29 जुलै 2021-July 29
29 जुलै 2021-July 29
प्रसिध्द डच चित्रकार व्हिन्सेंट व्हॉन गॉग यांचे निधन. 29 जुलै 1890
अल्पपरिचय
व्हिन्सेंट व्हॉन गॉग हे जगप्रसिध्द डच चित्रकार होते. दि पोटॅटो इटर्स, दि स्टारी नाइट अशी त्यांची अनेक चित्रे
जगप्रसिध्द आहेत. व्हिन्सेंट व्हॉन गॉग यांच्याबद्दल अधिक वाचण्यासाठी
येथे भेट द्या.
बंगाली समाजसुधारक व विधवा पुर्नविवाहाच्या कायद्याचे प्रणेते इश्चरचंद विद्यासागर यांचे निधन.
29 जुलै 1891
अल्पपरिचय
इश्वरचंद्र विद्यासागर हे प्रसिध्द बंगाली समाजसुधारक होते. लेखक,शिक्षणतज्ञ म्हणूनही त्यांनी कार्य केले.
इंग्रज सरकारने संमत केलेल्या विधवा विवाह कायद्याचे प्रणेते म्हणून
ते संपूर्ण भारतात ओळखले जातात. हिंदू धर्मातील अनेक अनिष्ट रूढी
परंपरा यांना त्यांनी विरोध केला. इश्चरचंद्र विद्यासागर यांच्याविषयी
अधिक वाचण्यासाठी येथे भेट द्या.
प्रसिध्द उद्योगपती जे.आर.डी. टाटा यांचा जन्म. 29 जुलै
1904
अल्पपरिचय
भारताच्या औद्योगिक क्षेत्रातील आघाडीच्या टाटा उद्योगसमूहाचे संस्थापक,
अध्यक्ष म्हणजे जहाँगीर रतनजी ददाभॉय तथा जे.आर.डी. टाटा हे होत. भारतीय नागरी
विमान वाहतुकीचे जनक असणाऱ्या जे.आर.डी.
टाटा यांनी टाटा एअरलाईन्सची स्थापना करून नागरी विमान वाहतुकक्षेत्राचा
पाया रचला, याच टाटा एअरलाईन्सचे आजच्याच दिवशी 29 जुलै 1946 रोजी एअर इंडिया असे नामकरण करण्यात आले व
ती भारताची राष्ट्रीय विमान वाहतुक कंपनी बनविण्यात आली. जे.आर.डी. टाटा यांनी केलेल्या कार्याबद्दल
अधिक जाणून घेण्यासाठी येथे भेट द्या.
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा जन्म. 29 जुलै 1922
अल्पपरिचय
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे तथा बळवंत मोरेश्वर पुरंदरे हे प्रसिध्द मराठी लेखक,नाट्यनिर्माते आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित राजा
शिवछत्रपती हा ग्रंथाचे लेखन पुरंदरे यांनी केले आहे, तसेच छत्रपती
शिवाजी महाराजांच्या जीवनाचे नाट्यरूपांतर असणारे 'जाणता राजा' याचे निर्मिती त्यांनी केली आहे.
जन्म
29 जुलै 1922 पुणे, ब्रिटीश भारत सध्या पुणे, महाराष्ट्र, भारत
कार्य
छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्राचे अस्मिता,स्वाभिमान,धर्माभिमान व पराक्रमाचे प्रतिक आशा इतिहासप्रसिध्द
व्यक्तीमत्वाचा सर्वांगीण सुंदर जीवनपट जाणता राजा या नाट्यात उतरविणारे बाबासाहेब पुरंदरे
हे प्रसिध्द लेखक व नाट्यनिर्माते आहेत. महाराष्ट्रासहीत दिल्ली,आग्रा व सातासमुद्रपार अमेरिकेतही जाणता राजा या नाट्याचे हजारहून अधिक नाट्यप्रयोग
झाले आहेत. राजा शिवछत्रपती या ग्रंथातही त्यांनी छत्रपती शिवाजी
महाराजांचे जीवनदर्शन आपल्या लेखणीतून सुंदररित्या रेखाटले आहे, या सर्व कार्यामुळे व छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जनसामान्यांपर्यंत
पोचविल्यामुळे शिवशाहीर असे नामामिधान पुरंदरे यांना लाभले आहे. छत्रपती शिवाजी
महाराज यांच्याबरोबरच पेशवेकालीन इतिहासावरही पुरंदरे यांनी आपली छाप सोडली आहे.
प्रसिध्द पुस्तके/ग्रंथ
- राजा शिवछत्रपती पूर्वार्ध व उत्तरार्ध
- शिलांगणाचे सोन
- पुरंदर
- राजगड
- प्रतापगड
- पुरंदरच्या बुरूजावरून
- सिंहगड
- शेलारखिंड
छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवनदर्शन-नाट्यरूपांतर
- 'जाणता राजा'
पुरस्कार
पद्मविभूषण
महाराष्ट्र भूषण
कालीदास सन्मान
स्वातंत्र्यसेनानी व समाजसेविका अरूणा असफ अली यांचे निधन. 29 जुलै 1996
अल्पपरिचय
अरूणा असफ अली ह्या प्रसिध्द भारतीय स्वातंत्र्यसेनानी व
समाजसेविका होत्या. 1942 च्या भारत छोडो अंदोलनात ऑगस्ट क्रांतीदिनी
म्हणजेच 09 ऑगस्ट 1942 ला गोवालिया टँक
मैदान मुंबई येथे त्यांनी तिरंगा फडकावून या अंदोलनाची दखल इंग्रज सरकारला घेण्यास
भाग पाडले. अरूणा असफ अली यांच्या विषयी अधिक माहिती जाणून घेण्याकरता
येथे भेट द्या.
प्रसिध्द संगीतकार सुधीर फडके यांचे निधन. 29 जुलै 2002
अल्पपरिचय
सुधीर फडके हे प्रसिध्द मराठी संगीतकार व गायक होते. बाबूजी या टोपणनावाने विख्यात असणाऱ्या सुधीर फडके यांनी अनेक मराठी,हिंदी चित्रपट,ध्वनीफिती यांना आपल्या बहारदार संगीताने
संगीतबध्द केले. ग.दि. माडगुळकरांच्या प्रसिध्द गीतरामायणालाही त्यांनीच संगीतबध्द केले आहे.
बाबूजींनी संगीत क्षेत्राबरोबरच सामाजिक क्षेत्रातही कार्य केले,
संयुक्त महाराष्ट्र अंदोलनात त्यांनी सक्रीय सहभाग घेऊन महाराष्ट्राच्या
निर्मितीत आपले मोलाचे योगदान दिले. सुधीर फडके यांच्याविषयी
अधिक जाणून घेण्यासाठी येथे भेट द्या.
संदर्भ व आभार
संकल्पना,संकलन व संपादन
भालचंद्र माधव इनामदार
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
Please do not enter any spam link in comment.