13 ऑक्टोबर दिनविशेष-13 october dinvishesh-13-10-2020
13 ऑक्टोबर दिनविशेष-13 october dinvishesh-13-10-2020
13 ऑक्टोबर दिनविशेष-13 october dinvishesh-13-10-1884
लंडनमधील ग्रीनवीच गावाजवळून जाणाऱ्या रेखावृत्तास शून्य मानण्यास अंतरराष्ट्रीय समुदायाचा होकार
ग्रीनवीच मीन टाइम
पृथ्वीच्या उत्तर व दक्षिण ध्रुवामधील जी सरळ रेष जाते त्याचा मध्य बिंदू हा लंडनजवळील ग्रीनवीच गावाजवळील ज्या जुन्या रॉयल वेधशाळेजवळ येतो. हाच मध्यबिंदु शून्य मानून वेळ ठरविण्यास आंतरराष्ट्रीय मान्यता ही 13 ऑक्टोबर 1884 रोजी मिळाली. व ह्या ग्रीनवीच मीन टाइम प्रमाणे जगाची वेळ ठरवण्यिात येऊ लागली. उदा. भारताची प्रामाणवेळ ही +5.30 जीएमटी आहे याचाच अर्थ भारत हा ग्रीनवीच प्रमाणवेळेपासून साडेपाच तास पुढे आहे. ही प्रमाणवेळ युनायटेड किंग्डम मध्ये स्थानिक वेळ म्हणून पाळली जाते.
13 ऑक्टोबर दिनविशेष-13 october dinvishesh-13-10-1911
भगिनी निवेदिता यांचे निधन
अल्पपरिचय
काही विदेशी व्यक्तींचे भारतासाठी अतुलनिय योगदान राहीलेले आहे अशा मोजक्या विदेशी महिलांमध्ये भगिनी निवेदितांचा समावेश होतो. भगिनी निवेदिता उर्फ मार्गारेट एलिझाबेथ नोबेल ह्या सामाजिक कार्यकर्त्या, स्वामी विवेकानंदांच्या शिष्या व लेखिका होत्या. स्वामी विवेकानंदांच्या शिकागो येथील धर्मपरिषदेच्या भाषणातून प्रभावित होऊन त्या 1898 साली भारतात आल्य. मार्च 1898 मध्ये त्यांनी शिष्या म्हणून स्वामीजींकडून दिक्षा घेतली व त्या भगिनी निवेदिता या नावाने ओळखल्या जाऊ लागल्या. धर्मप्रसार व सामाजिक कार्यात प्रवेशकर्त्या झाल्या. 1902 मधील स्वामीजींच्या निर्वाणानंतर त्यांनी स्वत:ला कार्यात अधिकच झोकून दिले.
जन्म
28 ऑक्टोबर 1867 उत्तर आर्यलंड
मृत्यू
13 ऑक्टोबर 1911 सिलिगुडी ब्रिटीश इंडिया सध्या भारत.
कार्य
- स्वामी विवेकानंदांचे विचार,कार्य प्रत्येक भारतीयांपर्यत पोचविण्यासाठी आपले आयुष्य वेचले.
- आपल्या भगिनी निवेदिता प्रतिष्ठानमार्फत गरीब,असहाय,विधवा स्त्रीयांचे पुनर्वसन व स्वावलंबनाचे कार्य
- भारतीय स्वातंत्र्यलढ्यात अनेक क्रांतीकारकांना प्रेरणा व प्रोत्साहन
- अनेक ग्रंथांचे लेखन
- धर्म व स्वदेशी, सामाजिक सुधारणा याविषयांवर व्याख्यानांतून लोकप्रबोधन
पुस्तके
- Response in the Living and Non-Living- हा जगदिशचंद्र बसू यांचा ग्रंथ लेखन व संपादन
- Plant Response as a Means of Physiological Investigation
- Comparitive Electro-Psysiology
- Researches on Irritability of Plants हया दोन बासूंच्या पुस्तकांचेही सहलेखन
भगिनी निवेदिता यांचा जिवनप्रवास मांडणारी पुस्तके
- अग्निशिखा भगिनी निवेदिता (प्रा. प्रमोद डोरले)
- कर्मयोगिनी निवेदिता -डॉ सुरेश शास्त्री
- क्रांतीयोगिनी भगिनी निवेदिता - मृणालिनी गडकरी
- चिंतन भगिनी निवेदितांचे : कला आणि राष्ट्रविचार (अदिती जोगळेकर-हर्डीकर)
- चिंतन भगिनी निवेदितांचे : भारतीय मूल्यविचार (डॉ. सुरुची पांडे)
- चिंतन भगिनी निवेदितांचे : शिक्षणविचार (डॉ. स्वर्णलता भिशीकर)
- चिंतन भगिनी निवेदितांचे : स्वातंत्र्यलढा सहभाग आणि चिंतन (प्रा. मृणालिनी चितळे)
- भगिनी निवेदिता (म.ना. जोशी)
