जुलै 16 2021 - 16 July
जुलै 16 2021 - 16 July
स्वातंत्र्यसेनानी अरूणा असफ अली यांचा जन्म. 16 जुलै 1909
अरूणा असफ अली ह्या भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील प्रमुख स्वातंत्र्यसेनानी
होत्या. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील मोजक्या स्त्री स्वातंत्र्यसेनानींमध्ये त्यांचे
नाव आदराने घेतले जाते. 1942 च्या भारत छोडो अंदोलनात त्यांची भूमिका महत्वपूर्ण होती.
अरूणा असफ अली यांना मरणोत्तर भारतरत्न या भारताच्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित
करण्यात आले.
जन्म
16 जुलै 1909 कालका, पंजाब, ब्रिटीश भारत
मृत्यू
29 जुलै 1996 नवी दिल्ली, भारत
शिक्षण
शालेय शिक्षण:सेक्रेड हर्ट कॉन्हेंट स्कूल, लाहोर
महाविद्यालयीन शिक्षण: ऑल सेंट्स कॉलेज, नैनीताल
कार्य
गोखले मेमोरियल स्कूल कलकत्ता येथे शिक्षिका म्हणून कार्य
प्रसिध्द स्वातंत्र्यसेनानी व समाजवादी राजकारणी
भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेताना त्यांनी 1942 चे भारत छोडो अंदोलनात
महत्वाचा सहभाग घेतला व मुंबईतील गोवालिया टँक मैदानावर त्यांनी पोलिसांच्या गोळीबाराची
पर्वा न करता तिरंगा फडकविला व या अंदोलनाची
तीव्रता दर्शवली., यांमुळेच त्यांना ग्रँड ओल्ड लेडी असे नामामिधान त्यांनी गाजवलेल्या
या शौर्याने प्राप्त झाले.
स्वातंत्र्यानंतर त्या दिल्ली महापालिकेच्या पहिल्या महापौर बनल्या.
एदाता नारायणन यांच्यासोबत त्यांनी लिंक पब्लिशिंग हाउसची स्थापना केली
व पेट्रीऑट वृत्तपत्र व साप्ताहिक लिंक सुरू केले हे खूपच प्रसिध्द झाले कारण जवाहरलाल
नेहरू,कृष्ण मेनन, बिजू पटनायक यांमध्ये लिखाण करायचे.
पुरस्कार
अंतरराष्ट्रीय लेनिन शांतता पुरस्कार- 1964
जवाहरलाल नेहरू पुरस्कार -1991
पद्मविभूषण पुरस्कार-1992
भारतरत्न पुरस्कार-मरणोत्तर-1997
ज्योर्तिमठाचे शंकराचार्य स्वामी शांतानंद सरस्वती यांचा जन्म. 16 जुलै 1913
अल्पपरिचय
अद्वैत वेदांताचा पाश्चिमात्य देशात पुरस्कार करणारे स्वामी शांतानंद
सरस्वती हे शंकराचार्य ब्रह्मनंद सरस्वती यांचे शिष्य व ज्योर्तिमठाचे शंकराचार्य होते. स्वामी शांतानंद
सरस्वती यांच्याबद्दल अधिक माहितीकरता येथे भेट द्या.
साहित्यिक वामनराव कृष्ण चोरघडे यांचा जन्म. 16 जुलै 1914
अल्पपरिचय
वामनराव उर्फ बापूसाहेब कृष्ण चोरघडे तथा वा. कृ. चोरघडे हे प्रसिध्द
साहित्यिक होते. साहित्यासोबतच ते स्वातंत्र्यसैनिक व विचारवंत देखील होते.
