आज 24 नोव्हेंबर 2020 आजचादिनविशेष

 आज 24 नोव्हेंबर 2020 आजचादिनविशेष

इंग्लीश क्रिकेटपटू सर इयान बॉथम यांचा जन्म. 24-11-1955

अल्पपरिचय

इयान टेरेन्स बॉथम हे इंग्लीश अष्टपैलू क्रिकेटपटू आहेत. आपल्या आक्रमक फलंदाजी,उपयुक्त वेगवान गोलंदाजी तसेच चपळ क्षेत्ररक्षणासाठी बॉथम ओळखले जातात.

जन्म

24-11-1955 हेसवॉल,इंग्लंड

कार्य

  • इंग्लंडसाठी अंतरराष्ट्रीय क्रिकेट-1976 ते 1992
  • सॉमरसेट या कौंटीचे बॉथम यांनी बराचकाळ प्रतिनिधित्व केले, त्याचबरोबर वॉर्स्टशायर व डरहॅमचेही त्यांनी काहीकाळ प्रतिनिधित्व केले.
  • क्रिकेटव्यतरिक्त ते फुटबॉलही खेळले व स्काय स्पोर्ट्स या वाहिनीसाठी त्यांनी बराचकाळ क्रिकेट समालोचनही केले आहे.

क्रिकेट कारर्किर्द

    इयान बॉथम यांची क्रिकेट कारर्किर्द सर्वोत्तम अष्टपैलू म्हणून कायमच क्रिकेट जाणकरांच्या चर्चेचा विषय राहिली आहे. बॉथम यांनी 102 कसोटीत इंग्लंडचे प्रतिनिधित्व करताना 5200 धावा तसेच 383 बळी घेतले आहेत ज्यात 14 शतके व 27 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याचबरोबर 27 वेळा पाच बळी मिळवण्याची कामगिरी केली असून चारवेळा दहा बळी मिळवले आहेत. बॉथम यांची लक्षात रहाणारी कामगिरी म्हणजे भारताविरूध्द त्यांनी ज्युबिली कसोटीत मिळवलेले दहा बळी व केलेले शतक ही होय. कसोटीबरोबरच त्यांनी एकदिवसीय मध्येही इंग्लंडचे प्रतिनिधित्व करताना 116 एकदिवसीय सामने खेळले. एकदिवसीय सामन्यात 2113 धावा व 145 बळी मिळवले आहेत, ज्यामध्ये 9 अर्धशतकांचा समावेश आहे.

प्रसिध्द लेखिका अरूंधती रॉय यांचा जन्म.24-11-1961 

अल्पपरिचय

    अरूंधती रॉय तथा सुझाना अरूंधती रॉय या प्रसिध्द भारतीय लेखिका व मानवाधिकार कार्यकर्त्या आहेत. त्यांच्या दि गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज या कादंबरीला 1997 साली बुकर पुरस्कार मिळाला. भारतीय राजकारण,समाजकारणावरील त्यांची मते बऱ्याचवेळा वादग्रस्त् ठरली असूनही त्या निडर होऊन आपली मते मांडतात. व मानवाधिकरांचे समर्थन करतात.

जन्म

24-11-1961 शिलाँग, आसाम, सध्या मेघालय भारत

शिक्षण

स्कूल ऑफ प्लॅनिंग अँड अर्किटेक्चर दिल्ली मधून अर्किटेक्चर मध्ये पदवी

कार्य

  • नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अर्बन अफेयर्स मध्ये काहीकाळ काम.
  • मॅसी साहिब,ॲनी,इलेक्ट्रिक मून या चित्रपटांसाठी लेखन कार्य
  • दि गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज ही बुकर पुरस्कारप्राप्त कादंबरी लिहून अरूंधती रॉय या प्रसिध्द झाल्या.
  • काश्मीर प्रश्न,सरदार सरोवर प्रकल्प,भारताचा अणूकार्य्रक्रम,अमेरिकेची विदेशी धोरणे व अफगाणिस्तान युध्द ,भारतीय संसदेवरील हल्ला,मुंबई दहशतवादी हल्ला इ. विषयांवरील त्यांचे अनेक निबंध,वक्तव्ये  गाजली.