- भगिनी निवेदिता (सविता ओगीराल)
- भगिनी निवेदिता (सुरेखा महाजन)
- भगिनी निवेदिता - एक चिंतन (दिलीप कुलकर्णी, संध्या गुळवणी, चारुता पुराणिक)
- भगिनी निवेदिता यांचे स्वातंत्र्यसंग्रामातील योगदान (डाॅ. सुभाष वामन भावे, डाॅ' अश्विनी सोवनी)
- भारताच्या पाऊलखुणांवर ... -डॉ. सुरुचि पांडे
- विवेकानंद कन्या - भगिनी निवेदिता (वि.वि. पेंडसे)
- शतरूपे निवेदिता -अनुवादक - साने गुरुजी (डॉ. सुरुचि पांडे, डॉ.य.शं.लेले )
13 ऑक्टोबर दिनविशेष-13 october dinvishesh-13-10-1911
जेष्ठ अभिनेते अशोककुमार यांचा जन्म
अल्पपरिचयअशोककुमार गांगुली उर्फ दादामुनी हे हिंदी चित्रपटसृष्टीतील एक ऋषीतुल्य व्यक्तीमत्व. आपल्या बहारदार अभिनयाने 1936 पासून रसिकांच्या मनात अढळस्थान करणारे अशोककुमारजी आपल्या अनेक धीरगंभीर भूमिका व कसदार अभिनयामुळे सुपरिचित आहेत.
जन्म
13-10-1911 भागलपूर बिहार
मृत्यू
10-12-2001 मुंबई महाराष्ट्र
कार्य
चित्रपटांत अभिनय, निर्माता म्हणून
प्रसिध्द वित्रपट
अछूत कन्या
इज्जत
सावित्री
निर्मला
क़ानून
चलती का नाम गाड़ी
छोटी सी बात
मिली
ख़ूबसूरत
गुमराह
एक ही रास्ता
बंदिनी
ममता
पुरस्कार
- अनेक राष्ट्रीय फिल्म पुरस्कार
- पद्मविभूषण 1999
13 ऑक्टोबर दिनविशेष-13 october dinvishesh-13-10-1911
अभिनेते,गायक किशोरकुमार यांचे निधन
अल्पपरिचय
आपल्या दमदार आवाजाने रसिकांच्या मनाचा ठाव घेणारे गायक अशी ख्याती असणारे किशोर कुमार गांगुली उर्फ किशोरकुमारजी हे भारतीय चित्रपटसृष्टीला लाभलेले एक मौल्यवान रत्न होते, त्यांची अनेक गाणी जशी प्रसिध्द आहेत तसेच अभिनयासाठीही ते प्रसिध्द आहेत.
जन्म
04-08-1929 खांडवा मध्यप्रदेश
मृत्यू
13-10-1987 मुंबई महाराष्ट्र
कार्य
आपल्या उपजत गानप्रतिभेला स्वरांचे कोंदण लावणारे किशोरकुमार हे एक विलक्षण रसायन होते, त्यांची गाणी, अभिनय सारेच अफलातून असायचे.
काही प्रसिध्द चित्रपट-अभिनय
- पडोसन (1968)
- दूर गगन की छॉंव में (1964)
- गंगा की लहरें (1964)
- मिस्टर एक्स इन बॉंम्बे (1964)
- हाफ टिकट
- मनमौजी
- झुमरू
- चलती का नाम गाडी
- दिल्ली का ठग
- आशा
- न्यू दिल्ली
- बाप रे बाप
- मिस माला
- नौकरी
काही प्रसिध्द चित्रपट-गाणी
- मिस्टर इंडिया
- सागर
- शराबी
- अगर तुम ना होते
- सत्ते पे सत्ता
- नमक हलाल
- लावारिस
- रौकी
- याराना
- कर्ज़
- मुकद्दर का सिकंदर
- डॉन
- अनुरोध
- शोले
- खुशबू
- जुली
- आंधी
- मीली
काही प्रसिध्द गाणी
- रूप तेरा मस्ताना.....
- दिल ऐसा किसी ने......
- खैके पान बनारसवाला......
- हज़ार राहें मुडके देखीं......
- पग घुंघरू बॉंध......
- हमें और जीने की.....
- मंजिलें अपनी जगह....
- सागर किनारे.....
- एक चतुर नार.............मेहमुद व किशोरकुमार
संदर्भ व आभार-13 ऑक्टोबर दिनविशेष-13 october dinvishesh-13-10-2020
https://www.google.com/
https://bharatdiscovery.org/
https://www.wikipedia.org/
13 ऑक्टोबर दिनविशेष-13 october dinvishesh-13-10-2020
संकल्पना,संकलन,संपादन
भालचंद्र माधव इनामदार
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
Please do not enter any spam link in comment.