नाेव्हेंबर 23 2020

 

नाेव्हेंबर 23 2020  

लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंडचे संस्थापक थॉमस लॉर्ड्स यांचा जन्म.23-11-1755

अल्पपरिचय

थॉमस लॉर्ड हे इंग्लीश व्यवसायिक क्रिकेटपटू होते. ते गोलंदाज होते. प्रामुख्याने ते मिडलसेक तसेच एमसीसी अर्थात मेरिलबोर्न क्रिकेट क्लबसाठी क्रिकेट खेळले. जगातील सर्वांत प्रतिष्ठित अशा लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंडचे संस्थापक व मेरिलबोर्न क्रिकेट क्लबच्या संस्थापकांपैकी एक होते.


जन्म

23-11-1755 थ्रिस्क,इंग्लंड

मृत्यू

13-11-1832 वेस्ट मेऑन,इंग्लंड

कार्य

  • इंग्लंडसाठी प्रथमश्रेणी क्रिकेट-1787 ते 1802
  • लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंड व मेरिलबोर्न क्रिकेट क्लबचे संस्थापक
  • इंग्लंडसाठी प्रथमश्रेणी खेळताना त्यांनी 59 सामने खेळले, ज्यामध्ये 148 बळींचे योगदान दिले व 899 धावा जमविल्या.


लेखक नागनाथ संतराम तथा ना.सं. इनामदार यांचा जन्म. 23-11-1923

अल्पपरिचय

ना.सं. इनामदार तथा नागनाथ संतराम इनामदार हे मराठीतील प्रसिध्द लेखक होते. झेप,राऊ या त्यांच्या कादंबऱ्या खूप प्रसिध्द आहेत. यांच्याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी येथे भेट द्या.

अभिनेत्री व गायिका गीता दत्त यांचा जन्म. 23-11-1930

अल्पपरिचय

गीता घोष रॉय-चौधरी तथा गीता दत्त ह्या प्रसिध्द पार्श्वगायिका तसेच अभिनेत्री होत्या. त्यांची बाजी,प्यासा,सुजाता,कागज के फूल अशा अनेक चित्रपटांतील गाणी गाजली. दिग्दर्शक अभिनेता गुरूदत्त यांच्या त्या पत्नी होत. गीता दत्त यांनी हिंदीबरोबरच बंगाली भाषेतही काम केले.


जन्म

23-11-1930 मदारीपूर ब्रिटीश इंडिया सध्या बंग्लादेश

मृत्यू

20-07-1972 मुंबई,महाराष्ट्र


कार्य

प्रसिध्द पार्श्वगायिका व अभिनेत्री

गाजलेली गाणी

  • आन मिलो...आन मिलो-चित्रपट-देवदास सहगायक-मन्ना डे
  • आज साजन मोहे अंग लगाओ......चित्रपट-प्यासा
  • वक्त किया क्या हसीन सीतम........चित्रपट-कागज के फूल
  • थंडी हवा काली घटा.......चित्रपट-मिस्टर अँड मिसेस 55
  • बाबूजी धीरे चलना.....चित्रपट-आर पार
  • मेरा नाम चिन चिन चू.......चित्रपट-हावडा ब्रिज
  • ना जाओ सैंया....चित्रपट-साहिब बीबी और गुलाम


 भारतीय वनस्पतीशास्त्रज्ञ जगदिशचंद्र बोस यांचे निधन.23-11-1937
अल्पपरिचय

जगदीशचंद्र बोस हे भारतीय जीवशास्त्रज्ञ,भौतिकशास्त्रज्ञ वनस्पतीशास्त्रज्ञ होते. वनस्पतीमधील प्रतिक्षिप्त क्रियांवर त्यांनी मूलभूत संशोधन केले. बोस हे क्रिस्टल डिटेक्टर,क्रिस्टल रेडिओ,मिलीमिटर वेव्हज,रेडिओ,क्रेस्कोग्राफ साठी विख्यात आहेत.

जन्म

30-11-1858 विक्रमपूर बंगाल प्रेसिडन्सी, ब्रिटीश इंडिया सध्या बंग्लादेश

 

मृत्यू

23-11-1937 गिरिदिया बंगाल प्रेसिडेन्सी,ब्रिटीश भारत सध्या झारखंड भारत

 

शिक्षण

  • शालेय शिक्षण-सेंट झेवियर्स हायस्कूल कलकत्ता
  • महाविद्यालयीन शिक्षण-सेंट झेवियर्स कॉलेज कलकत्ता
  • ख्राइस्टचर्च महाविद्यालय इंग्लंड मधून भौतिकशास्त्र,रसायनशास्त्र,वनस्पतीशास्त्र व निसर्गविज्ञानाचा अभ्यास

 