जन्म
16 जुलै 1914 नारखेड, नागपूर, ब्रिटीश भारत
मृत्यू
01 डिसेंबर 1995
शिक्षण
मराठी व अर्थशास्त्रात बी.टी. व एम.ए. पदवी
कार्य
वर्धा येथील जी.एस.कॉलेज ऑफ कॉमर्स
ॲन्ड इकॉनॉमिक्स मध्ये प्राध्यापक याच संस्थेच्या नागपूर येथील महाविद्यालयात सुरूवातीला
उपप्राचार्य व नंतर 1974 पर्यंत प्राचार्य म्हणून कार्य
प्रसिध्द साहित्यिक व स्वातंत्र्यसैनिक
1942 च्या भारत छोडो अंदोलनात गांधीजींच्या प्रेरणेने सहभाग व कारावासही
त्यांनी भोगला.
वामनराव चोरघडे यांनी महाराष्ट्र विद्यापीठ ग्रंथनिर्मिती मंडळ मध्ये
संचालक तसेच नागपूर विद्यापीठाच्या विद्यासभा व कार्यकारणी तसेच 20 हून अधिक समित्यांवर
सदस्य म्हणून काम पाहिले.
वामराव चोरघडे यांनी लघुकथा,लोककथा,बालवाङमय, चरित्र तसेच अनुवाद आदी
साहित्यप्रकारात लेखन व संपादन केले आहे. पारिजात,प्रतिभा,सत्यकथा,जोस्ना,कला
इत्यादी नियतकालिके तसेच मासिकांतून त्यांच्या कथा प्रसिध्द झाल्या आहेत.
साहित्य
कथासंग्रह
- सुषमा
- हवन
- यौवन
- प्रस्थान
- पाथेय
- संस्कार
- प्रदीप
- ओंजळ
- मजल
- बेला
- ख्याल
- चोरघडे यांची कथा
- संपूर्ण चोरघडे
लोकसाहित्य
- साहित्याचे मूलधन
- चंपाराणी
- प्रभावती
- भाग्यवती
इतर
- अहिंसेची साधना-अनुवाद
- अहिंसेचे विवेचन-अनुवाद
- काका कालेलकर,सानेगुरूजी,नरकेसरी अभ्यंकर इ. चरित्रे
पुरस्कार व सन्मान
प्रदीप व पाथेय या कथांना मध्यप्रदेश साहित्यपरिषदेचे पारितोषिक-1954-1955
चोरघडे यांची कथा या कथासंग्रहास महाराष्ट्र शासनाचे पारितोषिक-1961-1962
चंद्रपूरच्या 1979 च्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष
विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष
इतिहासकार वा. सी. बेन्द्रे यांचे निधन. 16 जुलै 1986
अल्पपरिचय
वासुदेव सीताराम बेंद्रे हे प्रसिध्द इतिहासकार व लेखक होते.
जन्म
13 फेब्रुवारी 1894 बॉम्बे, ब्रिटीश भारत
मृत्यू
16 जुलै 1986
कार्य
लघुलेखक म्हणून ब्रिटीश प्रशासनात शिक्षण संचालकांच्या कार्यालयात कार्य
प्रसिध्द इतिहासकार, संशोधक व लेखक
भारत इतिहास संशोधन मंडळात इतिहाससंशोधक म्हणून कार्य
पेशवे दफ्तर,इंग्लंडमधील इंडिया हाउस व ब्रिटीश म्युझियममध्ये इतिहाससंशोधन
मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या इतिहाससंशोधन मंडळाचे संचालक
महाराष्ट्र इतिहास परिषदेचे प्रमुख कार्यवाह
साहित्य
- साधन चिकित्सा
- छत्रपती संभाजी महाराज-
- श्रीछत्रपती शिवाजी महाराज
- देहूदर्शन
- तुकाराम महाराजांचे संतसागाती
- तुकाराम महाराजांची गुरूपरंपरा
- संत तुकाराम
- गोवळकोंड्याची कुतुबशाही
- अ स्टडी ऑफ मुस्लिम इनक्रिप्शन्स
- महाराष्ट्र ऑफ दि शिवाजी पिरिअड
- तारिख इ इलाही
- राजाराम चरितम्
संदर्भ व आभार
https://vishwakosh.marathi.gov.in/
संकल्पना,संकलन व संपादन
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
Please do not enter any spam link in comment.