीम जाफर खाँ यांना जाहीर.25-11-2000

संदर्भ व आभार

https://www.google.com/

https://www.wikipedia.org/

http://www.dattamaharaj.com/

https://www.sadhuvaswani.org/sadhu-vaswani

https://www.un.org/

संकल्पना,संकलन व संपादन

भालचंद्र माधव इनामदार

 

 

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

13 ऑक्टोबर दिनविशेष-13 october dinvishesh-13-10-2020

ऑक्टोबर 14 2020-आजचा दिनविशेष- october 14 2020-aajcha dinvishesh

ऑक्टोबर 18 2020-October 18 2020