साहित्य

  • दि गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज
  • दि मिनिस्ट्री ऑफ ॲटमोस्ट हॅपीनेस
  • दि एंड ऑफ इमॅजिनेशन
  • दि अलजेब्रा ऑफ इनफॅनाइट जस्टिस
  • पॉवर पॉलिटिक्स
  • दि शेप ऑफ द बीस्ट कॉनर्व्हसेशन विथ अरूंधती रॉय
  • काश्मीर- दि केस ऑफ फ्रिडम
  • वॉकिंग विथ कॉम्रेड्स

पुरस्कार व सन्मान

  • दि गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज या कादंबरीला 1997 सालचा बुकर पुरस्कार
  • लॅनन फाऊंडेशनचा पुरस्कार
  • सिडनी शांतता पुरस्कार
  • साहित्य अकादमी पुरस्कार
  • नोमान मेलर पारितोषिक

हाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री मारोतराव कन्नमवार यांचे निधन. 24-11-1963

अल्पपरिचय

    मारोतराव सांबशिव कन्नमवार हे महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री होते. अल्पकाळ मुख्यमंत्री राहिलेले कन्नमवार यांचे आपल्या कार्यालयात असतानाच निधन झाले.

जन्म

10 जानेवारी 1900 सध्याचा चंद्रपूर जिल्हा पूर्वीचा ब्रिटीश भारत

मृत्यू

24 नोव्हेंबर 1963 मुंबई

कार्य

महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री कार्यकाळ 20-11-1962 ते 24-11-1963

    महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून कन्नमवार यांनी अनेक महत्वाचे निर्णय घेतले त्यातील ओझरचा मिग विमान कारखाना,वरणगांव,भंडारा,भद्रावती येथील संरक्षण साहित्याचे कारखाने हे महाराष्ट्रात आणण्यात त्यांचा मोलाचा वाटा राहिला. वाशी येथील खाडीपुलाची कल्पनाही त्यांचीच देण आहे चिनशी चाललेल्या युध्दपार्श्वभूमीवर त्यांनी जमा केलेला सुमारे आठ कोटींचा राष्ट्रीय संरक्षण निधी त्यांच्या दूरदर्शीपणाचे द्योतक आहे. चीनविरूध्दच्या संघर्षात त्यांनी राष्ट्रीयत्वाची भावना जागृत ठेवण्याचे महत्वाचे कार्य केले.

आजचे पुरस्कार

  • 24-11-1992 साहित्यक्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल कवी विंदा करंदीकर यांची कोणार्क पुरस्कारासाठी निवड जाहीर.
  • 24-11-1992 हैदराबाद विद्यापीठातील प्राध्यापक गोवर्धन मेहता यांना वैज्ञानिक संशोधनासाठीचा ’जी. डी. बिर्ला पुरस्कार’ जाहीर.
  • 24-11-1992 पहिला ‘कवी माधव पुरस्कार‘ देवगड तालुक्यातील कवी माधव यांना जाहीर.
  • 24-11-1996 ख्यातनाम अणूशास्त्रज्ञ राजा रामण्णा यांना इंडियन सायन्स काँग्रेस असोसिएशनचा ’आशुतोष मुखर्जी  स्मृती पुरस्कार ’ जाहीर.
  • 24-11-1998 आंबेडकरी चळवळीतील नेत्या आणि कार्यकर्त्या शांताबाई दाणी यांना समाजसेविकांना दिला जाणारा ‘अहिल्यादेवी होळकर पुरस्कार‘ प्रदान.

संंदर्भ व आभार

https://www.google.com/

https://www.marathisrushti.com/

https://www.cricbuzz.com/profiles/5321/sir-ian-botham

https://www.wikipedia.org/

संकल्पना,संकलन व संपादन

भालचंद्र माधव इनामदार


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

13 ऑक्टोबर दिनविशेष-13 october dinvishesh-13-10-2020

ऑक्टोबर 14 2020-आजचा दिनविशेष- october 14 2020-aajcha dinvishesh

ऑक्टोबर 18 2020-October 18 2020