10 फेब्रुवारी 2021

 

10 फेब्रुवारी 2021

शिक्षणतज्ञ जगन्नाथ तथा नाना शंकरशेठ यांचा जन्म. 10 फेब्रुवारी 1803

अल्पपरिचय

जगन्नाथ शंकरशेठ मुरकुटे तथा नाना शंकरशेठ हे विख्यात शिक्षणतज्ञ व दानशूर व्यक्ती म्हणून प्रसिध्द होते.

जन्म

10 फेब्रुवारी 1803

मृत्यू

31 जुलै 1865

कार्य

प्रतिष्ठित व्यापारी,दानशूर व्यक्ती व विविध संस्थांचे संस्थापक-सदस्य तसेच शिक्षणतज्ञ

पहिले भारतीय मॅजिस्ट्रेट-जस्टीस ऑफ दि पीस

नाना शंकरशेठ हे मुंबईचे पहिले शेरीफ होते.  आजच्या मुंबईच्या जडणघडणीत मुंबईचे शिल्पकार म्हणून नाना शंकरशेठ यांचे नाव आदराने घेतले जाते ते त्यांनी केलेल्या सामाजिक कार्यामुळे व शिक्षणविस्तारामुळे.

नाना शंकरशेठ यांनी चालू केलेल्या संस्था  तसेच ते सदस्य असलेल्या संस्था

  1. बॉम्बे असोसिएशन
  2. जगन्नाथ शंकरशेठ स्कूल
  3. जे.जे. आर्ट्स कॉलेज
  4. दि मर्केंटाइल बँक ऑफ इंडिया
  5. बोर्ड ऑफ कॉन्झवंसी
  6. स्कूल ऑफ इंडस्ट्रीज
  7. डेव्हिड ससून रिफॉर्मेटरी इन्स्टिट्यूट
  8. सिलेक्ट समिती-म्युनसिपल कायदा व बिल
  9. बोर्ड ऑफ एज्युकेशन
  10. नेटिव्ह स्कूल बुक सोसायटी
  11. एलफिन्स्टन फंड-एलफिन्स्टन कॉलेजच्या स्थापनेत महत्वाचा सहभाग
  12. मुंबई विद्यापीठ व्यवस्थापक मंडळ
  13. आद्य संचालक रेल्वे
  14. बॉम्बे नेटिव्ह डिस्पेन्सरी

नाना शंकरशेठ यांच्या नावे मुंबई विद्यापीठ जगन्नाथ शंकरशेठ शिषुवृत्ती संस्कृत विषयात प्रथम येणाऱ्यास देण्यात येते.

अशी अनेक लोकोपयोगी कार्ये नाना शंकरशेठ यांनी केली म्हणूनच त्यांना मुंबईचे शिल्पकार असे म्हणतात.

साहित्यिका दुर्गा भागवत यांचा जन्म. 10 फेब्रुवारी 1910

अल्पपरिचय

    दुर्गा भागवत या प्रसिध्द लेखिका व मानववंशशास्त्रज्ञ होत्या. विविध साहित्यप्रकारात त्यांनी लेखन केले, त्यांनी लेखन केलेल्या साहित्यप्राकरांमध्ये लोकसाहित्य,बालसाहित्य,कथा,चरित्र,ललित,समीक्षात्मक,वैचारिक अशा अनेक साहित्यप्रकारांचा समावेश होतो.

जन्म

10 फेब्रुवारी 1910 इंदूर,मध्यप्रदेश, आधीचा ब्रिटीश भारत

मृत्यू

07 मे 2002 मुंबई,महाराष्ट्र,भारत

शिक्षण

सेंट झेवियर्स महाविद्यालयातून बी.ए. संस्कृत व इंग्रजी

कार्य

भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सक्रीय सहभाग

गोखले इन्स्टिट्यूट पुणे येथे समाजशास्त्र विभागप्रमुख

एशियाटिक सोसायटी मुंबईच्या सक्रीय कार्यकर्त्या

आणीबाणीकाळात आणीबाणीविरूध्द अंदोलनात सक्रीय सहभाग

साहित्य

  • पैस
  • ऋतुचक्र
  • डूब
  • आठवले तसे
  • आस्वाद आणि आक्षेप
  • कथासरित्सागर
  • खमंग
  • तामीळच्या लोककथा
  • दि रिडिल्स ऑफ इंडियन लाइफ
  • लोअर अॅंड लिटरेचर
  • व्यासपर्व
  • लोकसाहित्याची रूपरेखा
  • सिध्दार्थ जातक
  • राजारामशास्त्री भागवत यांचे निवडक साहित्य

