ऑक्टोबर 14 2020-आजचा दिनविशेष- october 14 2020-aajcha dinvishesh
ऑक्टोबर 14 2020-आजचा दिनविशेष- october 14 2020-aajcha dinvishesh
ऑक्टोबर 14 1919-आजचा दिनविशेष- october 14 1919-aajcha dinvishesh
जर्मन उद्योगपती जॉर्ज विल्हेम फॉन सिमेन्स यांचे निधन.
अल्पपरिचय
जॉर्ज विल्हेम फॉन सिमेन्स हा प्रसिध्द जर्मन उद्योगपती व वर्नर फॉन सिमेन्स-सिमेन्स या जगप्रसिध्द कंपनीचा संस्थापक याचा दुसरा मुलगा होता. जॉर्ज हा जर्मन टेलिकम्युनिकेशन क्षेत्रातील उद्योगपती होता.
जन्म
30 जुलै 1855 बर्लिन जर्मनी
मृत्यू
14 ऑक्टोबर 1919 अरोसा स्विर्झंलँड
कार्य
- सिमेन्स कंपनीचा जनरल पार्टनर
- सिमेन्स अँड हाल्स्के(S&H) ही कंपनी त्याने कार्ल हेन्रीच फॉन सिमेन्स या आपल्या काकांबरोबर त्याने सुरू केली.
- सिमेन्स-शुकेर्ट एजी या कंपनीचा चेअरमन म्हणून काम
- सिमेन्स अँड हाल्स्के(S&H) या कंपनीचा तिसरा चेअरमन म्हणून काम.
- बर्लिन ते इराक रेल्वेलाइन सिस्टिमचे श्रेय जॉर्ज विल्हेम फॉन सिमेन्स ला जाते.
- सिमेंन्सस्टॅट या बर्लिनमधील उपनगराचा संस्थापक
ऑक्टोबर 14 1936-आजचा दिनविशेष- october 14 1936-aajcha dinvishesh
प्रसिध्द साहित्यिक डॉ. सुभाष भेंडे यांचा जन्म.
अल्पपरिचय
डॉ. सुभाष भेंडे हे मराठी साहित्यिक तसेच प्राध्यापक होते. साहित्याच्या अनेक क्षेत्रात त्यांचे योगदान होते, जसे की , कादंबरी, प्रवासवर्णन,विनोद,नाटक इ.
जन्म
14 ऑक्टोबर 1936 बोरी, गोवा
मृत्यू
20 डिसेंबर 2010 मुंबई महाराष्ट्र
शिक्षण-एम.ए. पीएचडी अर्थशास्त्र
शालेय व महाविद्यालयीन शिक्षण- सांगली व पुणे
कार्य
कीर्ती महाविद्यालयात अर्थशास्त्राचे प्राध्यापक
मराठीतील प्रसिध्द साहित्यिक
साहित्य
- अगतिक आणि अदेशी (दिलीप प्रकाशन, मुंबई)
- अदेशी (हंस प्रकाशन, पुणे. 1971)
- अंधारवाटा (1978)
- अल्लाउद्दीन आणि अलिबाबा (अनुवादित, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस, 1992)
- आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण : शिल्पकार चरित्रकोश, खंड २, संपादन हिदुस्थान प्रकाशन संस्था, मुंबई.
