25 जुलै 2021-जागतिक पालक दिवस-Global Parents Day
25 जुलै 2021-जागतिक पालक दिवस-Global Parents Day
Global Parents Day-जागतिक पालक दिवस 25 जुलै 2021
ग्लोबल पॅरेन्ट्स डे अर्थात जागतिक पालक दिवस हा जागतिक स्तरावर
पालकांनी मुलांप्रती केलेल्या त्यागाबद्दल,निस्वार्थी प्रेमाबद्दल
तसेच त्यांनी प्रभावीपणे केलेल्या कर्तव्य निर्वाहाबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी साजरा
केला जातो. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या आमसभेने 2012 साली या दिवसाची घोषणा केली. हा दिवस जगाच्या विविध देशात
वेगवेगळ्या दिवशी साजरा केला जातो जसे की अमेरिकेत जुलै महिन्यातील चौथा रविवार,दक्षिण कोरीयात आठ मे रोजी. भारतातही अमेरिकेप्रमाणेच
जुलैच्या चौथ्या रविवारी हा दिवस साजरा केला जातो त्यामुळे आज 25 जुलै रोजी हा दिवस पूर्ण देशभरात साजरा केला जात आहे. यावर्षी या दिवसाचा विषय आहे. “Appreciate
all parents throughout the world” म्हणजेच "जगभरातील सर्व पालकांचे कौतुक करा''.
पुणे सार्वजनिक सभेचे संस्थापक,समाजसुधारक गणेश जोशी तथा सार्वजनिक काका यांचे निधन.
25 जुलै 1880
अल्पपरिचय
गणेश वासुदेव जोशी तथा सार्वजनिक काका हे पुणे सार्वजनिक
सभेचे संस्थापक,समाजसुधारक होते. राष्ट्रवादाचा
व स्वदेशीचा त्यांनी कायम पुरस्कार केला. सार्वजनिक सभेच्या माध्यमातून
दुष्काळनिवारण,समाजसेवा,गोरगरिबांना मदत
इत्यादी कार्ये केली. काकांच्याबद्दल अधिक माहितीसाठी येथे भेट
द्या.
प्रसिध्द गायक व संगीतकार सुधीर फडके यांचा जन्म. 25 जुलै 1919
अल्पपरिचय
सुधीर फडके तथा बाबूजी हे प्रसिध्द संगीतकार,गायक होते. मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिध्द व्यक्तीमत्व
असणारे सुधीरजी हे बाबूजी या नावाने चित्रपटसृष्टीत प्रसिध्द होते. मराठी, हिंदी चित्रपट, नाटके यांमध्ये
त्यांनी अजोड असे संगीतकार्य केले.
जन्म
25 जुलै 1919 कोल्हापूर, कोल्हापूर संस्थान, ब्रिटीश भारत
मृत्यू
29 जुलै 2002 मुंबई, महाराष्ट्र, भारत
शिक्षण
वामनराव पाध्ये यांच्याकडून हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत
शिक्षण
कार्य
प्रसिध्द मराठी गायक,संगीतकार
बाबूजींनी आपल्या कारर्किदीची सुरूवात एचएमव्ही संगीत कंपनीपासून
केली.
पुढे त्यांनी संगीत दिग्दर्शक म्हणून प्रभात फिल्म्स मध्ये पाऊल ठेवले
व तेथूनच त्यांच्या चित्रपट संगीत कारर्किदीची सुरूवात झाली. तब्बल पाच दशकांच्या संगीत करार्किदीत बाबूजींनी अनेक चित्रपटांना,नाटकांना व इतर अनेक आजरामर गीतांना संगीतबध्द केले.
ग.दि. माडगूळकरांच्या
गीतरामायणातील संपूर्ण म्हणजेच 56 गीतांना बाबूजींनी चाल व संगीत
दिले. अनेक गायकांकडून गाऊन घेतलेले गीतरामायण बाबूजींनी आपल्या
आवाजातही स्वरबध्द केले आहे. आकाशवाणीवर या गीतरामायणाचे बाबूजींच्या
आवाजात प्रसारण होत असे. आजही याचे रंगमंचावरील प्रयोग गर्दी
खेचतात.
प्रसिध्द चित्रपट-संगीत
- गोकूळ
- रूक्मिणी स्वयंवर
- आगे बढो
- शेवग्याच्या शेंगा
- जगाच्या पाठीवर
- संत गोरा कुंभार
- एकटी
- आम्ही जातो आमच्या गावा
- मुंबईचा जावई
- अनोळखी
- हा माझा मार्ग एकला
- जोतिबाचा नवस
- थोरली जाऊ
- धाकटी सून
- शेर शिवाजी
- वीर सावरकर
बाबूजींचा स्वातंत्र्यलढ्यात व संयुक्त महाराष्ट्र अंदोलनात
सहभाग होता, त्यावेळी अनेकांना त्यांनी मदतही केली होती.
पुरस्कार
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
संगीत नाटक अकादमी पुरस्कार
सह्याद्री स्वररत्न पुरस्कार
कवी व संगीतकार वसंत बापट यांचा जन्म. 25 जुलै 1922
अल्पपरिचय
विश्वनाथ वामन बापट तथा वसंत बापट हे मराठी कवी व संगीतकार
होते.
जन्म
25 जुलै 1922 कऱ्हाड, सातारा संस्थान, ब्रिटीश भारत
मृत्यू
17 सप्टेंबर 2002 पुणे, महाराष्ट्र, भारत
शिक्षण
एम.ए. स.प. महाविद्यालय, पुणे
कार्य
1942 च्या चले जाव अंदोलनात सहभाग व त्यासाठी तीन वर्षे
कारावास
नॅशनल कॉलेज व रामनारायण कॉलेज, मुंबई येथे प्राध्यापक म्हणून कार्य 1974 साली मुंबई
विद्यापीठाच्या टागोर अध्यासनाचे ते सदस्य झाले.
दिल्लीच्या साहित्य अकादमीचे सदस्य
साधना मासिकाचे संपादक
प्रसिध्द साहित्य
- बिजली-काव्यसंग्रह
- अकरावी दिशा-काव्यसंग्रह
- सेतु- काव्यसंग्रह
- सकीना- काव्यसंग्रह
- मानसी-काव्यसंग्रह
- बारा गावचे पाणी-प्रवासवर्णन
- बालगोविंद-बालनाट्य
- अबडक तबडक-बालकाव्यसंग्रह
- चंगा मंगा-बालकाव्यसंग्रह
- मेघह्रद्य-कालिदासाचे मेघदूत
पुरस्कार
बालगोविंद नाटकास महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट बालनाट्य पुरस्कार
भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचा
शपथविधी.
25 जुलै 2007
भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती तसेच 12 व्या राष्ट्रपती म्हणून काँग्रेसच्या जेष्ठ नेत्या प्रतिभाताई देवीसिंह पाटील यांची
निवड करण्यात आली. 25 जुलै 2007 रोजी त्यांनी
राष्ट्रपतीपदाची शपथ घेतली. प्रतिभाताई पाटील या 25 जुलै 2007 पासून 25 जुलै
2012 पूर्णवेळ या पदावर कार्यरत होत्या. प्रतिभाताईंविषयी
अधिक जाणून घेण्यासाठी येथे भेट द्या.
संदर्भ व आभार
https://vishwakosh.marathi.gov.in/
https://internationaleventday.com/event/global-day-of-parents/
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
Please do not enter any spam link in comment.