ब्रिटीश शल्यविशारद सर जोसेफ लिस्टर यांचे निधन. 10 फेब्रुवारी 1912

अल्पपरिचय

    सर जोसेफ लिस्टर हे एक नामवंत ब्रिटीश शल्यविशारद व शस्त्रक्रियेदरम्यान जखमांचे निर्जुंतिकरण करणाच्या प्रक्रियेचे जनक आहेत.निर्जुंतिकरण केल्याने जखमा लवकर बऱ्या होतात ते लिस्टर यांनी सिध्द केले.

जन्म

05 एप्रिल 1827 उप्टन हाउस,वेस्ट हॅम्पशायर,इंग्लंड

मृत्यू

10 फेब्रुवारी 1912 वाल्मर केन्ट.इंग्लंड

शिक्षण

युनिव्हिर्सिटी कॉलेज,लंडन येथून वैद्यकीय क्षेत्रात शिक्षण

कार्य

एडिनबर्ग विद्यापीठात  अध्यापनाचे कार्य

नामवंत ब्रिटीश शल्यविशारद

शस्त्रक्रियेदरम्यानच्या निर्जुंतिकिकरण प्रक्रियेचा प्रणेता

शस्त्रक्रियेदरम्यान होणाऱ्या जखमांचे निर्जुतुकिकरण केल्यास त्या लवकर बऱ्या होतात व त्यामुळे रूग्णांची प्रकृती लवकर सुधारते हे लिस्टर यांनी सिध्द केले.

रॉयल सोसायटी लंडनचे अध्यक्ष कार्यकाळ 1895 ते 1900

पुरस्कार

  • रॉयल मेडल
  • कॅमेरून पारितोषिक
  • अल्बर्ट मेडल
  • कोपली मेडल

जर्मन भौतिकशास्त्रज्ञ विल्हेम राँटजेन यांचे निधन. 10 फेब्रुवारी 1923

अल्पपरिचय

विल्हेम राँटजेन हे जर्मन भौतिकशास्त्रज्ञन होते. एक्स रे अर्थात क्ष-किरणांच्या शोधासाठी त्यांना ओळखले जाते.

जन्म

27 मार्च 1845

मृत्यू

10 फेब्रुवारी 1923

कार्य

प्रसिध्द जर्मन भौतिकशास्त्रज्ञ

विल्हेम राँटजेन यांनी क्ष- किरण अर्थात एक्स रे तंत्राचा शोध लावला या तंत्रामुळे वैद्यकीय क्षेत्रात क्रांती घडून आली.

एक्स रे तंत्राच्या शोधामुळे मानवाच्या वैद्यकीय कारर्किदीत एक नवीन उंची मिळाली या शोधामुळे हडांचे अनेक आजार व त्यांचे उपाय शोधण्यास मदत झाली. ही किरणे मानवी शरीराच्या आरपार जाऊ शकत असल्यामुळे पुढे अनेक गुंतागुतीच्या शस्त्रक्रियांमध्ये या तंत्राचा सढळहस्ते वापर सुरू झाला.

पुरस्कार

राँटजेन यांना क्ष-किरणांच्या शोधासाठी 1901 साली भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

संदर्भ व आभार

https://www.google.com/

https://www.wikipedia.org/

 

संकल्पना,संकलन व संपादन

भालचंद्र माधव इनामदार

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

13 ऑक्टोबर दिनविशेष-13 october dinvishesh-13-10-2020

ऑक्टोबर 14 2020-आजचा दिनविशेष- october 14 2020-aajcha dinvishesh

ऑक्टोबर 18 2020-October 18 2020