जून 30 2021- 30 June

 

जून 30 2021- 30 June

प्रसिध्द नेते व काँग्रेसचे एक संस्थापक दादाभाई नौरोजी यांचे निधन. 30 जून 1917

अल्पपरिचय

दादाभाई नौरोजी हे भारतीय राष्ट्रवादी नेते,विव्दान,लेखक,राष्ट्रीय काँग्रेसचे एक संस्थापक व काँग्रेसचे तीन वेळा अध्यक्ष तसेच लिबरल पक्षाचे ब्रिटीश संसदीय सदस्य होते.

जन्म

04 सप्टेंबर 1825 नवसारी, बॉम्बे प्रेसिडन्सी, ब्रिटीश भारत

मृत्यू

30 जून 1917 बॉम्बे, ब्रिटीश भारत

शिक्षण

एलफिन्स्टन कॉलेज बॉम्बे, ब्रिटीश भारत

कार्य

प्रसिध्द भारतीय राष्ट्रवादी नेते,विव्दान,लेखक

बडोदा संस्थानात दिवाण

एलफिन्स्टन कॉलेज येथे गणिताचे प्राध्यापक

युनिर्व्हसिटी ऑफ लंडन येथे गुजरातीचे प्राध्यापक

दादाभाई नौरोजी यांनी स्थापन केलेल्या संस्था व चालू केलेली नियतकालिके

  • गाईड्स ऑन दि माध्यासन पाथ
  • दि ट्रुथ टेलर-रास्ट गोफ्टर-वृत्तपत्र
  • दि व्हाईस ऑफ इंडिया-वृत्तपत्र
  • लंडन इंडियन सोसायटी
  • दि झोरास्ट्रीयन ट्रस्ट फंड्स ऑफ युरोप
  • दादाभाई नौरोजी ॲन्ड कंपनी
  • भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

दादाभाई नौरोजी फिन्सबरी सेंट्रलमधून ब्रिटीश संसदेवर निवडून गेले तेथे त्यांनी 1892 ते 1895 असे कार्य केले.

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ते 1886-1887,1893-1894 व 1906 मध्ये अध्यक्ष होते.

पुस्तके

  • दि मॅनर्स ॲन्ड कस्टम्स ऑफ दि पार्सीज
  • दि युरोपिअन ॲन्ड एशियाटिक रेसेस
  • दि वॉन्ट्स ॲन्ड मिन्स ऑफ इंडिया
  • कंडिशन ऑफ इंडिया
  • पॉवर्टी ऑफ इंडिया

दादाभाई नौरोजी यांनी ब्रिटीश शासनकाळातील भारताच्या संपत्तेची लुट यावर आपली ड्रेन थिअरी मांडली. ज्यामधून त्यांनी हे सिध्द केले की ब्रिटीशांनी आपल्या शासनकाळात भारतातील संपत्ती ब्रिटन मध्ये नेली व त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था दुबळी झाली.

संगीतकार कल्याणजी वीरजी शहा यांचा जन्म. 30 जून 1928

अल्पपरिचय

कल्याणजी वीरजी शहा हे प्रसिध्द संगीतकार होते. कल्याणजी-आनंदजी या संगीतकार बंधू  जोडीतील जेष्ठ संगीतकार बंधू म्हणून त्यांना ओळखले जाते.

जन्म

30 जून 1928 कुंद्रोदी, कच्छ, ब्रिटीश भारत

मृत्यू

24 ऑगस्ट 2000

कार्य

प्रसिध्द भारतीय संगीतकार

कल्याणजी यांनी एकट्याने  संगीत दिलेले चित्रपट

  • सम्राट चंद्रगुप्त
  • पोस्ट बॉक्स नं. 999
  • बेदर्द जमाना क्या जाने
  • घर घर की बात
  • ओ तेरा क्या कहना
  • दिल्ली जंक्शन

पुरस्कार

पद्मश्री पुरस्कार-1992

फिल्मफेअर पुरस्कार-सर्वोत्तम संगीत दिग्दर्शन-कोरा कागज-कल्याणजी-आनंदजी या संगीतकार व्दयीला.-1975

काँगो ला बेल्जियम पासून स्वातंत्र्य मिळाले. 30 जून 1960

काँगो

काँगो तथा डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो हा केंद्रीय अफ्रिकन देश असून सहारा अफ्रिका विभागातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने हा सर्वांत मोठा देश आहे तर संपूर्ण अफ्रिका खंडातील अल्जिरिया नंतर दुसरा मोठा देश आहे आणि जगातील 11 व्या क्रमांकाचा सर्वात मोठा देश आहे. बेल्जियम‍ पासून काँगोला 30 जून 1960 रोजी स्वातंत्र्य‍ मिळाले.

देश: रिपब्लिक ऑफ काँगो

राजधानी: किन्शासा

राष्ट्रभाषा: फ्रेंच

चलन: काँगोलिज फ्रँक

अर्थव्यवस्था: खाणउद्योग व कृषी यांवर आधारित काँगो मध्ये जगातील 70% कोल्टन खाणीज सापडते, तसेच तांबे व हिरा यांचाही मोठे साठे या भागात आहेत.

अभिनेते, नाटककार बाळ कोल्हटकर यांचे निधन. 30 जून 1994

अल्पपरिचय

बाळकृष्ण हरी तथा बाळ कोल्हटकर हे प्रसिध्द नाटककार, कवी,अभिनेते,निर्माते,लेखक व दिग्दर्शक होते.

जन्म

25 सप्टेंबर 1926 सातारा, सातारा संस्थान, ब्रिटीश भारत

मृत्यू

30 जून 1994

कार्य

प्रसिध्द नाटककार,कवी,अभिनेते,निर्माते,दिग्दर्शक,लेखक

रेल्वेत नोकरी करीत असतानाच त्यांनी लिखाणाचे कार्य केले. 15 व्या वर्षी जोहार या नाटकातून त्यांचा नाट्यलेखनाचा प्रवास सुरू झाला व  त्या सुमारे  तीन दशकांच्या साहित्यिक कारर्किदीत त्यांनी तीसहून अधिक नाटकांचे लेखन केले.

प्रसिध्द नाटके

  • दुरिताचे तिमिर जावो
  • वाहतो ही दुर्वांची जुडी
  • मुंबईची माणसं
  • देव दीनाघरी धावला
  • एखाद्याचे नशीब
  • हानपण देगा देवा
  • विद्या विनयेन शोभते
  • आकाशगंगा


संदर्भ व आभार

https://www.google.com/

https://www.wikipedia.org/

https://www.marathisrushti.com/


संकल्पना,संकलन व संपादन

भालचंद्र माधव इनामदार

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

13 ऑक्टोबर दिनविशेष-13 october dinvishesh-13-10-2020

ऑक्टोबर 14 2020-आजचा दिनविशेष- october 14 2020-aajcha dinvishesh

2020 ऑक्टोबर 21-2020 october 21