ऑक्टोबर 18 2020-October 18 2020
ऑक्टोबर 18 2020-October 18 2020
ऑक्टोबर 18 1871 - पहिला संगणकनिर्माता चार्ल्स बॅबेज यांचे निधन.
डिसेंबर 26 1791 साउथवार्क लंडन यु.के.
ऑक्टोबर 18 1871 मेरिलबोर्न लंडन यु.के.
त्रिनीटी कॉलेज केंब्रीज यु.के.
- संगणकाचे जनक
- पहिला यांत्रिकी संगणक तयार करण्याचे श्रेय बॅबेज यांना जाते.
- बॅबेज यांचे डिफरन्स इंजिन व ॲनिलिटिकल इंजिन आजच्या आधुनिक संगणकाचे रूप आहे. हे गणिती आकडेमोड त्याकाळी सुलभरीतीने करित असे.
- गणित, अभियांत्रिकी,राजकीय अर्थव्यवस्था तसेच संगणकशास्त्रात उल्लेखनीय कार्य
ऑक्टोबर 18 1922 ब्रिटीश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनची -बीबीसीची स्थापना.
बीबीसी ही जगातील सर्वांत मोठी मिडिया ब्रॉडकास्टिंग अथवा प्रसारण संस्था आहे. ही इंग्लंडची अधिकृत व जगातील पहिली राष्ट्रीय प्रसारण संस्था आहे. मनोरंजन व माहितीपर कार्यक्रम आकाशवाणी(रेडिओ), दूरचित्रवाणी(टेलिव्हिजन) तसेच इंटरनेटच्या माध्यमातून बीबीसी व्दारा प्रसारित केले जातात. बीबीसीची वर्ल्ड सर्विस ही तब्बल 40 भाषांतून कार्यक्रमाचे प्रसारण करते.
ऑक्टोबर 18 1931 अमेरिकन संशोधक थॉमस अल्वा एडिसन यांचे निधन.
थॉमस अल्वा एडिसन हे नाव विज्ञानात अजरामर आहे कारण त्यांनी लावलेले शोध हे अखिल मानवजातीचे भविष्य उज्वल करणारे होते. तब्बल 1000 पेक्षा जास्त पेटंट नावावर असणारे एडिसन हे त्यांच्या विजेच्या दिव्याच्या शोधामुळे जगप्रसिध्द आहेत. संशोधनाबरोबरच ते उद्योगविश्वातही सक्रीय होते.
फेब्रुवारी 11 1847 ओहायो अमेरिका
ऑक्टोबर 18 1931 न्यू जर्सी अमेरिका
एडिसन फक्त 3 महिने शाळेत गेले, पण शाळेत त्यांना एक ढ विद्यार्थी म्हणून संबोधले गेले म्हणून बाकी शिक्षण त्यांच्या आईनेच त्यांना दिले.
थोर संशोधक एडिसन व त्यांनी लावलेले शोध व त्यामुळे झालेल्या प्रगतीमुळे अवघी मानवजात सुखी झाली.
एडिसनने लावलेले प्रमुख शोध
- विजेचा दिवा
- फोनोग्राफ-ग्रामोफोन
- कार्बन टेलिफोन ट्रान्समीटर
- विद्युत उर्जा वितरण प्रणाली- डीसी करंट वर अधारित
- फ्लोरोस्कोपी
- टॅसिमीटर
- टेलिग्राफ डेव्हलपमेंट
- किनोटोग्राफ व किनोटोस्कोप-मोशन पिक्चर साठी
- रिचार्जेबल बॅटरी साठी संशोधन
याशिवाय अनेक असे शोध आहेत ज्याचे पेटंट एडिसनकडे होते. साधारणत: सुमारे 1033 पेटंट्स एडिसनकडे होती असे म्हणतात.
ऑक्टोबर 18 1950 हिंदी चित्रपट अभिनेते ओम पुरी यांचा जन्म.
अल्पपरिचय
ओम पुरी हे हिंदी चित्रपटसृष्टीतील एक प्रसिध्द अभिनेते होते. त्यांनी हिंदीबरोबरच मराठी, इंग्रजी व अमेरिकन चित्रपटातही भूमिका केल्या आहेत. गंभीर तसेच विनोदी भूमिका हे ओम पुरी यांचे वैशिष्ट्य होते.
ऑक्टोबर 18 1950 अंबाला हरियाणा
जानेवारी 06 2017 मुंबई महाराष्ट्र
हिंदी तसेच अनेक भाषांत अभिनेता म्हणून काम
- घाशीराम कोतवाल- मराठी चित्रपट
- भूमिका
- आक्रोश
- डिस्को डांसर
- गांधी
- माचिस
- हेराफेरी
- पुकार
- रंग दे बसंती
- मालामाल विकली
- मेरे बाप पहले आप
- चुप चुप के
- पद्मश्री
- राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
ऑक्टोबर 18 1956 प्रसिध्द लॉन टेनिस खेळाडू मार्टिना नवरातिलोच्हा हिचा जन्म.
मार्टिना नवरातिलोव्हा ही अमेरिकेची लॉन टेनिस खेळाडू असून झेकोस्लोवाकिया येथे तिचा जन्म झाला. मार्टिना नवरातिलोव्हा ही जगातील सार्वकालिक सर्वोत्तम टेनिस खेळाडूंमध्ये गणली जाते. मार्टिना ही जागतिक एकेरी टेनिस क्रमवारीत 332 आठवडे व दुहेरीत 237 आठवडे प्रथम स्थानावर राहिली आहे. 59 विविध विजेतीपदे नावावर असणाऱ्या नवरातिलोच्हा कडे 18 एकेरी,31 प्रमुख दुहेरी व 10 प्रमुख मिश्र दुहेरी विजेतीपदे आहेत. मार्टिना नवरातिलोव्हा व सेरेना विल्यम्स या अशा देानच खेळाडू आहेत ज्यांनी सहा प्रमुख टेनिस स्पर्धा एकही सेट न गमविता जिंकल्या आहेत.
ऑक्टोबर 18 1956 प्राग झेकोस्लोवाकिया
स्पर्धात्मक टेनिस मध्ये अतुलनीय कार्य
सार्वकालिक महान खेळाडूंमध्ये सहभाग
ग्रॅडस्लॅम विजेतीपदे-एकेरी
- विम्बल्डन-1978,1979,1982,1983,1984,1985,1986,1987,1990
- फ्रेंच-1982,1984
- ऑस्ट्रेलियन-1981,1983,1985
- अमेरिकन-1983,1984,1986,1987
ग्रॅडस्लॅम विजेतीपदे-दुहेरी
- विम्बल्डन- 1976 , 1979 , 1981 , 1982 , 1983 , 1984 , 1986
- फ्रेंच-1975 , 1982 , 1984 , 1985 , 1986 , 1987 , 1988
- ऑस्ट्रेलियन- 1980 , 1982 , 1983 , 1984 , 1985 , 1987 , 1988 , 1989
- अमेरिकन-1977 , 1978 , 1980 , 1983 , 1984 , 1986 , 1987 , 1989 , 1990
- विम्बल्डन- 1985 , 1993 , 1995 , 2003
- फ्रेंच- 1974 , 1985
- ऑस्ट्रेलियन-2003
- अमेरिकन-1985 , 1987 , 2006
मार्टिना नवरातिलोव्हा ही ॲग्निझ्का रडवास्काची 2014 ते 2016 प्रशिक्षक होती.
संदर्भ व आभार-ऑक्टोबर 18 2020
Image by Venita Oberholster from Pixabay
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
Please do not enter any spam link in comment.