- आमचं गोय आमका जाय (1970)
- आमचा गोवा आम्हांला हवा (पुष्प प्रकाशन, पुणे)
- इसापच्या गोष्टी (अनुवादित, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस, मुंबई. 1992)
- उद्ध्वस्त (मेनका प्रकाशन, 1985)
- एक डोळे, सात गाळे (सन पब्लिकेशन, 1982)
- ऐंशी दिवसात जगाची सफर (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक ज्यूल व्हर्ने, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस, मुंबई. 1992)
- ऐसी कळवळ्याची जाती (डिंपल पब्लिीकेशन, ठाणे.2000)
- कागदी बाण (दिलीप प्रकाशन, मुंबई)
- किनारा : नवक्षितिजे निर्माण करण्याची आकांक्षा उरी बाळगणाऱ्या मनस्वी उद्योजकाची कहाणी (मॅजेस्टिक प्रकाशन, 1994)
- कुमाऊंचे नरभक्षक (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - जिम कार्बेट), (ऑक्सफर्ड युनिर्व्हसिटी प्रेस, मुंबई 1982)
- खुसखुशीत (उत्कर्ष प्रकाशन, पुणे. 1993)
- गड्या आुला गाव बरा (श्री विद्या प्रकाशन, पुणे. 1985)
- गंभीर आणि गमतीदार (मॅजेस्टिक प्रकाशन,मुंबई. 1990)
- चकवा (दिलीपराज प्रकाशन, पुणे. 2010)
- चषक आणि गुलाब (मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस, मुंबई)
- जित्याची खोड (पुष्प प्रकाशन, पुणे)
- जिथे जातो तेथे (श्रीविद्या प्रकाशन, 1990)
- जोगीण (मॅजेस्टिक प्रकाशन, मुंबई 2003)
- दर्यावर्दी सिंदबाद (अनुवादित, मूळ लेखक - डिंगल मेरियन; ऑक्सफ़र्ड युनिवर्सिटी प्रेस, दिल्ली 1986)
- दिलखुलास (1975)
- द्राक्ष आणि रुद्राक्ष (श्रीविद्या प्रकाशन, 1983)
- निवडक गंभीर आणि गंमतीदार (मॅजेस्टिक प्रकाशन, 1990)
- नेपोलियननंतर तुम्हीच (मीनल प्रकाशन, 1981)
- पितळी दरवाजा (श्रीविद्या प्रकाशन, 1993)
- पैलतीर (मॅजेस्टिक, 1982)
- फूल ना फुलाची पाकळी (1975)
- बेस्ट ऑफ जयवंत दळवी (मॅजेस्टिक प्रकाशन,मुंबई 2009)
- बोनसाय ( मॅजेस्टिक प्रकाशन, मुंबई 1988)
- मयसभा.(पुष्प प्रकाशन, पुणे. 2002)
- मार्को पोलो (अनुवादित, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस, मुंबई. 1986)
- मार्ग सुखाचा (मॅजेस्टिक, 1984)
- मोनिकाच्या धमालकथा (आदित्य प्रकाशन, मुंबई. 1992)
- रॉबिन्सन क्रुसो (अनुवादित, ऑक्सफर्ड युनिवर्सिटी प्रेस, मुंबई 1992)
- लांबलचक काळीशार सावली (विश्वमोहिनी, 1981)
- लोटांगण (एस.के. प्रकाशन पुणे.1995)
- साहित्य संस्कृती (श्रीविद्या प्रकाशन, 1999)
- सुरस व चमत्कारिक (श्री विद्या प्रकाशन, पुणे. 1990)
- स्मितकथा (1973)
- स्वर्ग दोन बोटे (राधा प्रकाशन, 1981)
- हर्क्युलिस (अनुवादित, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस, मुंबई. 1992)
- हलकं फुलकं (श्री विद्या प्रकाशन, पुणे 1997)
- हसवेगिरी (बा. ग. ढवळे प्रकाशन, 1978)
- हास-परिहास (अमेय प्रकाशन, 1978)
- हास्यतरंग (दिलीप प्रकाशन, मुंबई)
- होमकुंड-गोमंतकात सत्तर ऐंशी वर्ष होत असलेल्या राजकीय,सामाजिक परिवर्तनाचा वेध होणारी कादंबरी (मॅजेस्टिक, 2007)
डॉ. भेंडेंच्या गड्या आपुला गाव बरा या अमेरिकेतील प्रवासवर्णपर लेखाचा समावेश इयत्ता बारावीच्या पाठ्यपुस्तकामध्ये करण्यात आला आहे.
पुरस्कार व सन्मान
- महाराष्ट्र राज्य पुरस्कार जोगीन, चषक आणि गुलाब, मार्ग सुखाचा, बोंसाय, जेथे जातो तेथे, होमकुंड
- गोवा कला अकादमी: आदेशी, जोगिन
- महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे-जेथेजातो तेथे”
- सर्वजनिक वाचनालय, नाशिक- जेथे जातो तेथे
- गोमंतक मराठी साहित्य संमेलन- सँक्वेलीम-सुवर्णपदक
- 21 व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष स्थळ-कराड
- डॉ. सुभाष भेंडे यांच्या नावाने त्यांचे कुटुंबीय व मॅजेस्टिक प्रकाशनातर्फे सुभाष भेंडे नवोदित लेखक पुरस्कार देण्यात येतो.
