24 डिसेंबर 2020 राष्ट्रीय ग्राहक दिन विशेष
24 डिसेंबर 2020 राष्ट्रीय ग्राहक दिन विशेष
24 डिसेंबर 2020 राष्ट्रीय ग्राहक दिन
24 डिसेंबर
1986 रोजी राष्ट्रीय ग्राहक संरक्षण कायदा मंजूर झाल्यामुळे हा दिवस राष्ट्रीय
ग्राहक दिन म्हणून साजरा करण्यास सुरवात झाली. ग्राहकांचे हक्क,अधिकार अबाधित रहावेत
कोणतीही वस्तू किंवा सेवा घेताना त्यांची लूट व ग्राहकांना सदोष वस्तू अथवा सेवा मिळू
नये हा या कायद्याचा प्राथमिक उद्देश आहे. हा कायदा ग्राहकाला विक्रेत्याविरूध्द अथवा
सेवा प्रदान करणाऱ्यां विरूध्द ग्राहक न्ययालयात सदोष वस्तू अथवा सेवेबद्दल अपील करण्याचा
अधिकार प्रदान करतो. ग्राहकांचे प्रबोधन व फसवणूकीपासून सुटकेसाठी या दिवशी अनेक कार्यक्रमांव्दारे
जनजागृती केली जाते.
24 डिसेंबर 1899 थोर समाजसुधारक साने गुरूजी यांचा जन्म.
पांडुरंग सदाशिव
साने तथा सानेगुरूजी हे थोर समाजसुधारक,स्वातंत्र्यसैनिक,नेते,कवी,लेखक होते. साहित्य,राजकारण,समाजसुधारणा
आदी क्षेत्रांत त्यांनी मोलाचे कार्य केले. सानेगुरूजींचे श्यामची आई हे पुस्तक प्रचंड
प्रसिध्द झाले.
24 डिसेंबर
1899 पालगड,रत्नागिरी,ब्रिटीश भारत
मृत्यू
11 जून 1950
एम.ए. इंग्रजी
जातीभेद,अनिष्ट
रूढी तसेच परंपरा या समाजातील दोषांवर कार्य
पंढरपूरचे विठ्ठल
मंदिर सर्वांसाठी खुले करण्यासाठी यशस्वी उपोषण व अंदोलन
भारतीय स्वातंत्र्यलढ्यात
सहभाग- सविनय कायदेभंग,चले जाव चळवळ अशा चळवळीत सहभाग व तुरूंगवास
बालसाहित्य,कविता,लेख,कादंबरी,निबंध,चरित्र,अनुवाद
अशा अनेक प्रकारांत विपुल लेखन
विद्यार्थी हे
मासिक व काँग्रेस या साप्ताहिकाचे संस्थापक
राष्ट्रसेवा
दलाचे संस्थापक
सानेगुरूजींनी
प्रांताप्रांतातील एकात्मता वाढावी व परस्परांची संस्कृती समजून एकमेकांचा विकास व्हावा
या उद्देशाने अंतरभारती ही संकल्पना मांडली होती, ज्यामध्ये विविध प्रांतातील
लोक एकमेकांची भाषा शिकतील व संस्कृतीचे आदान प्रदान होईल अशाने भारताची एकात्मता अबाधित
राहील अशी ती संकल्पना होती. वडघर मुद्रे या माणगाव रायगड येथील साने गुरूजी राष्ट्रीय
स्मारकाव्दारे या संकल्पनेचा पुर्नविस्तार करण्याची योजना सुरू आहे.
- अमोल गोष्टी
- अस्पृश्योद्धार
- आपण सारे भाऊ
- आस्तिक
- इस्लामी संस्कृति
- उमाळा
- कलिंगडाच्या साली
- करुणादेवी
- कर्तव्याची हाक
- कला आणि इतर निबंध
- कला म्हणजे काय?
