31 जुलै -July 31 2021

 31 जुलै -July 31 2021

शिक्षणतज्ञ नाना शंकरशेठ यांचे निधन. 31 जुलै 1865

अल्पपरिचय

नाना शंकरशेठ तथा जगन्नाथ शंकरशेठ मुरकुटे हे प्रसिध्द शिक्षणतज्ञ व दानशूर होते. मुंबई व परिसरात त्यांनी दूरदृष्टीने उभारलेल्या अनेक संस्था आज अनेकांना शिक्षणासाठी प्रेरित करतात. मुंबई विद्यापीठातर्फे संस्कृत विषयात देण्यात येणारी त्यांच्या नावची जगन्नाथ शंकरशेठ शिषुवृत्ती प्रसिध्द आहे. जगन्नाथ शंकरशेठ यांच्याविषयी अधिक माहितीकरता येथे भेट द्या.

संतसाहित्याचे अभ्यासक लक्ष्मण रामचंद्र पांगारकर यांचा जन्म. 31 जुलै 1872

अल्पपरिचय

लक्ष्मण रामचंद्र पांगारकर हे संतसाहित्याचे अभ्यासक,चरित्रकार होते.

जन्म

31 जुलै 1872 चिपळूण, रत्नागिरी, ब्रिटीश भारत

मृत्यू

10 नोव्हेंबर 1941 वर्धा, ब्रिटीश भारत

शिक्षण-बीए

शालेय शिक्षण: न्यू इंग्लीश स्कूल, पुणे

महाविद्यालयीन शिक्षण: फर्ग्युसन महाविद्यालय, पुणे

कार्य

प्रसिध्द संतसाहित्य अभ्यासक,चरित्रकार

सुरूवातीस पंढरपूर,पुणे, अमरावती या ठिकाणी शिक्षक म्हणून कार्य

मुमुक्षु साप्ताहिकाची धुळे येथे स्थापना व नंतर पुण्यात त्याचे मासिकात रूपांतर या मासिकात अध्यात्मिक,संशोधनपर,राजकीय,सामाजिक आशा विषयांवर पांगारकर यांनी अनेक लेख लिहिले.

प्रसिध्द साहित्य

  • चरित्रचंद्र -आत्मचरित्र
  • तुकाराम चरित्रामृत
  • नवविद्या भक्ती
  • पारिजातकाची फुले
  • भक्तिमार्ग प्रदीप
  • मराठी भाषेचे स्वरूप
  • मराठी वाङमयाचा  इतिहास - खंड 1, 2,3
  • महाराष्ट्रमहोदय
  • मोरोपंतांचे चरित्र आणि काव्यविवेचन
  • मोरोपंती वेचे
  • संत एकनाथांचे संक्षिप्त चरित्र
  • श्री. संत ज्ञानेश्वरांचे चरित्र व ग्रंथविवेचन
  • कविवर्य मुक्तेश्वर चरित्र व काव्यविवेचन
  • संत चरित्र माला
  • श्री समर्थ ग्रंथभांडार
  • महाभारताचे मराठी आवतार
  • ज्ञानेश्वरांची प्रभावळ
  • मुमुक्षुचे उद्गार
  • भक्तिमणिमाला
  • मुमुक्षुचे सिंहावलोकन

हिंदी साहित्यिक मुन्शी प्रेमचंद यांचा जन्म. 31 जुलै 1880

अल्पपरिचय

    मुन्शी प्रेमचंद तथा धनपतराय श्रीवास्तव हे प्रसिध्द हिंदी साहित्यिक होते. तब्बल 300 कथा,15 कादंबऱ्या अशी विपुल साहित्यसंपदा असणारे मुन्शी प्रेमचंद हिंदीसोबतच उर्दु भाषेतीलही उत्कृष्ट साहित्यकार होते. मुन्शी प्रेमचंद यांच्याविषयी अधिक माहितीकरता येथे भेट द्या.

वेदांचे गाढे अभ्यासक पंडित श्रीपाद  दामोदर सातवळेकर यांचे निधन. 31 जुलै 1968

अल्पपरिचय

    पंडित श्रीपाद दामोदर सातवळेकर हे वेदांचे गाढे अभ्यासक,संस्कृत पंडित,चित्रकार व मराठी साहित्यिक होते. व्यक्तीचित्रण हे त्यांच्या चित्रकलेचे वैशिष्ट्य असल्यामुळे अनेक सरदार तसेच राजे यांनी आपली चित्रे सातवळेकरांकडून काढून घेतली. पंडित सातवळेकरांबद्दल अधिक माहितीकरता येथे भेट द्या.

प्रसिध्द पार्श्चगायक महम्मद रफी यांचे निधन. 31 जुलै 1980

अल्पपरिचय

    महम्मद रफी हे प्रसिध्दभारतीय पार्श्वगायक होते. पार्श्वगायनाबरोबरच कव्वाली गायनासाठीही ते प्रसिध्द होते. चित्रपटात असलेल्या अभिनेत्याच्या आवाजाप्रमाणे आपल्या आवाजात बदल करून पार्श्वगायन करणारे महम्मद रफी भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील सार्वकालिक सर्वोत्तम गायकांपैकी एक होते. महम्मद रफी यांच्याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी येथे भेट द्या.

आजचे पुरस्कार

रॅमन मॅगसेसे पुरस्कार प्रसिध्द सतारवादक पंडित रविशंकर यांना जाहीर31 जुलै 1992

एच. के. फिरोदिया पुरस्कार प्रसिध्द वैज्ञानिक डॉ. रघुनाथ माशेलकर व डॉ. डी. डी. भवाळकर यांना जाहीर. 31 जुलै 2000

सामाजिक चित्रपटांच्या माध्यमांतून समाजाचे वैचारिक परिवर्तन करणारे दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांना राजर्षी शाहू समता पुरस्कार जाहीर. 31 जुलै 2001


संदर्भ व आभार

https://www.google.com/

https://www.wikipedia.org/

https://vishwakosh.marathi.gov.in/


संकल्पना,संकलन व संपादन

भालचंद्र माधव इनामदार

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

13 ऑक्टोबर दिनविशेष-13 october dinvishesh-13-10-2020

ऑक्टोबर 14 2020-आजचा दिनविशेष- october 14 2020-aajcha dinvishesh

ऑक्टोबर 18 2020-October 18 2020