24 नोव्हेंबर 2021- 24 November
24 नोव्हेंबर 2021- 24 November

Maxim Gun
मॅक्सिम मशीनगनचे
शोधक सर हिराम मॅक्सिम यांचे निधन. 24 नोव्हेंबर 1916
अल्पपरिचय
सर हिराम स्टीव्हन्स मॅक्झिम हे अमेरिकन-ब्रिटीश संशोधक होते. पहिली स्वयंचलित मशिनगन दि मॅक्सिम
गन च्या निर्मितीसाठी ते ओळखले जातात.
जन्म
05 फेब्रुवारी 1840 सँगरविले,
मेन, युएस
मृत्यू
24 नोव्हेंबर 1916 लंडन, युनायटेड किंग्डम
कार्य
प्रसिध्द अमेरिकन-ब्रिटीश संशोधक
हिराम मॅक्सिम यांनी वयाच्या 14 व्या वर्षापासूनच काकांच्या वर्कशॉपमध्ये काम करण्यास सुरूवात केली व उपकरणे
बनविण्यास सुरूवात केली.
न्यूयॉर्कमधील न्यूयॉर्क सिटी बिल्डिंग अर्थात इक्वीटेबल
लाईफ बिल्डिंग येथे मॅक्सिम यांनी पहिल्यांदा तयार केलेले इलेक्ट्रीक दिवे बसविले. थॉमस एडिसन यांच्याबरोबर लाइट बल्ब अर्थात विजेच्या दिव्याच्या शोधाच्या पेटंटसाठी
बऱ्याच काळ संघर्ष चालला जो नंतर एडिसन यांनी जिंकला.
सन 1882 ते 1885 दरम्यान
त्यांनी त्यांचा सर्वात प्रसिध्द अविष्कार मॅक्सिम गन या मशीनगनची निर्मिती केली जी
पहिल्या महायुध्दातील प्रमुख शस्त्रांस्त्रांपैकी एक होती.
एडवर्ड विकर्स यांच्या सहकार्याने मॅक्सिम यांनी एक आर्म्स
कंपनी चालू केली जी नंतर विकर्स कॉर्पोरेशनने विकत घेतली.
ग्राहम-व्हाइट, बेलरियॉट व मॅक्सिम कंपनीचीही मॅक्सिम यांनी
सुरू केली ज्याचा मुख्य उद्देश मोठ्या प्रमाणावर विमानहल्ला करणारी विमाने निर्माण
करणे हा होता.
मॅक्सिम यांनी लावलेले शोध
- मॅक्सिम गन
- लाइट बल्ब- पेटंट एडिसन यांनी जिंकले.
- कर्लींग आयर्न
- फायर स्प्रिंकलर
- फ्लाइंग मशिन्स
- कॅप्टिव्ह फ्लाइंग मशिन्स
- इलेक्ट्रीक लॅम्प
प्रसिध्द पुस्तके
- आर्टिफिशियल ॲन्ड नॅचरल फ्लाईट
- ए न्यू सिस्टिम ऑफ प्रिव्हेंन्टींग कोलिजन्स ॲट सी
- माय लाईफ
पुरस्कार
नाइट बॅचलर
प्रसिध्द इंग्लीश अष्टपैलू क्रिकेटपटू सर इयान बॉथम यांचा
जन्म.
24 नोव्हेंबर 1955
अल्पपरिचय
सर इयान बॉथम हे इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू आहेत. आक्रमक फलंदाजी, आप्रतिम वेगवान गोलंदाजी व चपळ-चाणाक्ष क्षेत्ररक्षणासाठी ते ओळखले जायचे. इंग्लंडचे
1976 ते 1992 पर्यंत तब्बल सोळावर्षे त्यांनी अंतरराष्ट्रीय
स्तरावर एकदिवसीय व कसोटी क्रिकेटमध्ये
प्रतिनिधित्व केले. सर्वोकृष्ट अष्टपैलू
क्रिकेटपटूंमध्ये गणना होणाऱ्या बॉथम यांनी क्रिकेटव्यतरिक्त क्रिकेट समालोचनातही आपली
कारर्किर्द घडविली आहे. इयान बॉथम यांच्याविषयी अधिक माहितीकरता
येथे भेट द्या.
लेखिका व कार्यकर्त्या अरूंधती रॉय यांचा जन्म. 24 नोव्हेंबर 1961
अल्पपरिचय
अरूंधती रॉय या प्रसिध्द भारतीय लेखिका व सामाजिक तसेच मानवधिकार
कार्यकर्त्या आहेत. आपल्या इंग्लीश लेखनासाठी प्रसिध्द असणाऱ्या
अरूंधती रॉय त्यांच्या दि गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज या कादंबरीकरता ओळखल्या जातात.
1997 साली या कादंबरीला प्रतिष्ठेचा बुकर पुरस्कार मिळाला. अरूंधती रॉय यांच्याविषयी अधिक माहितीकरता येथे भेट द्या.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मारोतराव कन्नमवार यांचे
निधन.
24 नोव्हेंबर 1963
अल्पपरिचय
मारोतराव सांबशिव कन्नमवार हे महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री
होते.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतानाच भारताचे चीनशी 1962 साली युध्द झाले यादरम्यान अत्यंत संयमाने व धैर्याने परिस्थिती हाताळत त्यांनी
महाराष्ट्रीय जनतेत राष्ट्रीयत्वाची भावना जागृत करून राष्ट्रीय संरक्षण निधी संकलन
केले व अनेक महत्वाचे निर्णय घेतले. आपल्या कार्यालयात कर्तव्यावर
असतानाच त्यांचे 24 नोव्हेंबर 1963 रोजी
आकस्मिक निधन झाले. मारोतराव कन्नमवार यांच्याविषयी अधिक माहितीकरता
येथे भेट द्या.
संदर्भ व आभार
https://www.marathisrushti.com/
https://www.cricbuzz.com/profiles/5321/sir-ian-botham
Image Courtesy: https://commons.wikimedia.org/wiki/File:Maxim_maching_gun_IMG_6372-6379.jpg
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
Please do not enter any spam link in comment.