12 मार्च 2021-12 March

 

12 मार्च 2021-12-March

नटवर्य चिंतामणराव कोल्हटकर यांचा जन्म. 12 मार्च 1891

अल्पपरिचय

चिंतामणराव गणेश कोल्हटकर हे मराठी नाटक नाट्यनिर्माते,अभिनेते  होते.

जन्म

12 मार्च 1891 नेवरे, रत्नागिरी,ब्रिटीश भारत

मृत्यू

23 नोव्हेंबर 1959

कार्य

मराठी नाट्यसृष्टीतील प्रसिध्द नाटककार,दिग्दर्शक व नाट्यनिर्माते

चिंतामणरावांनी आपल्या कारर्किदीची सुरवात महाराष्ट्र नाटक मंडळींपासून केली, पुढे भरत नाटक मंडळी, किर्लोस्कर नाटक मंडळी दिनानाथ मंगेशकर यांच्या साथीत स्थापन केलेल्या बळवंत संगीत नाटक मंडळी यामध्ये त्यांनी कार्य केले.

काहीकाळ चित्रपटांकडे वळलेल्या चिंतामणरावांनी वसंतसेना चित्रपटांत शकराची भूमिका गाजवली. चित्रपटांत बळवंत पिक्चर्स असे बळवंत संगीत नाटक मंडळीचे नामकरण करून त्यांनी चित्रपटांचे निर्माण चालू केले पण यामध्ये त्यांना अपयश आल्यामुळे ते परत नाटकांकडे वळले व राजाराम संगीत मंडळीतून त्यांनी रंगभूमीवर पदार्पण केले याचसोबत रांगणेकरांच्या नाट्यनिकेतनमध्येही ते काही काळ रूळले व नंतर त्यांनी स्वत:ची नाट्यसंस्था स्थापन केली.

ललित कलाकुंज नावाची नाट्यसंस्था स्थापन करून त्यांनी पु.ल. देशपांडे,विश्राम बेडेकर,चंद्रकांत गोखले,वसंत शिंदे,शांता जोग अशा शिष्यांना त्यांनी मार्गदर्शन केले,‍ या कोल्हटकारांच्या शिष्यांनी त्यांचे नाव नाट्यक्षेत्रात उज्वल केले.

पुरस्कार

राष्ट्रपती सुवर्णपदक

प्रसिध्द नाटके

  • तुकाराम
  • आंधळ्यांची शाळा
  • आशिर्वाद
  • एकच प्याला
  • कमला
  • पुण्यप्रभाव
  • भावबंधन
  • मनापमान
  • रणदुदुंभी
  • संशयकल्लोळ
  • हॅम्लेट
  • राजसंन्यास

भारताचे माजी उपपंतप्रधान, माजी संरक्षणमंत्री व महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव बळवंतराव चव्हाण यांचा जन्म. 

12 मार्च 1913

अल्पपरिचय

यशवंतराव बळवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री,भारताचे माजी संरक्षणमंत्री व उपपंतप्रधान होते. महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून त्यांना ओळखले जाते. यशवंतराव चव्हाण यांच्याविषयी अधिक माहितीसाठी येथे भेट द्या.

दांडी यात्रेला सुरवात. 12 मार्च 1930

    दांडी यात्रा व मिठाचा सत्याग्रह यांचा भारतीय स्वातंत्र्यलढ्यात खूप महत्वाचा भाग आहे. इंग्रज सरकारने जीवनावश्यक असणाऱ्या मिठावर कर लावून त्यांच्या उत्पादनास व विक्रीस प्रतिबंध घातला, त्याविरूध्द महात्मा गांधी यांनी सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू केली. 12 मार्च 1930 ला आताच्या गुजरातमधील साबरमती आश्रमापासून सुरू झाली व तब्बल 385 किलोमीटर अंतर पायी चालून 06 एप्रिल 1930 ला दांडी येथे संपली. गांधीजींबरोबर या यात्रेत अनेक नेते जसे की सरोजिनी नायडू,इला भट सहभागी होते. दांडी येथील समुद्रकिनारी यात्रा पोहोचताच गांधीजींनी मिठ उचलून कायदेभंग केला. हाच तो मिठाचा सत्याग्रह म्हणून प्रसिध्द झाला. या यात्रेदरम्यान मिळालेल्या लोकांच्या पाठिंब्याने इंग्रज सरकारसहीत जगाचे लक्ष भारतीय स्वातंत्र्यलढ्याकडे आकृष्ट झाले. शेवटी म. गांधी व तेव्हाचे भारताचे व्हाइसरॉय लॉर्ड आयर्विन यांच्यात करार झाला व त्याअन्वये ही सविनय कायदेभंगाची चळवळ स्थगित करण्यात आली.

र्मन अभियंते उद्योजक रॉबर्ट बॉश यांचे निधन. 12 मार्च 1942

अल्पपरिचय

रॉबर्ट बॉश हे जर्मन अभियंते,शोधक,उद्योजक व रॉबर्ट बॉश जिएमबीएच या बहुराष्ट्रीय कंपनीचे संस्थापक अध्यक्ष होते.