- कल्की अर्थात संस्कृतीचे भविष्य
- कावळे
- 'तिरूकुरल' नावाच्या तमिळ महाकाव्याचे मराठी भाषांतर
- क्रांति
- बापूजींच्या गोड गोष्टी (गांधींचे चरित्र)
- महात्मा गांधींचे दर्शन (चरित्र)
- गीताहृदय
- गुरुजींच्या गोष्टी
- गोड गोष्टी (कथामाला), भाग १ ते १०
- नामदार गोखले (चरित्र)
- गोड निबंध भाग १, २, ३
- गोड शेवट
- गोप्या
- गोष्टीरूप विनोबाजी
- महात्मा गौतम बुद्ध
- चित्रकार रंगा
- जयंता
- जीवनप्रकाश
- जीवनाचे शिल्पकार -राजवाडे, टागोर, ईश्वरचंद्र, शिशिरकुमार तसेच इतरांची चरित्रे
- तीन मुले
- ते आपले घर
- त्यागातील वैभव
- त्रिवेणी
- दारुबंदीच्या कथा
- दिगंबर राय
- दिल्ली डायरी
- दुर्दैवी
- धडपडणारी मुले
- नवजीवन
- नवा प्रयोग
- पत्री
- भारताचा शोध
- भारतीय नारी
- भारतीय संस्कृती
- माझी दैवते
- मानवजातीची कथा
- मिरी
- मुलांसाठी फुले
- मेंग चियांग आणि इतर गोष्टी
- मोरी गाय
- मृगाजिन
- यश
- रामाचा शेला
- विनोबाजी भावे
- विश्राम
- शबरी
- श्री शिवराय (चरित्र, ८ भाग)
- धडपडणारा श्याम
- श्याम खंड १, २
- श्यामची आई
- श्यामची पत्रे
- भगवान श्रीकृष्ण (चरित्र, ८ भाग)
- संस्कृतीचे भवितव्य
- सती
- संध्या
- समाजधर्म.
- साधना
- साक्षरतेच्या कथा
- सुंदर कथा
- सुंदर पत्रे
- सोनसाखळी व इतर कथा
- सोन्या मारुती
- स्त्री जीवन
- स्वदेशी समाज
- स्वप्न आणि सत्य
- स्वर्गातील माळ
- राष्ट्रीय हिंदुधर्म
- हिमालयाची शिखरे व इतर चरित्रे
- खरा तो एकचि धर्म....जगाला प्रेम अर्पावे....
- बलसागर भारत होवो......विश्वात शोभूनी राहो........
24 डिसेंबर 1924 ख्यातनाम गायक महम्मद रफी यांचा जन्म.
अल्पपरिचय
महम्मद रफी हे
भारतीय चित्रपटसृष्टीतील एक प्रसिध्द पार्श्वगायक,कव्वाली गायक होते. भारतीय चित्रपटसृष्टीच्या
इतिहासातील सर्वात प्रसिध्द आवाजापैकी एक असलेले महम्मद रफी सार्वकालिक सर्वोत्तम पार्श्वगायकांपैकी
एक आहेत. महम्मद रफी असे गायक होते जे चित्रपटातील जो नायक असेल त्याच्या आवाजाप्रमाणे आपला आवाज त्या गाण्यात उतरवत
असत.
24 डिसेंबर
1924 कोटला सुलतान सिंग, पंजाब,ब्रिटीश भारत,सध्या भारत
मृत्यू
31 जुलै
1980 मुंबई,महाराष्ट्र,भारत
भारतीय चित्रपटसृष्टीतील
एक प्रसिध्द पार्श्वगायक
महम्मद रफी यांनी
1944 पासून 1980 पर्यंतच्या आपल्या सांगीतिक कारर्किदीत अनेक संगीतकारांबरोबर तसेच
गायक व गायिकांबरोबर कार्य केले. त्यातील मुख्य असे होते, संगीतकार-नौशाद,ए.डी. बर्मन,शंकर-जयकिशन,रवी,मदनमोहन,ओ.पी.नय्यर,लक्ष्मीकांत
- प्यारेलाल,कल्याणजी -आनंदजी तसेच गायक,गायिका-लता मंगेशकर,मन्ना डे,आशा भोसले,मुकेश
इ.
- ओ दुनिया के रखवाले......
- एक घर बनाऊंगा.......तेरे घर के सामने....
- बहारों फूल बरसाओ.....
- चौदहवीं का चाँद.......
- ये दुनिया ये महफिल.....
- यूं तो हमने लाख हसीन देखे है........
- चाहूंगा मै तुझे......
- बेखुदी मै सनम......
- हमको तुमसे हो गया है प्यार क्या करें.....
- परदा है..परदा......
- क्या हुआ तेरा वादा........
- पद्मश्री 1967
24 डिसेंबर 1973 द्रविड चळवळीचे प्रणेते पेरियार ई.व्ही. रामस्वामी यांचे निधन.
इरोड वेंकट रामस्वामी पेरियार हे द्रविडी समाजिक चळवळीतील प्रमुख नेते,जस्टिस
पक्षाचे अध्यक्ष,द्रविड कझागम तसेच स्वाभिमान अंदोलनाचे प्रणेते होते. त्यांनी ब्राह्मणेतर
समाजाच्या प्रश्नांना वाचा फोडली व त्याभोवतीच त्यांचे राजकारण राहिले.
