23 नोव्हेंबर 2021- November 23
23 नोव्हेंबर 2021- November 23
लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडचे संस्थापक व क्रिकेटपटू थॉमस लॉर्ड यांचा जन्म.
23 नोव्हेंबर 1755
अल्पपरिचय
थॉमस लॉर्ड हे प्रसिध्द इंग्लीश क्रिकेटपटू होते. मेरिलबोर्न क्रिकेट क्लब तसेच मिडलसेक्स साठी क्रिकेट खेळणाऱ्या थॉमस लॉर्ड
हे आपल्या गोलंदाजीसाठी प्रसिध्द होते. क्रिकेटची पंढरी मानल्या
जाणाऱ्या लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडची त्यांनी स्थापना केली. क्रिकेटचे
नियम बनविणाऱ्या मेरिलबोर्न क्रिकेट क्लबचेही ते एक संस्थापक होते. थॉमस लॉर्ड यांच्याविषयी अधिक माहितीकरता येथे भेट द्या.
प्रसिध्द अभिनेत्री व गायिका गीता दत्त यांचा जन्म. 23 नोव्हेंबर 1930
अल्पपरिचय
गीता दत्त ह्या प्रसिध्द भारतीय अभिनेत्री व गायिका होत्या. अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक गुरूदत्त
यांच्या त्या पत्नी होत्या. बाजी, प्यासा,
कागज के फूल, आर पार आशा अनेक चित्रपटांतील त्यांची
गाणी प्रचंड गाजली, जसे की थंडी हवा....काली घटा.....,बाबूजी धीरे चलना.....इत्यादी. गीता दत्त यांच्याविषयी अधिक माहितीसाठी येथे
भेट द्या.
सुप्रसिध्द भारतीय जीवशास्त्रज्ञ जगदिशचंद्र बोस यांचे निधन. 23 नोव्हेंबर 1937
अल्पपरिचय
जगदिशचंद्र बोस हे सुप्रसिध्द भारतीय जीवशास्त्रज्ञ, वनस्पतीशास्त्रज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ होते. वनस्पतींमधील प्रतिक्षिप्त क्रियांवर संशोधन करून वनस्पतींनाही संवेदना असतात
हे त्यांनी सप्रमाण सिध्द केले. रेडिओ संदेशवहनाचे अनेक प्रयोग
करणाऱ्या बोस यांनी बॅटरी निर्मितीही केली होती. जगदिशचंद्र बोस
यांच्याविषयी अधिक माहितीकरता येथे भेट द्या.
कोकोज आयलँड्स या बेटांचा ताबा ऑस्ट्रेलियास मिळाला. 23 नोव्हेंबर 1955
कोकोज आयलँड्स
कोकोज आयलंड्स किंवा किलिंग आयलंड्स हा ऑस्ट्रेलियाचा बेटसमूह आहे. हिंदी महासागरात ऑस्ट्रेलिया व
श्रीलंकेच्या मध्ये इंडोनेशियन सुमात्रा बेटाजवळ हा बेटसमूह आहे. 23 नोव्हेंबर 1955 रोजी ऑस्ट्रेलियास या बेटांचा ताबा मिळाला.
राज्य: कोकोज आयलँड्स, ऑस्ट्रेलिया
राजधानी: वेस्ट आयलँड
बोलीभाषा: मलाय, इंग्लीश
चलन: ऑस्ट्रेलियन डॉलर
नटवर्य चिंतामणराव कोल्हटकर यांचे निधन. 23 नोव्हेंबर 1959
अल्पपरिचय
चिंतामणराव कोल्हटकर हे नाटककार, दिग्दर्शक तसेच नाट्यनिर्माते होते. महाराष्ट्र नाटक
मंडळी, किर्लोस्कर नाटक मंडळी, भरत नाटक
मंडळी, बळवंत नाटक मंडळी तसेच चिंतामणरवांनी स्वत: स्थापन केलेली ललित कलाकुंज नाट्यसंस्थांव्दारे त्यांनी विविध नाटकांमध्ये
अभिनय, दिग्दर्शन, निर्मिती केली,
त्यामध्ये मानापमान, भावबंधन, राजसंन्यास, संशयकल्लोळ अशा प्रसिध्द नाटकांचा समावेश
होतो. चिंतामणराव कोल्हटकर यांच्याविषयी अधिक माहितीकरता येथे
भेट द्या.
दक्षिण अफ्रिकेचे क्रिकेटपटू गॅरी कर्स्टन यांचा जन्म. 23 नोव्हेंबर 1967
अल्पपरिचय
गॅरी कर्स्टन हे दक्षिण अफ्रिकेचे माजी क्रिकेटपटू, फलंदाज तसेच प्रसिध्द प्रशिक्षक आहेत. भारताचे मुख्य
प्रशिक्षक म्हणून कर्स्टन हे प्रसिध्द होते कारण त्यांच्याच मार्गदर्शनाखाली भारताने
2001 साली एकदिवसीय विश्चचषक जिंकण्याचा पराक्रम केला. भारताच्या कसोटी, एकदिवसीय व ट्वेंटी-20 या तिनही क्रिकेटप्रकारातील यशाचे बरेचसे श्रेय गॅरी कर्स्टन यांच्या दूरदृष्टीने
घेतलेल्या निर्णयांना व मार्गदर्शनाला जाते. गॅरी कर्स्टन यांच्याविषयी
अधिक माहितीसाठी येथे भेट द्या.
संदर्भ व
आभार
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
Please do not enter any spam link in comment.