जन्म

23 सप्टेंबर 1861 अल्बेक, किंग्डम ऑफ वृटेमबर्ग, जर्मन कॉन्फरडेशन

मृत्यू

12 मार्च 1942 स्टुटगार्ट, जर्मनी

शिक्षण

प्रिसिजन मॅकॅनिक

कार्य

सुरवातीला बॉश यांनी अनेक जर्मन कंपन्यांसाठी कार्य केले, त्यानंतर अमेरिकेत थॉमस एडिसन यांच्यासाठी कार्य केले तर इंग्लंडमध्ये सिमेन्स या जर्मन कंपनीमध्ये कार्य केले.

15 नोव्हेंबर 1886 साली बॉश यांनी स्टुटगार्ट येथे प्रिसिजन मॅकॅनिक्स साठी स्वत:चे वर्कशॉप  स्थापन केले, ज्या कंपनीचे पुढे रॉबर्ट बॉश जीएमबीएच अर्थात बॉश या बहुराष्ट्रीय कंपनीत रूपांतर झाले.

बॉश यांनी लावलेले शोध

मॅग्नेटिक इग्निशन तंत्रज्ञानामुळे ॲटोबाईल क्षेत्रात क्रांती झाली. तसेच त्यांनी नंतर शोधलेल्या डिझेल प्युएल इग्निशन तंत्रज्ञानामुळे डिझेल इंजिनची कार्यक्षमता वाढली.

जर्मनीत कंपन्यांसाठी कामाचे तास आठ करणारे ते पहिले उद्योगपती होते. कामगारांसाठी त्यांनी अनेक सोयीसुविधा व कल्याणाची कार्ये केली.

पुरस्कार

हिटलरने बॉश यांना पायोनिअर ऑफ लेबर पुरस्कार देऊन गौरविले, ते त्यांनी केलेल्या कामगार भरतीमुळे व कामगारांसाठी केलेल्या मानवतावादी कार्यामुळे.

बॉश यांचा समावेश ऑटोमोबाईल हॉल ऑफ फेममध्ये 1984 साली करण्यात आला.

मुंबई शहर 12 मोठ्या बॉम्बस्फोटांनी हादरले. 12 मार्च 1993

मुंबईतील 1993 चे बॉम्बस्फोट

    महाराष्ट्राची राजधानी मुंबई सतत चालणारी,  गजबजलेली सदैव कार्यमग्न असणारी मुंबई 12 मार्च 1993 या दिवशी झालेल्या एकूण 12 बॉम्बस्फोटांनी हादरली. सुमारे 257 हून अधिक जणांचे प्राण घेणारे हे बॉम्बस्फोट मुंबईत झाले व अवघा भारतदेश सुन्न झाला. आज 28 वर्षानंतरही या धमाक्यांचा आवाज पिडीतांच्या कानात ऐकू येतो आहे. दुपारी 1.28 ला सुरू झालेले हे विस्फोटांचे सत्र तीन वाजून चाळीस मिनिटांनी झालेल्या 12 व्या बॉम्बस्फोटाने थांबले. व सुरू झाला मृत्यूचा व अक्रोशाचा खेळ, या बॉम्बस्फोटांनी मुंबईला काही काळ शांत बसविले परंतू त्यानंतर ती चालत राहिली दु:खाच्या संवेदना जपत, दु:ख विसरून नव्या उमेदीने पुन्हा कार्यमग्न झाली. या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या वीर जवान व पिडीतांना भावपूर्ण श्रध्दांजली.

दु.1.28 ला पहिला बॉम्बस्फोट बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजच्या तळघरात झाला.

बरोबर 47 मिनिटांनी मुंबईच्या मंडईत दुसरा धमाका झाला.

दुपारी ठीक अडीच वाजता शिवसेना भवनाजवळील पेट्रोलपंपाजवळ तिसरा बॉम्बस्फोट झाला.

अडीच वाजून तीन मिनिटांनी एअर इंडियाच्या ऑफिसच्या बाहेर चौथा धमाका झाला.

दुपारी 2 वाजून 45 मिनिटांनी पाचवा व सहावा बॉम्बस्फोट माहिम व वरळी येथे झाला.

मुंबईच्या जव्हेरी बाजार येथे तीन वाजता सातवा बॉम्बस्फोट झाला.

आठवा बॉम्बस्फोट वांद्रे येथे 3 वाजून दहा मिनिटांनी  झाला.

ववा बॉम्बस्फोट फ्लाझा  सिनेमा जवळ तीन वाजून बारा मिनिटांनी झाला.

बरोबर तीन वाजून वीस मिनिटांनी जुहू येथे दहावा बॉम्बस्फोट झाला.

साडेतीन वाजता सहारा विमानतळाजवळ अकरावा बॉम्बस्फोट झाला तर बारावा धमाका विमानतळाजवळ  झाला.

या बॉम्बस्फोटांतील अनेक अरोपींना नंतर अटक केली गेली काहींना शिक्षा सुनावली गेली तर काही अजूनही शिक्षेबाहेर आहेत.

संदर्भ व आभार

https://www.google.com/

https://www.wikipedia.org/

https://www.bbc.com/

संकल्पना,संपादन व संकलन

भालचंद्र माधव इनामदार

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

13 ऑक्टोबर दिनविशेष-13 october dinvishesh-13-10-2020

ऑक्टोबर 14 2020-आजचा दिनविशेष- october 14 2020-aajcha dinvishesh

ऑक्टोबर 18 2020-October 18 2020