17-09-1879 इरोड,मद्रास
प्रांत,ब्रिटीश भारत,सध्या तामीळनाडू
मृत्यू
24-12-1973 वेल्लोर
तामीळनाडू
पेरियार रामस्वामी
हे द्रविड चळवळीचे आधारस्तंभ व प्रमुख नेते होते. सध्याच्या तमीळनाडूतील ब्राह्मणेतर
वर्गाला संघटीत करून त्यांच्या न्याय्य हक्कासाठी त्यांनी लढा दिला. पेरियार रामस्वामी
काशी येथे गेले असताना निशुल्क भोजनालयात जेवणसाठी गेले असताना त्यांना तेथून बाहेर
हाकलले गेले. त्यासाठी कारण दिले की हे भोजन फक्त ब्राह्मण वर्गासाठी आहे त्यामुळे
ते व्यथीत झाले व त्यानंतर त्यांनी ब्राह्मणेतर वर्गाच्या न्याय हक्कासाठी लढा दिला
जसे की मंदिरप्रवेश वगैरे. द्रविड समाजातील जातीभेदाविरूध्द आवाज उठविणारे त्यांचे
व्यक्तीमत्व होते.
पेरियार रामस्वामी
यांनी खालील अंदोलने उभारली.
- स्वाभिमान अंदोलन- ब्राह्मणेतर वर्गाला स्वाभिमानाने राहण्यासाठी ही चळवळ उभारण्यात आली.
- द्रविड कझागम-द्रविड समाजातील समानतेसाठी उभारण्यात आलेली चळवळ
राष्ट्रीय काँग्रेसचे
सदस्य-1919-1925
वायकोम सत्याग्रहात
सहभाग-1925
भारतीय स्वातंत्र्यलढ्यात
सहभाग
हिंदी भाषेला
विरोध तसेच तमीळ भाषा समृध्दीसाठी कार्य
जस्टिस पक्षाचे
अध्यक्ष
द्रविड कझागम
पक्षाचे संस्थापक
पेरियार रामस्वामी
बुध्दीवादी,पुरोगामी होते, समाजसुधारक असलेले ते महिलांच्या हक्कांबद्दल जागरूक होते.
त्यांचे म्हणणे होते की, महिलांनाही पुरूषांप्रमाणेच समानतेचा अधिकार आहे, त्याही शिक्षणाच्या
हक्कदार आहेत, व आपली मते मांडण्याचा त्यांना पूर्णपणे अधिकार आहे.
द्रविड कझागम
या पक्षाचे नंतर सी.एन. अण्णादुराई यांच्या नेतृत्वाखाली विभाजन झाले व त्यांनी द्रविड
मुन्नेत्र कझागम-डिएमके या पक्षाची स्थापना केली.
24 डिसेंबर 1987 प्रसिध्द अभिनेते,राजकारणी एम.जी. रामचंद्रन यांचे निधन.
मरूदुर गोपालन रामचंद्रन तथा एम.जी. रामचंद्रन हे तमीळ चित्रपटसृष्टीतील
प्रसिध्द अभिनेते,तमीळनाडू राज्याचे तीनवेळा मुख्यमंत्री होते. अण्णा द्रविड मुन्नेत्र
कझागम या पक्षाचे ते संस्थापक अध्यक्ष होते.
जन्म
17-01-1917 नवलपीटिया,
ब्रिटीश सिलोन
24-12-1987 चेन्नई,तमीळनाडू
,भारत
कार्य
तमीळ चित्रपटसृष्टीतील
प्रसिध्द अभिनेते
अण्णा द्रविड
मुन्नेत्र कझागम-एआयडीएमके पक्षाचे संस्थापक अध्यक्ष
तमीळनाडूचे तीनवेळा
मुख्यमंत्री कार्यकाळ 1977 ते 1987
चित्रपटातून
राजकारणात येऊन राजकीय कारर्किर्दही यशस्वी असणारा तसेच कोणत्याही राज्याचा मुख्यमंत्री
असलेला पहिलाच नेता
- मंथिरी कुमारी
- मलाइकल्लन
- थिरूदादे
- एंगे वेतु पिल्लई
- महादेवी
- उलगाम सुतरम वलीभान
पुरस्कार
- भारतरत्न-मरणोत्तर 1988
- एमजी. रामचंद्रन यांना अनेक फिल्मफेअर पुरस्कारांनी गौरविले गेले आहे.
संदर्भ व आभार
संकल्पना,संकलन व संपादन
भालचंद्र माधव इनामदार
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
Please do not enter any spam link in comment.