ऑक्टोबर 14 1947-आजचा दिनविशेष- october 14 1947-aajcha dinvishesh
साहित्यसम्राट नरसिंह चिंतामण केळकर यांचे निधन.
अल्पपरिचय
नरसिंह चिंतामण केळकर हे मराठी साहित्यिक,तत्कालीन कायदेमंडळाचे सदस्य व लोकमान्य टिळकांच्या केसरी चे संपादक होते.
जन्म
ऑगस्ट 24 1872 मोडनिंब सोलापूर
मृत्यू
ऑक्टोबर 14 1947 पुणे महाराष्ट्र
शिक्षण
शालेय व माध्यमिक शिक्षण- मिरज व पुणे
महाविद्यालयीन शिक्षण-पुण्याच्या फर्ग्युसन,डेक्कन तसेच कोल्हापूरच्या राजाराम महाविद्यातून घेतले.
कार्य
- लोकमान्य टिळकांच्या 1897 मधील अटकेनंतर ते केसरी दैनिकाचे संपादक झाले.
- स्वातंत्र्यचळवळीत, असहकार अंदोलनात सहभाग
- दुसऱ्या गोलमेज परिषदेचे भारतीय प्रतिनिधी
- तत्कालीन कायदेमंडळाचे सदस्य
- ऐतिहासिक लिखाण, कादंबरी, संगीत नाटके,कविता, लेख,संपादकीय लिखाण या क्षेत्रातील भरीव योगदानामुळे साहित्यसम्राट ही उपाधी न.चिं. केळकरांना मिळाली.
साहित्य
- अमात्य माधव (नाटक)
- आयर्लंडचा इतिहास
- कृष्णार्जुनयुद्ध (नाटक)
- कोकणचा पोर (कादंबरी)
- ग्यारीबाल्डीचे चरित्र
- चंद्रगुप्त (नाटक)
- तोतयाचे बंड (नाटक)
- नवरदेवाची जोडगोळी (नाटक?)
- बलिदान (कादंबरी)
- भारतीय तत्त्वज्ञान (वैचारिक)
- मराठे आणि इंग्रज (ऐतिहासिक)
- लोकमान्यांचे चरित्र (२ खंड) -चरित्रलेखन
- वीर विडंबन (नाटक)
- संत भानुदास (नाटक)
- समग्र केळकर वाङमय- खंड १ ते १२ (१९३८)
- सरोजिनी (नाटक)
- सुभाषित आणि विनोद
- हास्य विनोद मीमांसा (ललित)
- ज्ञानेश्वरी सर्वस्व
सन्मान व पुरस्कार
- मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष बडोदा -1921
- मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष नाशिक-1906
ऑक्टोबर 14 1993-आजचा दिनविशेष- october 14 1993-aajcha dinvishesh
वालचंद उद्योगसमुहाचे अध्यक्ष उद्योगपती लालचंद हिराचंद यांचे निधन.
अल्पपरिचय
लालचंद हिराचंद हे भारताच्या औद्योगिक प्रगतीतील एक शिलेदार व प्रसिध्द उद्योगपती होते. त्यांचे बंधू वालचंद हिराचंद यांच्या अनेक संस्थांचे त्यांनी अध्यक्षपद भूषविले. आज त्यांच्या अनेक संस्था भारताच्या औद्योगिक प्रगतीत अग्रभागी आहेत.
जन्म
ऑक्टोबर 24 1904 सोलापूर
मृत्यू
ऑक्टोबर 14 1993
कार्य
वालचंद उद्योगसमूहाचे अध्यक्ष
- The Scindia Steam Navigation Company Ltd.
- Walchandnagar Industries,
- Hindustan Aeronautics Limited
- Ravalgaon Sugar Factory
- Hindustan Construction Company
- Premier Automobiles
या तसेच उद्योगसमुहातील अनेक कंपन्यांचे संचालक व चेअरमन पद त्यांनी भूषविले.
पुरस्कार
पद्मश्री-1992
संदर्भ व आभार-ऑक्टोबर 14 2020-आजचा दिनविशेष- october 14 2020-aajcha dinvishesh
Image by Brajeshwar Oinam from https://unsplash.com/
ऑक्टोबर 14 2020-आजचा दिनविशेष- october 14 2020-aajcha dinvisheshसंकल्पना,संकलन,संपादन
भालचंद्र माधव इनामदार
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
Please do not enter any spam link in comment.