कार्य

  • प्रेसिडन्सी महाविद्यालयात भौतिकशास्त्र विषयाचे प्राध्यापक
  • विद्युत चुंबकीय तरंगांचा शोध घेऊन बॅटरी निर्मिती
  • रेडिओ फ्रिक्वेन्सीव्दारे  संदेशवहनाचे सर्वप्रथम प्रयोग
  •  डायामेट्रिकल कोन्ट्रॅक्शन अ‍ॅपरेटस, रेझोनंट रेकॉर्डर्स,रेझोनंट रेकॉर्डर, ऑसिलेटिंग रेकॉर्डर, कंपाऊंड लेव्हलर, क्रेसकोग्राफ, बॅलिन्सिंग अ‍ॅपरेट्सया उपकरणांची निर्मिती
  • वनस्पतींना संवेदना असतात हे त्यांनी सिध्द केले.
  • कलकत्ता येथे बोस रिसर्च इन्स्टिट्यूटची स्थापना

 पुस्तके

  • इरिटेबिलिटी ऑफ प्लॅंट्स
  • इलेक्ट्रो-फिजिओलॉजी ऑफ प्लॅंट्स
  • ट्रॉपिक मुव्हमेंट ॲन्ड ग्रोथ ऑफ प्लॅंट्स
  • दि नव्‍‌र्हस मेकॅनिझम ऑफ प्लॅंट्स
  • प्लॅंट रिस्पॉन्स (१९०६)
  • दि फिजिऑलॉजी ऑफ फोटोसिंथेसिस
  • दि मोटार मेकॅनिझम ऑफ प्लॅंट्स
  • रिस्पॉन्सेस इन द लिव्हिंग ॲन्ड नॉन लिव्हिंग (१९०६)
  • लाइफ मुव्हमेंट्स ऑफ प्लॅंट्स (भाग १ ते ४)

 

पुरस्कार व सन्मान

  • नाईट पुरस्कार
  • रॉयल सोसायटीचे अभिभावक
  • व्हिएन्ना अकेडमी ऑफ सायन्स चे सदस्य‍
  • भारतीय विज्ञान काँग्रेसच्या 1927 च्या अधिवेशनाचे अध्यक्ष
  • फिनिश सोसायटी ऑफ सायन्स आणि लेटर्सचे सदस्य
  • इंडियन नॅशनल सायन्स अकेडमीचे संस्थापक अभिभावक
  • इंडियन बोटॅनिकल गार्डनला जगदिशचंद्र बोस यांचे नाव दिले आहे.

क्षिण अफ्रिकन क्रिकेटपटू व प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांचा जन्म.23-11-1967


अल्पपरिचय

गॅरी कर्स्टन हे दक्षिण अफ्रिकेचे माजी क्रिकेटपटू तसेच नामवंत प्रशिक्षक आहेत. भारताने त्यांच्या मार्गदर्शनाखाली मिळवलेल्या कसोटी मानांकनातील पहिल्या स्थानामुळे तसेच 2011 च्या एकदिवसीय विश्वकरंडकामुळे ते जास्त ओळखले जातात.

जन्म

23-11-1967 केपटाऊन दक्षिण अफ्रिका


कार्य

  • दक्षिण अफ्रिकेसाठी क्रिकेट-1993 ते 2004
  • भारतासाठी राष्ट्रीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक 2007 ते 2011
  • दक्षिण अफ्रिकेसाठी राष्ट्रीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक 2012 ते 2013
  • दिल्ली डेअरडेव्हिल्स या आयपीएल संघाचे मुख्य प्रशिक्षक


क्रिकेट कारर्किर्द

दक्षिण अफ्रिकेसाठी 101 कसोटी तसेच 185 एकदिवसीय सामन्यांमध्ये  अनुक्रमे 7289 व 6798 धावा जमविताना त्यांनी 275 तसेच नाबाद 188 धावांची खेळी केली. कर्स्टन यांची कसोटीत 45.27 तसेच एकदिवसीय मध्ये 40.95 अशी  उत्तम सरासरी होती.भारताला 2011 चा विश्वचषक तसेच कसोटीतील नंबर एकचा संघ बनविण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. भारताप्रमाणेच दक्षिण अफ्रिकेलाही त्यांनी 2012 साली कसोटीतील पहिले स्थान मिळवून दिले.

आजचे पुरस्कार

’अप्पाशास्त्री राशिवडेकर पुरस्कार’नागपूरचे संस्कृत महाकवी व संस्कृत पत्रकार डॉ. श्रीधर भास्कर वर्णेकर यांना या क्षेत्रातील कठोर तपश्चर्येबद्दल प्रदान करण्यात आला. 23-11-1999

 

 संदर्भ व आभार

 

https://www.google.com/

https://www.wikipedia.org/

https://www.espncricinfo.com/

 

संकल्पना,संकलन व संपादन

भालचंद्र माधव इनामदार

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

13 ऑक्टोबर दिनविशेष-13 october dinvishesh-13-10-2020

ऑक्टोबर 14 2020-आजचा दिनविशेष- october 14 2020-aajcha dinvishesh

ऑक्टोबर 18 2020-October 18 2020